Saturday, December 10, 2011

प्रयत्न....


निसटत्या वाळूसही खंत नसते
ते हात मात्र स्तब्ध असतात...

लिहीलेल्या शब्दांसही तमा नसते
भावनाही कधी कधी अबोल होतात...

क्रोधासही कधी तरी शांती लाभते...
त्या दोघांतले अंतर एक धास्ती असते

चुकल्यावर खरच खूप वाईट वाटते
योग्य मार्ग निवडण्याची सवडच नसते

धपडणे...अडखळणे....पडणे...हरणे....होते.....
कोणासही सतत हरण्याची सवय नसते

पुन्हा नव्याने उभ राहिल्यावर बळ मिळते
जिंकण्याची घाई नको..."अति तेथे माती होते"

- शशांक १०.१२.२०११

Monday, December 5, 2011

कविता होत नाही..


शब्द सुचत नाही..
विचार जुळत नाही...
यमकाचा मेळ नाही...
अखेर कविता होत नाही...

खूप असे प्रयत्न...
नको नको त्या कल्पना...
पण सारं कसं नकोसं झालय...
म्हणूनच कविता होत नाही...

पाऊस कविता लिहील्या..
नव्हेंबरातल्या पावसावरच्या..
चित्रकविताही रंगविल्या होत्या...
माझ्या अन इतरांच्या रचलेल्या...

गद्य..पद्य...अन बरेच...
खूप काही लिहीले होते..
काही कळत नाही...का?
मला ते कमीच वाटते

माझ्या असफलतेवरही कविता..
सफलतेवरही... सु:खावरही दु:खावरही..
तिच्यावरही...त्याच्यावरही...
अनेक असे शब्द मिळवले अन जुळवले..
पण आता काहीच घडत नाही...
खरतर मला आता वेळच नाही....

तरीही इतकं सारं लिहलं की...
अन "मीच" म्हणे कविता होत नाही....

- शशांक ५.१२.२०११

Thursday, September 29, 2011

एक कविता...माझ्यासाठी




वळणांवरही लिहीताना
अनेकदा नवी वाट दिसली..
पावलांनीही माघार घेतली..
पुन्हा नव्याने साथ दीली
शब्दही तोडके पडतात .
त्या व्यथा मांडताना..
आता कसलीच खंत नाही...
जे भोगले...
ते तर भोगायचेच होते
काही वळणं
अनेक विचार बदलतात..
माझे मार्गही बदलतात..
धूसर झालेली क्षितिजं
नव्याने पारदर्शक दिसू लागतात ..
मग मीही कविता करू लागतो
स्वत:च गाळलेल्या...
नव्याने सापडलेल्या..
स्वप्नांसाठी...

- शशांक

कागदात लपवलेलं जग ..




वहीतलं ते शेवटचं पान
त्यावर लिहीलेले चार शब्द
आजही अनेकदा जगतात..
त्या आठवणी जागवतात....
घालवलेला प्रत्येक क्षण तिच्यासवे
मी त्या वहीत लिहीलेला...
गेलेला तो प्रत्येक दिवस ...
हर एक कागदावर कोरलेला.....
अनेक विचार अनेक भावना
कधी ह्सत हसत व्यक्त झालेल्या..
कधी नकळतच अश्रू ढाळलेल्या.
त्या पानावरल्य रेषाही बोलक्या.....
लिहीताना मात्र मीच "नि:शब्द"
कागदानेच मापलेल्या नात्यांचं घर
अन त्यामुळेच घट्ट अन सैल
झालेल्या धाग्यांनी बनलेलं
कागदात लपवलेलं जग ..

- शशांक

Friday, September 23, 2011

Rock Star...


लहान असताना नाचायचो...
टिव्ही वर गाणी लागताच
मग मी ही म्हणयाचो...
"मी पन होनाल एक लोक श्टाल"
आई खूप दा म्हणायची...
हो होशील सोन्या तू एकदा
Rock Star...

रचले शब्द त्या काळावरही..
ज्याने बदलली चाल
अन ताल मज आयुष्याची
आज एकटाच मी रंगमंचावरी
नव्हते कोणी
हो....मी एकटाच तो
Rock Star...

जगावसं वाटतं हर एकास
माझं आयुष्य
जगू नका कधीच
अपराधी पारध्याचं
विरक्त आयुष्य
प्रतिबिंब दिसतं मला
तो विस्कटलेला मी ...
अन त्यात हरवलेला
Rock Star...

सारे काही असूनही
झुंजतो मी स्वत:शीच
एक लढा स्वत:चाच
नशा करतोय आयुष्याचा
जगतोही आहे बेधुंद असा ..
एका आनंदी मुखवट्यातला
Rock Star...

नाही थ कायचे मला..
जगलो जरी बनावटी श्वास
गाठायचे आहे ते एक क्षितिज
जेथे असेल माझे गाणे
ऐकण्यास माझे श्रोते
अन दिलखुलास गाणारा
एक Rock Star...

- शशांक नवलकर २३-०९-२०११

Wednesday, September 21, 2011

प्रश्नांतला प्रश्न....

ढाळलेल्या अश्रूंचे मोल...
कुणालाच समजले नाही....
कारण असलेल्या वेदना
कोणी त्यांचा हिशोब करतच नाही

जगावं स्वत:साठी म्हणताना
स्वत:चे असे काही उरतच नाही
कितीही अट्टाहास केला तरीही
येत्या दु:खास नाही म्हणतच नाही

पावलेही कधी उलटी फिरतील
मनी हा प्रश्न कधी विचारलाच नाही..
वाटही बदलली अन नवी दिशाही
तरी मार्ग मी माझा कधी सोडलाच नाही

जगण्याच्या त-हेला बंधन नाही
कोणत्याच व्यंगास मोजमाप नाही
मी तरी असे कीतीदा विचारू,....
कदाचित त्या प्रश्नांना उत्तरच नाही

- शशांक

एक प्रयत्न

गहिवरल्या वेदना..
कीती ते अन कसले बहाणे

आसवांना पूर आला
नशेतही फक्त रिकामेच प्याले

शिल्पिले होते स्वप्नांना...
अनाहूतपणे रितेपणच मिळाले

बोललो शब्दांना माझ्या
असाही तू एकटाच, ते म्हणाले

कवितेतही पाहीले स्वत:ला..
अन तिच्यासवे मज अस्तित्व...

धूळीस मिळाले

- शशांक

Tuesday, September 20, 2011

when youre not there....

i always dreamed
those heavenly thoughts
never thought it will be you
who came infront across the fogs

my life is complete
when you are withing me
it brakes like an iceberg
when youre not there....

my words sometimes go mime
when i miss you badly and madly
sometimes i become colorblind...
when i close my eyes and see just you

words always tell different story
it is sometimes their deprived glory
but my heart always say , dont worry
devine love can never be imaganary

writing this poem ..
is the part of my dreams...
where i was telling you my words
and suddenly......
you dissappeared into the fogs

- shashank

Monday, September 19, 2011

खास तुझ्यासाठी

दिस आजचा..
तुझ्या नावी केला..
सोहळाच जणू मी...
साजरा तुझ्यासवे केला...

