Tuesday, June 14, 2011

तो पाऊस होता




थेब ओघळले गालावरूनी....

अश्रूंच्या त्या धारा होत्या...

पाहीले मग स्तब्ध आभाळी

घन-नाद गर्जला होता...तेव्हा

गडद काळोख झाला होता....

शब्द बरसले बघता बघता

चिंब भिजवूनी पाऊस गेला



होता कोणाचा पहिला पाऊस...