ओठी हसू पाहिले मी तुझ्या
पहिल्यांदाच डोळ्यांनी माझ्या...
आसवेही होती नयनांत तुझ्या...
पाझर फुटली अंत:करणी माझ्या

नाही जगत मी श्वास माझे...
प्रत्येक क्षणी ते असतात फक्त तुझे
रित्या हातांनी आलो होतो....
तुझ्या स्पर्शांनी सुखावलो होतो

एकच मागणे माझे प्रिये
फक्त माझी राहा...
.
.
ही साथ देतो तुला...
अन मजवर असीम प्रेम करीत राहा

- फक्त तुझा , शशांक

Sunday, September 18, 2011

स्वल्प,विराम





त्याचे श्वास थांबले होते.....
माझे मनही बोचरे...
तो जीव...गेला रे....
हेच मला सांगायचे होते..

न चिंतिले इतकं सुख..
त्याचेही दु:ख बोलायचे होते...
अवघे क्षण ते मना मारताना...
पदोपदी मज अंत:करण तुटत होते

एक भावना शिल्लक होती...
त्या चिमुकल्याची आठवण...
जपणे तिला मज भाग होते...
आज माझे "उर" रीते होते....

ओंजळीतली ती दु:खं
क्षणोक्षणी जगायची होती...
अन त्या इवल्या जिवाची चिथा...
जगता जगता जाळायची होती...

- शशांक

Friday, September 16, 2011

व्यंग

ज्वलंत वेदना
जपूनी मी जगलेला..
एक जन्म माझा...
विझताना आठवलेला...

वाट चालली
काट्यांनी सजलेली...
रक्तही ओघळलेले...
हसत्या ओठांनी झेललेले..

एक शांतता..
मनास लाभते....
मग तुटलेल्या काळजास....
पूर्णत्व लाभते...

एक आस
तू नसताना..
अन सहवास ..
तुझसवे मी जगताना...

- शशांक

Thursday, September 15, 2011

एक शब्दस्पर्श

काही शब्द मनास स्पर्शून गेले...
काही शब्द मनास अवहेलून गेले....
त्यांचे ते आपले आपलेसे होणे...
अन अनाहूतपणे परके करणे....

एक शब्दही उध्वस्त करू शकतो....
तीन शब्दही आयुष्य देऊ शकतात ..
त्यांचे ते स्वत:च निर्मिलेले व्यंग
अन मी त्यांतला एक पुसटसा रंग

वादळावरही शब्द जादू करतात...
ते शांत होते तेव्हा...शब्दही गरजतात..
पावसाचाही ओलावा चिंब भिजवून जाई...
ह्या शब्दांची मजा तिच मला देऊन जाई

प्रत्येक शब्दात तिचेच प्रतिबिंब
प्रत्येक कवितेत तिचेच अस्तित्व
वेडावतात मनी ते सुंदर मर्मबंध
तोच अन फक्त तिचाच....एक शब्दस्पर्श

- शशांक नवलकर

Sunday, September 11, 2011

शब्दांतली कळ

शेवटचे शब्द लिहीता लिहीता
अनेकश्या सुरुवाती करून जातो...
आयुष्य कधी संपत नसते..
त्यातला मी मात्र खुंटत राहतो....

भुतकाळातले काही मज उमगले नाही
जणू डगमगता पत्त्यांचा बंगला...
तो जसा कधी स्थिर राहीलाच नाही...
मज आयुष्याचा बांध कधी घट्ट बनलाच नाही...

सांगायचे होते मला काहीसे तिला..
पण तिला माझं काही ऐकायचेच नाही...
त्रास मला ही होतो तिला कणताना बघताना.
तिला मात्र तिची कदरच नाही...

असे शब्दांचे समास किती बदलू...
मग माझा "मी"च स्वत:शी रूसतो..
घडलेल्या गोष्टींत हरवतो...
अन मग असं वाटू लागते की....
का मी हे सगळं आठवतो

- शशांक 11-9-2011 2053hrs

thank you....

कधी कधी
तुझी आठवण
मला नकळत
रडवून जातात...
पण dont worry
तुझ्या सुखद आठवणीं
त्याच मला तो आनंद देतात..
शब्दही कसे खेळ करतात
तुझ्या आठवणींत
मला मस्करीतही पिळतात...
असच आठवत आठवत.
डोळ्यातून पाणी येतं
पण dont worry
वेदना नाहीत..
सुखाश्रू आहेत...
खरच तुला काय सांगू...
आयुष्यात आलीस माझ्या..
आता मला हेच वाटतं
मी देवाकडे अजुन काय मागू...
पण dont worry
मला माहीत आहे
तुला हे सर्व आवडत नाही..
म्हणून आता मी तुझ्याकडेच मागतो...
कधी कधी देवाच्या कानात सांगतो...
इतकं सुख मी कधी मागितलं नव्हतं
पण जे मिळालं तेच अपेक्षित होतं
पण dont worry
तुझं असणं माझ्यासाठी...
ह्या सगळ्यांहून मोठं आहे..
कदाचित हेच मी मागत होतो ...
तुझ्या इच्छा तुझी स्वप्नं..
अन त्यात दडलेलं
माझं एक छोटुसं सत्य......

- शशांक १०.९.२०११ सकाळ. १०५७

Wednesday, September 7, 2011

प्रेम व्यथा


श्वास माझे परकेच होते..
ह्याची हमी तूच मला दिलीस...
तुझे श्वास माझे आहेत...
हे विचारायचे माझे राहूनच गेले..

डाव-पेचांची सवय होती
जिंकायचे किती असे बहाणे..
तुझी सोबतच हवी होती...
म्हणूनच मी तुला जिंकू दिले

दिल्या त्या राती..
ज्यात तुला काटेच मिळाले...
पण त्यात प्रेमही दिले..
काळीजही कसे रक्तबंबाळ झाले

काट्यांनीही मऊसर व्हावे..
इतके मोहक तुझे शब्द....
मग मी उरलो तुझा दिवाणा...
आता तूच सांग मी काय करावे

वाहीले शब्द हे तुला...
तोडूनी बांध अनेक व्यथांचे
मानतो मी तुझे आभार..
तू मज असण्याचे

- शशांक

Thursday, September 1, 2011

तूच आहेस ...


तूच आहेस ...

दिस नेहमीच वेगळे...
ना एकटा मी न माझे श्वास
अन ते जगणेही नव्हते....
तुला पाहतो मी तिथे....
जिथे जिथे मिटतो मी डोळे...

नाही ते विचार विसरलेले
नाही तो विरह गहिवरलेला...
खेळ असा का सावल्यांचा
तरीही जाशील कुठे....
माझ्या नजरांपासून दूर...

निसर्गातही तू....आसमंतातही
मज ह्र्दय....मज श्वास
सारे काही तूच..
प्रमात पडतो मी त्या क्षणांत...
जिथे जिथे पाहतो तुला ....

खुष आहे मी आज....
विसरूनी झाले घडलेले....
मजा न्यारी वाटे मला..
त्या प्रत्येक अनुभवाचा
आस्वादही तूच....

उत्तरेही तुजपाशीच....
हो.. तू माझी आहेस....
माझ्या आयुष्यात
सर्वत्र फक्त तूच आहेस....

- शशांक १-९-२०११

Tuesday, August 30, 2011

बस एक पल ...



कभी आखे नमसी हो जाती है
कही मोड ऐसेभी आते है
न जाने क्यो
दिल भी मुस्कुरा लेता है
शायद यही वो चाहता है
हर पल मै ऐसे ही जीता रहू
दुवा करता हू
मेरी हर ख़ुशी उसे मिले
लेकीन क्या करू
दिल कि ख्वाहिश कुछ और है
वो धडकता है मेरे लिये
लेकीन जीना ....

- शशांक नवलकर

Sunday, August 28, 2011

शब्दांचा बंगला ....

शब्दांचा बंगला ....

कधी कधी विचार करायचे राहून जातात
आयुष्याच्या डावात
काही हुकुमाचे इक्के ...
उघडायचे राहून जातात....
मग वाटतो बनवावा त्या पत्त्यांचा बंगला
पण हरण्याची सवय इतकी ....
मग तो बांधायचाच राहून जातो...
मग लिहिले जातात तेच विचार
शब्द बनुनी जातात तो आधार
मग लागतो मनी एक विकार
.
.
खरच life हे आहेच एकदम बेकार
जितके शब्द घ्यावे उधार
तितकी घ्यावी लागते मलाच माघार
शब्दांची सवय इतकी लागते
कि मग लेख , डायरी , पानं
काय लिहू आणि काय नाही
मग बस शब्दच आणि शब्द
.
.
कधी म्हणतो शब्दांचा डोंगर....
कितीही चढला तरी अंतर तितकंच
कधी म्हणतो शब्दांची नशा
कितीही चढली तरी साली चढतच नाही
मग कोणी म्हणतो शब्द बनलेत तुझे श्वास
काय यार ते हि तिला बघवत नाही...
.
.
म्हणून मी बांधतो शब्दांचा बंगला....
मी त्यात राहत नाही...........
आणि तो पडला तरी ....
.....अरे यार शब्द ते शब्दच ना......

- शशांक नवलकर २८-८-२०११

Friday, August 19, 2011

rewind.....



शब्दही होतात गढूळ...
जेव्हा आत्मा धूसर होत जातो..
मग मनातही विचारांची वर्दळ....
का हा देह नेहमी चुकत जातो...

पर्व बदलत गेले...
त्या प्रत्येक आठवणींचे
असे अनेक क्षण आले...
निसटणा-या आयुष्याचे

अनेक वेदनांचे चक्र..
मोजलेल्या जखमांचा परिघ...
अन सोसलेल्या त्या कालावधींचे
एक विशाल घन...वर्तुळ...

एक नितांत संदर्भ...
सर्व स्पष्टीकरणांचा...
एक अभ्यास.....
माझ्याच प्रतिमेचा....

- शशांक

Saturday, August 13, 2011

चुरगळलेला कागद....





अनेक अनुभवांतून गेलेला...
भावनांनी होरपळलेला
अनेक मनांशी जुडलेला
काही ह्र्दयांतही जडलेला....
अन....
मनातून भिरकावलेला...

खुप काही लपलेलं
अंतर्मनात दडलेलं
एखादं गुपित
काहीसं अर्पित
काहीसं शापित
गाळलेले...वगळलेले...
पण...
माझं आयुष्य तितकंच

रंगरंगांतूनी रंगलेला
अनेकांत मिसळलेला...
अनेकांसाठी जपलेला...
खूप काही सांगणारा...
मनातलं बोलणारा....
नि:शब्द मी.....

कल्पनांनी रंगवलेला
नकळतच कितीदा भिजलेला...
त्याच्यासाठी...तिच्यासाठी....
जपलेला...वाया घालवलेला...
जाळलेला...विझवलेला...

.....

एक चुरगळलेला...कागद.

- शशांक नवलकर १३.०८.२०११

Sunday, August 7, 2011

खास तुमच्यासाठी.....

घुसमटतो मी...
फरफटतो मी....
खूप रक्त आटवतो मी..
खूप हताश होतो मी...
अन खूप थकतो मी...
अन शेवटी....
.................
माझ्यातला मी हिरावतो.......
माझ्यातला मी हरवतो.....
माझ्यातला मी काळं फासून घेतो....
माझ्यातला मी गळा फासून घेतो.....
माझ्यातला मी..जाता जाता हसतो....
अन शेवटी....
..................
तो मीच जो दु:खी होतो....
तो मीच जो पुन्हा सु:खी होतो...
तो मीच जो रडतो...खचतो..
तो मीच जो पुन्हा उभा राहतो...
अन शेवटी....
...................
लिहीण्यासारखं बरच काही..
लिहीण्यासारखं काहीच नाही....
लिहीण्यासारखं सुचतं ही मला..
लिहीण्यासारखं मी लिहीतो ही....
लिहीण्यासारखं तुम्ही वाचता....
अन शेवटी....
...................
माझ्या कवितेतलं पूर्णत्व सफल होतं
कारण त्यात असता तुम्ही.....

.....
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

० शशांक

Friday, August 5, 2011

सेलिब्रेशन....

लोकं प्रेमावर कविता कविता करतात..
विरहावर कविता करतात..
"ती" सोडून गेल्यावर कविता करतात....
"तो" सोडून गेल्यावर!!!
अर्र्र्र मी नोरमल आहे ...
लोकं मैत्रीवर कविता करतात...
"मैत्रीदिन साजरा करण्यापुरतंच"
खरच मैत्रीला इतकीच किम्मत !!
कधी कधी प्रवचन टाईप लिहीतो मी...
पण मला ही कविता वाटते..
कारण माझे शब्द आहेत , त्या मैत्रीखातर...
जी मी गेली २२ वर्ष जपतोय....
त्या मैत्रीखातर.....जी मी गमावली..
त्या मैत्री खातर....
ज्यांनी मला जगायला शिकवले......
खरच मला मैत्री साजरी करावी वाटते...
त्या हर एक क्षणास...
जेव्हा मला आठवतात ते दिवस..
पहिल्यांदाच भेटलेले...
साजरा करावा तो प्रत्येक क्षण
मित्रासोबत घालवलेला...
साजरे करावेत ते शब्द ..
मित्र वा मैत्रीणीसाठी बोललेले..
साज-या कराव्या त्या ओळी....
मैत्रीसाठी लिहीलेल्या...
अन साजरी करावी ही कविता....
मी तुम्हा सर्वांसाठी लिहीली...


० शशांक

कविता...गंजत गेली....

अनेक ओवी
तुला लिहीलेल्या..
अनेक चारोळ्या..
मी गाळलेल्या
स्पंदनेही खरडली...
स्वप्नेही बघता बघता रेखाटली...
शब्दांचीही फुले झाली...
अन पारिजातकासम..
चिरडली गेली...
तमा कोणासही नव्हती..
आजही नाही..
पण माला आहे......
ते शब्द माझे होते........
आहेत अन कायम असतील...
पण ही कविता नवी नाही......
अन ह्यात जुनं तसं काहीच नाही.....
तरी ही पुन्हा पुन्हा लिहावीशी वाटते...
बंद पेटीला गंज लागला
तरीही ती उघडावीशी वाटते...
वाचावीशी वाटते...
खंत फक्त नव्याने कित्येकदा झाली....
कारण....ती कविता.......
गंजत गेली...

० शशांक

Thursday, August 4, 2011

वाटले होते..जणू....

स्वप्न पाहीले होते ...
नव्या उमेदीने जगण्याचे..
बेत रचले होते....
नवी दिशा गाठण्याचे..
होती एक योजना....
आयुष्य बदलून टाकण्याची...
पण होती एक भावना...
शिल्लक....विसरून जाण्याची...
कितीही पुढे चालत गेलो...
तरी पावलं मागे फिरतातच....
पुन्हा त्या दिशेने जाण्यासाठी...
नव्हे.....
सोबत उमटलेल्या....अनामिक....
पावलांना पुसण्यासाठी....
सुरूवात करायची होती.....
एकट्यानेच...
पण....
त्या वळणापासून.....
सोबत होतीच.....

० शशांक नवलकर ३१-७-२०११

Sunday, July 24, 2011

पुन्हा नवी सुरूवात....

आयुष्याची नवी सुरूवात....
प्रथम करावी की शेवटी....
.
.
नेहमी काहीतरी वेगळंच ठरतं
श्वासही थांबतातच शेवटी...
पण अगदी शेवटालाही.....
.
.
नवीन श्वासो-श्वास...चालूच
खरच म्हणतो कधी कधी...
संपवावं सारच काही....
.
.
पण काहीना काही सूरू होतंच...
प्रत्येक ओळीचा शेवट....
एक नवी सूरूवात असतेच...
.
.
पण मग नवी कविता सुचणार कशी...

० शशांक

जमलेच तर...

जमलेच तर....
माझी आठवण मनातून काढ...

खूप सोसले तुझ्यासाठी...
अश्रू आटले...गोठले...थांबले
आता रक्तांचे अश्रू येणे बाकी....
जमलेच तर...
माझी आठवण मनातून काढ

काळ जणू थांबयचा...
तू प्रसन्नतेने माझ्याशी बोलायचीस
तुझ्या हसण्यात उठून दिसणारी खळी....
त्या करप्ट मेमरी कार्डातली एकुलती एक इमेज....
काढून टाकली...
जमलेच तर...
माझी आठवण मनातून काढ....

कविताही तुझ्यावर पूर्वी खूप करायचो...
तू वाचायचीस खूप खूष व्हायचो...
आज मला ते दिवस आठवतात...
पण त्या आठवणींचं काय करू...
तू नसल्याचे...क्षण सतावतात....

खंत वाटते...
पण आता मला जगायचय..
माझ्यासाठी...माझ्या स्वप्नांसाठी

बस ही एक शेवटची कविता....
तूला पाठवतोय....
जमलेच तर...
माझी आठवण मनातून काढ....

- शशांक नवलकर १७-७-२०११

Tuesday, July 12, 2011

colorfull पाऊस....



वाट पाहूनी कंटाळलो
त्या आठवणी आठवूनही..
आजकाल भिजणे होत नव्हते....
सारे शब्दही सुके सुके..
शेवटी कागद चुरगळून फेकून दिला...
=============================
काही से थेंब अवतरले...
म्हंटलं असेल वरच्याची कॄपा...
"देवा बद्दल नाही बोललो"
पण तो पाऊस होता...
अखेर काहीतरी लिहीणे झालेच....
==============================​=
रंग मातीचा ओलावला...
तो स्पर्श अंतर्मनास गहिवरला....
शब्द आज चिंब करून जात होते...
पण मला तर भिजावसंच वाटते

पावसातले रंग बघितले..
काळ्या मातीत विरघळणारे...
लाल मातीत विरघळणारे...
अन अनेक रंग बदलणारे....

आठवणी पण सगळ्या रंगीत...
जणू एखादा colour splash"
मग त्या असो २६ जुलै......
अन असो ११ जुलै....
तो पाऊस....ते रंग आणि आठवणी.....

प्रेम म्हणतात पावसात रंगते..
नको तो प्रेमरंग...
हल्ली प्रेम कविता...
जाऊ द्या...भरपूर लिहीलं प्रेमावर
हा...पण तो पाऊस आठवतो
फक्त तिच्या त्या भिजण्यासाठीच....

चला... एक कविता लिहीलीच..
खरच रंग पावसाचे इतके होते..??
की तो पाऊसच होता.."COLORFULLLLLLLL"

- शशांक नवलकर

Monday, June 27, 2011

माझाच मृत्यू....


माझाच मृत्यू....
माझीच वाट अगदी आतुरतेने पाहतोय......

ह्या दोन ओळी वाचल्यावर मला माझ्या जुन्या कविता आठवल्या.... पुन्हा त्यांसारखी एक कविता लिहावीशी वाटली अन तो विषय मी हाताळला..... विथ अ ड्यू रिस्पेक्ट मी वरील दोन ओळींवरून ही कविता करतोय...अन त्या कवितेसाठी वापरत सुद्धा आहे. अभिप्राय अपेक्षित अन प्रतिक्रियाही....

माझाच मृत्यू....
माझीच वाट अगदी आतुरतेने पाहतोय......

अस लिहीताना अनेक विचार आले..
अनेकदा मी जातोय..
अस बोलणारे चेहरे दिसले...
तेही अगदी माझेच...
मग मी ... मी मात्र नि:शब्द

स्पंदने जशी गोठत जात होती...
श्वासही जणू कोरडे होत जात होते
पण ती भावना...
माझा जीव घेत होती....
होती फक्त एक संकल्पना...
एक कविता...
पण खरच माझा जीव घेत होती...

पाहीलय मी माझ्या मॄत्यूला...
होय...स्वत:ला तुटताना..
माझ्या समोर
माझ्याच काळाला थांबताना

जेव्हा असे विचार येतात..
तेव्हा एक अनोळखी वाट दिसते
पण आपली आपलीशी वाटणारी
अचानक....
कोणीतरी ते दॄष्यच पुसून टाकले....

सारे कसे विझत गेले..
विरक्त होत गेले....
तोच सारे करत होता....
मला त्याच्या तालावर नाचवत होता

अखेर सार काही थांबलं
मी सुद्धा

- शशांक २७-६-२०११

Tuesday, June 21, 2011

विकार...

लिहीण्यास खूप काही असते
पण लिहीले जात नाही....
बोलायचे खूप सारे असते
पण नेहमीच नि:शब्द
सारेच जर बोलता आलं असतं तर...

व्यंग अनेक उभारली ...
अनेक मुखवटे बनवले..
पण त्या मागची व्यंग
दिसेनासी होत जातात
दिसतो तो फक्त दिखावा....

जगण्याचे समास...
वागण्याच्या सीमा
बदलत असतात ....
बदलल्या जातात...
पण....खरच बदल.....
काही विशेष घडवतो का ???

जपण्यास खूप सा-या गोष्टी
मनातले विचार , भावना...
अन खूप काही
पण असतो तो एक विकार...
विचार करण्यास लावणारा....

- शशांक नवलकर २१-६-२०११

Tuesday, June 14, 2011

तो पाऊस होता




थेब ओघळले गालावरूनी....

अश्रूंच्या त्या धारा होत्या...

पाहीले मग स्तब्ध आभाळी

घन-नाद गर्जला होता...तेव्हा

गडद काळोख झाला होता....

शब्द बरसले बघता बघता

चिंब भिजवूनी पाऊस गेला



होता कोणाचा पहिला पाऊस...

होती कोणाची ओली आठवण

सारा झाला चिंब पसारा

पाहूनी तिलाच भिजताना...

होती ती परकीच जणू

पाहत तिला तिचा प्रियकर होता

लेखणी ही भिजली होती

लिहीताना तो पाऊस होता



नशा चढला त्या थेंबांचा

अश्रूही पीणे जमले होते

गोठण्यास काही शिल्लक नव्हते

होते ते ही आटून गेले...

मग आठवलेले मी रडताना

होता तोच वरूण राजा

पाहूनी मजला हसत होता

मग मी ही त्यासवे मैत्री केली...

ढाळता अश्रू भिजत असताना...



ते पानही पार भिजले होते....

लिहीता लिहीता थिजले होते

भिजलो होतो मीही लिहीताना..

कारण त्यातही तो पाऊस होता



- शशांक नवलकर १४.६.२०११

Sunday, June 5, 2011

a poem that died

never imagined
this thought can be inked
but yes i wrote it
about a child that lived....

a mother met me once
i saw her silence in a glimpse
a while later i saw those feelings
as if shattering glass and soaring cries

its easy for me
much easier to type
can anyone revive
that child who died

may be that woman
will take another chance
but will that life come twice
to live the moment of that child

who died.....

- shashank navalkar 05-06-2011

Saturday, June 4, 2011

फक्त तूच बोललास........

खरच तुझं इतकं प्रेम होतं
मग व्यक्त करण्या अवकाश का ?

वाट मलाही पहावी लागली
मग तूझा वेग इतका सावकाश का ?

मागणी तुझी ती जरी होती
कैकदा तू मला विनवूनी मी निराश का ?

प्रेम माझे सुद्धा तुजवर आहे
मग भावनांचा बुद्धीबळ अन त्याचा सारांश का ?

बोललास आज खूप बोललास
मग माझ्या प्रश्नांची उत्तरे तू देशील का ?

- शशांक ४-६-२०११

आज सांगायचे होते तुला.....

वेळ आजही कमी पडतो
तुझ्यासाठी कविता लिहीण्या
हा प्रयासही अपुरा ठरतो..

अजुनही ते तीन शब्द ...
ओठीच उरतात ओले-अपुरे
तरीसुद्धा मी फक्त नि:शब्द

घेऊनी पुन्हा एक नवी सुरूवात
एक शब्द एक ओळ एक कविता...
मग जणू वाटे...असावी ती झंजावात

पण...छे.......मला काही जमलेच नाही
आज सांगायचे होते....नाही...आहे तुला
कायमची फक्त एकदाच माझी होशील......

० शशांक ४-६-२०११

Friday, May 20, 2011

प्रयास

सारा प्रयास पसार झाला..
बघण्यास आता फक्त अंत आहे
उगवलो मी नव्याने आता..
एकटाच का....ही खंत आहे

बघण्यास ओल्या पापण्यांनी
खुला तो आसमंत आहे...
जगतोय आता श्वास जपूनी
दिखावाच हा मी जीवंत आहे

स्वप्नं घेऊनी उराशी
एक नवे स्वप्न बघतो आहे
मिटल्या डोळ्यांनी दिसेनासे
एक असे चित्र शोधतो आहे

स्वत:शीच केला मी एक करार...
जगण्यास एक कारण शोधण्याचा
साथ तिची अनाहूत मिळवण्याचा
अंतास....स्वत:च पुसट होण्याचा

- शशांक नवलकर २०-५-२०११

Sunday, May 15, 2011

शब्द (गझल)

गण : गा ल गा गा गा ल गा गा
वॄत्त : मनोरमा


आठवांचा भार झाला
तोच तो आजार झाला

कंपला किंचाळला तो
बोचला बेकार झाला

भासला आभास सारा
घातकी प्रहार झाला

माग घेणे बास आता
घाव तो संहार झाला

शब्द हा बेभान आता
तोच का? कैवार झाला

- शशांक नवलकर १५.५.२०११

Monday, April 25, 2011

and your heart will smile.....

(from rucha's last line)



always fail searching person within
wait to feel that special beggining
try finding the light within..
wait for that special moment.........
and your heart will smile ..........

always trying to catch that flavour
and make god a favour
that please make my wish come true...
belive yourself yes that you...
and feel it ...
your heart will smile ....

disguised devolvered detonated
always feel low with these "d"s
questions always hammer
to make you think what the hell is this.....
comon .... you know them...and solve them....
and your heart will smile

dry up your tears
a rain of happyness is coming
end all your fears
a sun shine is coming..
feel the fresh air breathe it ...
and your heart will definately smile....

i wrote this poem.....
because of that line...
of the poem which was sweeter as wine...
but when i read the whole poem...
i never knew....my heart will smile

- shashank navalkar 23-4-2011

Sunday, April 17, 2011

वसूली...

दिवस मावळत होता..
तो चहाचा पेला संपत नव्हता...
समोरच्या टेबलावरचा माणूस....
बंडलातल्या नोटा मोजत होता..
अन अचानक...
चहाचे पैसे मागणारा...माणूस...

खिशातली दहाची नोट...
त्याच्या मागे चुरगळलेली ...
अजुन एक निनावी note
दोघांच्यातला यमक.........
पचत नव्हता पण...
पैसे तर द्यायचेच ना

नोट उघडून पाहीली...
तर होती देणेक-यांची यादी....
संतप्त होऊनी ऊठलो
अन खिश्यात हात घालताच...
सापडला एक रूपया............
अन हसत हसत मलाच माझी आली दया...

महिन्याखेरचा दिवस उगवला
ती नोट अजुनही तशीच...चुरगळलेली...
खरच नशीब माझे खोटे??
वा जेथे उणे तेथेच तोटे...
त्याच होटेलात बसलेला मी..
तोच चहाचा प्याला...
अन समोरच्या टेबलावरला माणूसही...

अबोला तोडत तो म्हणाला...
" क्या साब रोकडा कब दे रहे हो "
अन सा-या घटनांचा हिशोब...लागून गेला

आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा होशोब....
घटका घटका वसूली केल्यावरच लागतो का ?

- शशांक नवलकर ५-३-२०११

" i m fail "

३ मार्च सकाळचे ११ वाजलेले असतील मी माझी टेस्ट संपवून ऊठत होतो , मनात अनेक विचार येत होते मी पास झालो असेन वा नाही पण म्हंटले मनी जे व्हायचे ते होईल अन मागून ती नियंत्रक आली अन म्हणाली " तू पास झालास , ९४९... " काही क्षणांसाठी मी स्तब्ध होतो पण नंतर आनंद आकाशाएवढा मोठा झाला होता..... बाहेर पडलो तर एक मुलगी रडत होती.. दिसण्यावरून चांगल्या घरची होती पण मी विचारलं काय झालं ... न बोलता निघून गेली.... मी सर्वांना माझ्या टेस्ट ची बातमी सांगत होतो अन तेवढ्यातच ती मागनं आली अन म्हणाली.....
(सत्य घटनेवरून लिहीलेली ही कविता आज पोस्ट करतोय)

" i m fail "

"मी फेल झाले"
हेच ऐकायच होतं न तुला...
झालं का तुमचं समाधान...
ओरबाडलेल्या मनाला....
अपयशाचे घाव मिळाले...
अन त्या सळसळत्या रक्तासवे
मी सारे मिटवण्यास निघाले...
जगणे असते कशासाठी..
आयुष्य साकार करण्यासाठी...
स्वप्नं पूरी करण्यासाठी....
पण नको मला ते आता सर्वकाही....
खरच हे व्रण बुजवण्यास औषध असते तर ...
मला कोणतेच व्यसन नाही ....
कसलीच ओढ नाही...फक्त एक लक्ष होते...
तेही मी दुरावले..अपयशी गमावले.
नैराश्य घेऊनी घरी परतले
काय सांगू बाबांना....
कष्ट करून त्या माणसानी पैसे जमवले...
अन मी ते माझ्याच मस्तीत घालवले...
पण मी ठरवले..
जे घडले ते सत्य सांगायचे.....
वाट पाहत आसक्त उभा तो पिता..
मजकडे आशा ठेऊनी बघत होता
पण मी नीरस नजरांनी त्यांच्याकडे पाहिले.....
"बाबा.... मी फेल झाली" ....
एकच वाक्य क्षणभंगूर वेदनांच कारण
त्यांनी मला मिठीत घेतले
अन ते म्हणाले...
" पोरी तू पुन्हा नव्याने सज्ज हो....."
अन जो आत्मविश्वास निर्माण झाला...
तो अढळ होता...
खरच " thanks " ....

- शशांक नवलकर

surprise.... ??

दुपारची १.२० ची लोकल...
धावत पकडण्याची होती गडबड..
मनातही चालू होती एक अनामिक बडबड...
ट्रेन चढलो पण लक्षात आले ...
"लेडीज डब्बा"

सगळ्या बायकांची नजर...
एका मारक्या म्हशीची वचक...
त्या हवालदाराच्या मिश्याही एकदम ताठ...
कशाला पडली माझी ह्या सर्वांशी गाठ....
चला लागली माझी पुरती वाट...

लाल सिग्नल लागला खरा...
तोवर घाम फुटलेला मला बरा
यमकात कविता लिहायची सवय नाही...
पण आजकाल विनोदी कविता सुचत नाही...
तरी पण challenge आहे ना....

सुटलो त्या कचाट्यातून मी खरा
त्या गाडीतून निसटलो मी जरा....
उतरता उतरता आदळलो..........
एका सुंदरश्या मुलीवर...
अन त्या मुलीने स्माईल दिली !!

अहो कविता म्हणूनच वाचा हो....
प्रसंग वर्णन नाहीए..

- शशांक नवलकर २९.३.२०११

recycle bin

होता होता एक अप्रेजल
नेहमीच ती राहून जाते...
माझी नाही तुझी जास्त
फक्त हीच तू-तू-मे-मै होत असते

संतप्त विरक्त आसक्त
अशी काहीतरी यमक वाली
प्रेमकविता नाही पण...
दु:ख व्यक्त करणा-या ओळी ..(resignation letter)

खरच एक बदल हवा असतो
त्याची प्रत्येक जण वाट बघतो
होत तर काहीच नाही...
च्यायला दरवेळी एक बकरा बनत असतो

ही cycle कधीच न संपणारी...
तुमच्या आमच्या सारख्यांची
पैसे काय आज आहेत उद्या आहेत...(अगदी पर्वा पण...)

असे कित्येक लेख...कित्येक कविता...
लिहिल्या गेल्या फाडल्या गेल्या..
पण माझ्या कवितेचं तात्पर्य...

इथे प्रत्येकाच्या अपेक्षा recycle होतात...
सगळेच त्याला बांधील होतात....
असे अनेक letters लिहून होतात..
कविताही करतात काही (माझ्यासारखे)

म्हणूनच....

- शशांक

त्या सावल्यांची दिशा...

वाट पाहिली त्या दिवसाची
वर्दळ दिसे जेथे सावल्यांची
अंध:काराने गजबजलेली...
एक डार्क कविता लिहिण्याची

जन्म जिथे मनुष्याचा...
उजेड जिथे प्रकाशाचा...
अस्त जिथे सूर्याचा....
उगम तेथेच सावलीचा...

अबोलतेपणी अजाणतेपणी...
सावल्याही होतात कधी बोलक्या...
अनेक वेदना अवखळ स्पष्ट होतात...
जेव्हा जिवंत भावनाही होतात मुक्या

जे शक्य नाही प्रकाशात...
होई साध्य ते अंधारात
लपंडाव तो सावल्यांचा
चालत राही...अनंतात

ओढ मलाही त्या सावल्यांची
लागते जणू एक नशा.
म्हणूनच लिहीतो एक कविता पुन्हा....
शोधुनी त्या सावल्यांची दिशा...

- शशांक नवलकर १०-४-२०११

Saturday, March 26, 2011

जगाव असंच एकदम दिलखुलास....

विरहानंतरही अश्रू ढाळत बसायच..
उदासीनतेसाठी दारू ढोसत बसायचं
मनासारखं घडलं नाही...
नशीबाल दोश देत बसायचं
काय चाललय यार...
जगावं असं..
एकदम दिलखुलास असावं

ओळीवर कविता खास लिहावी...
अनेकदा मरूनही अमर राहील..
अशी कविता करावी....
प्रत्येकाला वाटतं अस्सच काहीस लिहावं
पण वाचणा-याला कोण सांगणार...
त्यानी कसं वाचावं
विचार न करावा कोणाचाच
एकदम बिनधास्त लिहावं...
शब्दही आपलेच अन लेखणीही...
मग एकदम दिलखुलास जगावं

विटल्या मनाला खेळवावं...
विरक्त न होता सावरावं...
विधाने कित्येक बदलली..बदलतीलच
विषय असे अनेक अन अनेकदा...लिहावं
विशेष काही सांगायच नाही...
फक्त एवढच...
जगाव असंच एकदम दिलखुलास....

- शशांक नवलकर १८*३*२०११

Monday, February 14, 2011

painful....


अस्सीम वेदना
मनातही यातना
देवास ही प्रार्थना..
सोडवशील का मला

कोडे पडलेले..
सगळेच बिघडलेले
कधीतरी उलगडलेले..
एक नवे स्वप्न

चार क्षण
सु:खी दु:खी
आपलेसे अनोळखी
पण कधीतरी परकेच

एक वाट नवी
एक चाल नवी
एक कविता नवी...
नव्या प्रवासासाठी....

चालतोय कणतोय
रडतोय हसतोय
लिहीतोय वाचतोय...
काहीतरी लिहीलेलं

मीच...माझ्यासाठी

- शशांक नवलकर १४/२/२०११

Sunday, February 6, 2011

अंजान


कोहोरेमें मची एक नई साजिश
ढूंढ राहा हू तुम्हे...पानेकी एक कोशिश
कभी जिकर कर मेरा ए नादान....
क्या पता कब हो जाएंगे हम तुमसे अंजान

लब्ज ना निकल पाए जुबान से
मुकर गई मुझसे अनकही बाते कह के...
अब वक्त यू थम सा गया....
और आज मेराही साया मुझसे उलझता गया

काटोंसे भरी इन राहो पे चल पडा
कदर होगी उसे..तो लौट आयेगी ए खुदा
हर झालिम लब्ज कहे उस नादान ने..
गूंज रहे हैं हर पल हर कदमपर..

चुभ रहें है काटे...लेकीन मजा आ रहा है
झिंदगी अकेले ऐसेही जीकर मर मिटना...
कोई वजह नही ना कोई चाह...
कुछ पन्ने लिख छोड कर चला जाऊ....
यही है मेरा केहना.....

- शशांक नवलकर ६.२.११

"माझ्याच रक्ताने माखलेली पाने"


कोवळ्या पापण्यांतूनही अश्रू ढाळले
त्या मोत्यांचे मोल कोणासही न कळले
स्वप्नातल्या त्या सुंदर बागेतील फूल...कालच गळले
असेल हे असे स्वप्न ....अजाणतेपणी मला उमगले

थांबला होता तो काळ
थांबवला होतास माझा श्वास
नि:शब्द स्तब्ध होतो केविलवाणा
अलगच होता तुझा निसटण्याचा बहाणा

रक्त ओथंबले नयनांतूनी
पुतळा होतो भावनांनी रूतलेला
काटेच जणू रूपले शरीरभर
सापळा तुझ्या प्रेमाचा....मी त्यात गुंतलेला...

फाटक्या वह्या विणल्या पुन्हा
तुझ्यासाठी...लिहीलेली..हरवलेली पाने
त्यात एक कविता..लिहीली...पुन्हा....हरवण्यासाठी
"माझ्याच रक्ताने माखलेली पाने"

एक शेवटची कविता....
तुझ्याचसाठी...

- शशांक ६.२.२०११

Sunday, January 30, 2011

सांग सख्या रे ...२



नि:शब्द कधी कधी करतात..
ते क्षण.. त्या भावना.. ती माणसं
असे संवाद कैकदा निरर्थकच
...जणू एका अजाण शेतातली जळालेली कणसं
ह्या सगळ्याचा संबंध खरच... असतो का रे ???
सांग सख्या रे...

एक ओळही कधी कधी झोंबते
काट्यांसारखी काळजास रूपते..रक्तबंबाळ करते
त्यातले अमाप भाव...अस्सीम भावना
खूप काही बोलतात...स्पष्टपणे...
पण ते अन त्यातले सारे काही..
समजावणे...जमतेच का?
सांग सख्या रे

असल्या विषयांवर
चारोळी त्रिवेणी..लघुकविता...गझल...
खरच गरजेचे आहे का?
अन मी लिहीलंतर तू वाचशील का..
ए हा प्रेमळ भाव नाही हा...
एक मुद्दा...एक कविता....
ती लिहीताना त्यानंतर पडलेल्या अश्या अनेक प्रश्नांवर...
यमक शोधू नकोस...
कशी वाटली....
सांग सख्या रे

- शशांक नवलकर ३०/१/२०११

सांग सख्या रे ...१


प्रेम नको विरह नको
लळा नको जवळीक नको..
आजकल हल्लीच अश्याच कविता
...त्याही नको..
अरे मग मी करू तरी काय.......
सांग सख्या रे

ओके...
चल आज तुझ्यावर कविता करते
प्रत्येक भावनेत तुझ्या प्रेम साचतय..
अन मनाच्या उंब-यात नकोतिकडे पाहणं तुंबतय..
श्या... काय रे तू...
आता मी लिहू तरी काय
सांग सख्या रे

प्रसंग आठवला तर त्यातही तू..
आता वास्तववादी कविता लिहीली तर..
valentines dayची वर्दळ..
मग तुला प्रेमकविताच लागेल नं माझ्याकडणं
पण आज मला तसल्या कवितांचा ओघच नाही..
काय हवं मग तुला...
सांग सख्या रे

ओळीवर कविता कवितांच्या त्या कम्म्यूनिटींचं आव्हान
मग बोलशील काय पण बनू पाहते मिस्स महान
पण त्यात तर अस कुठे म्हंटलय
प्रेम विरह आसक्त विरक्त कविता ...
म्हणूनच त्या ओळीवरची ही माझी कविता....
सांग सख्या रे

- शशांक नवलकर ३०/१/२०११

हे सगळ माझ्या मनातच आहे


तिचे हसणे
तिचा स्पर्श
तिचे हो बोलणे
तिचे नाही बोलणे...
तिचे रूसणे..
...तिचे लाजणे
तिचे अल्लड वागणे..
तिचे अलगद कवेत येणे
तिचे ते इतर बरेचकाही करणे...
काय यार ...
शिट्ट...
अजुनही .... हे सगळ माझ्या मनातच आहे

जाब....


झेंडा फडकला प्रजासत्ताक दिन साजरा झाला...
तो झळकता झेंडा..धुळींत माखूनी मलीन झाला
संदेश पोचवायचं काम केलं....
पण जग असं ही म्हणतं
एक झेंडा गेला तर तुमचं काय गेलं....
असेल जर भारतीय असला अस्सल........
तर मग तुम्हीच ठरवा पुढे काय होईल....
नाही सांगायचय मला कोणासही...
हे करा ते करा....?
विचारा स्वत:ला...
की तुम्ही काय कराल....

- शशांक २६/१

माझी कविता म्हणते कशी..


ओल्या पावसात भिजवायची
वेड्या पावसात भिजशीलच ना..
अस म्हणत अलगद हसायची..
अन मी मात्र तिच्यावर लिहायचो..
ओल्या आठवणी..पाऊसकविता....

रूप कोणाकोणाची दाखवयचीस तू
कधी तिच्यावर कधी हिच्यावर...
कोणाकोणावर लिहीशील रे ...
असच मला खट्याळ चिडवायची ती
मी आपला प्रत्येक कवितेत "ती"मय

आजकाल काय झालय रे तुला
त्या डायरीत संवाद सजतो आमचा..
शब्द तुझे गुलाम झालेत.....
वाटतय रूसलेत अन सोडून गेले मला...
प्रश्न...उत्तर काय विचारू....

कैकदा लिहीण्याचा प्रयत्न केला...
आज एक कविता दिसली....
एका खास भेटीस आलेली...
मग माझी कविताही म्हणते कशी..
नाही रे मी तितकीही अबोली..

लिही की... मी आहेच तुझसवे...
तुझ्या ह्र्दयात , तुझ्या मनात...
तुझ्या शब्दात........

- शशांक नवलकर 25/1/2011

मैफील रंगवू नका तुम्ही..२

स्वप्नंही पडत नाहीत आजकाल तिची
तिच्यासाठी..तिला अनुसरून...
चार ओळीही खरडल्या जात नाहीत...
...कसला हा रोग साला..
दारूचा नशाही आज चढत नाही...
प्रत्येक प्यालालाही तिची ओढ नाही...
नशापण आता नीरस झाला...
काहीच कसे चांगले वाटत नाही...
सगळीच मेली नकारघंटा
काहीच सकारात्मक घडत नाही...
घ्या इथे पण नाही...
जाऊ द्या ....
उगच...माझ्याकवितेवर ...
मैफल रंगवू नका तुम्ही...

- शशांक नवलकर २१/१/२०११

मैफल रंगवू नका तुम्ही...१

ओल्या पावसातही भिजणं आहे सजा
तुझी सोबत नाही मग कसली मजा..
आजकल सगळ्या कविता...
...गळून पडल्या आहेत..
कारण त्यांचे आता तू नाही...
निरर्थक ओवी सुटतात फुसक्या बाणांगत
रूपतात माझ्या मलाच आता
काय करू तुझ्या स्पर्शाचा नाजुकपणानाही...
जगतोय आता मस्त मजेत सांगून सर्वांना
खरच सांगतो ...
तुझ्याविना जगण्यात मजा नाही...
काय करू यार..........
खरच नकाच....
अशी मैफल रंगवू नका तुम्ही...

- शशांक नवलकर २१/१/२०११

Friday, January 14, 2011

.....

नजाने क्यों दिल धडकता था...
सोचता था तुम लौट आओगी
बरं झालं तू आली नाहीस...
मला माझीच हरवलेली वाट सापडली....

वक्त हमारा कम होता गया
बेवजह जिंदगी का गम बढता गया
अश्रू आजही ढासळतात तुला आठवताना
ह्र्दयाच्या त्या कोप-यात आठवणी साठवताना

शायरी भी करने लगा था
वजह थी बस तुम्हारी चाह...
कविताही अपु-या पडतात सखे
ढीगच्या ढिग कमी पडतील इतक्या

कोशीश की है मैने कुछ ऐसा लिखू
हर लम्हा हर पल उसमे तुम्हे याद रखू..
एक पहीला प्रयत्न...एकत्र करण्याचा
अशी नवी नवखी कविता लिहीण्याचा

- शशांक नवलकर १४-१-२०११

lost horizon...

i lost my way.....
in such a stupid dismay
'thought i could wish..
everything in a simple way...
but it never happened ..
as i wished...
why so nigative...
try being a little positive
खूप काही बदलू शकते...
स्वत:लाही बदलवू शकते....
कितीदा अश्या कविता लिहील्या...
शब्दही खुंटले...
सारा प्रवाहही थांबला
एक आगळी वेगळी कविता.
माझ्यासाठी...
नको त्या आठवणी...
नको ती जळकी गळकी पाने..
all i wish...
to go ahead .....
and fly.............
sky high.......

- shashank नवलकर १४-१-२०११

एक सुरूवात .....

एक सुरूवात .....

कित्येकदा असच लिहीत राहीलो...
स्वत:शीच अनेक गोष्टी ठरवत राहीलो
कधीच सगळ्याचा हिशोब लागला नाही...
जस ठरवलं तसं काही घडलच नाही...
वाटा बदलत गेल्या
काळ सरत गेला...
"नशीब माझं फुटकं.."
नाही मी मुद्दाम ते फोडत राहीलो....
खुळेपणा करत राहीलो..
पण आता नाही...
मार्ग दिसलेत..
उत्तरं सापडलीत...
हरएक प्रश्नाची उत्तरं...
एक नवी वाट ....
माझ्यासाठी..
त्या स्वप्नांसाठी.....
प्लीज!!! तिच्यासाठी नाही...
पण तिच्यासवे सुरू होणा-या पुढील प्रवासासाठी.....
एक सुरूवात...
माझ्या स्वत:ची

- शशांक १४-१-२०११

"एक"च

दोघांना दूर नेणारे
दोन प्रश्न...
दोन उत्तरं
एक सीमा
एक कारण....
एक भेद..
दोन मतांचा..
दोन जीवांचा....
एकच घटना....
एकच अर्थ....
एकच....
एकांत

- शशांक

Tuesday, January 11, 2011

birthday gift.....

हर एक आठवण देते साज तुझी
देवा कडे मागतो मैत्री तुझी..
असेच असेल जर नाते आपले खास
मग खरच...देवाकडे मागतो तूला… एक birthday gift

लहान असताना हट्ट धरला..
मोठ होऊन मोठ व्हायचा…
मोठा झालो आता..पुन्हा लहान व्हावस वाटते…
तेच सर्व काही पुन्हा मागावस वाटते…

नातं असतेच इतक खास…
की तुटताना अश्रू देऊन जाते..न विझणाय्रा जखमा देऊन जाते
मी अशी नाती टिकावीत.. हा प्रयत्न करतो…प्रार्थना करतो….
अटूट मैत्री राहवी तुझी-माझी..असच एखादे gift द्यावसे वाटत…

लिहीली कविता ही आज..
फक्त तुझ्यासाठी…
ह्याहून मोठे देणे मजकडे काहीच नाही..
कदाचित हेच आहे माझे birthday gift….
फक्त तुझ्याचसाठी…..

शशांक नवलकर ११/१/२०११

गोठलेली आठवण.....

ओल्या चिंब पावसात एकटच भिजताना..
नकळतच अश्रू दाटून आले डोळ्यात ...
आठवतो तो पाऊस तुझ्यासवे घालवलेला..
आसवंही सुखावली जगूनी तो पाऊस तुझा आठवलेला

जीवंत झालो होतो पुन्हा जगण्यासाठी..
नव्याने नवे जग अनुभवण्यासाठी..
माहीत नव्हते तू परत येशील
अन मला पुन्हा त्या निद्रेत पाठवशील

गोठलेत अश्रू... गोठलेत श्वास
आता उरलंय माझं शव बस्स्स...
तेही आता तुझ्यास्वाधीन करतोय...
एक गारठलेली आठवण तुझ्यासाठी वितळण्याआधी

- शशांक ११/१/२०११

अबोल शब्द.........

काहीसे हळवे..
काहीसे सालस...
थोडे हलके
थोडे नाजूक
कोमल...
सुंदर....
अबोल शब्द....

चांदण्या प्रकाशी.
जन्मला तारा...
ओवी बनल्या
कविताच सा-या
स्वप्न सोनेरी...
पूरे जाहले....
असे....त्याला
ते रूप चंदेरी

अबोला त्याचा
सोसवे ना...
शब्दांचा साठा
काही थांबे ना..
काही उरले
असेल तर...
ही माझी कविता...
अबोल शब्द..

- शशांक नवलकर ७/१/२०११

Wednesday, January 5, 2011

words within with me ....

words within with me ....

wrote words for a cause....
never wished or imagined a:plause
time passed by they made me
and as i wrote them..
they became words within me....

strong fragile were my words
passionate compassionate
ruled their worlds
still they resist and persist
my words within me with me ..

coming back to life was awsome...
just give a smile ohh that was precious ..
will i lose some someone made me cautious
all these words were my celebrations....
till they become a gift...my words within me with me

a true attire buried life or turning fire
these titles never been the part of my life
writing is my passion words are its possession
now they mean a lot to me .....
all they are my words within me with me

- shashank navalkar 04-01-2011

Sunday, January 2, 2011

भिजलेली पाने

अशीच पाने लिहीता लिहीता
आठवणी चालून गेल्या..
काळजाचे ठोके रोखून गेल्या...
खूप सारे अबोल...बोलून गेल्या
अन मज लेखणीस थांबवून गेल्या...
पण त्या गेल्या त्या गेल्याच
मनातील त्या कोप-याचा ओलावा....
ताजातवाना करून.......
गळून गेलेली पाने मोजत राहीलो..
तर अनेक पानं मिळाली...
कधी लव्ह लेटर्स तर कधी डेड लेटर्स...
आठवणींची शिदोरी संपत नाही....
प्रत्येक क्षण घालवलेल्याचा विसर काही पडतच नाही...

पूर्णविराम दिलेल्या पानी पुन्हा सुरूवात करीतो
नव्या वर्षासाठी आज एक संकल्प करीतो...
पुरे झाल्या आठवून ओल्या सुक्या आठवणी...
आहेत आता भरपूर अश्या जुन्या-नव्या साठवणी...
कोणी कोणासाठी नसतेच मग का थांबावे..
चालतच जावे चालतच जावे...
पण अजुनही तो ओलावा मनी कायम आहे...
त्याचे काय......

लिहीतो आहे अन शोधतो आहे अजुन
ती पाने गळून गेली....
अन तूर्त आठवणे अन लिहीणे...
चालतच राहयचे .... चालतच राहयचे

- शशांक नवलकर २-१-२०११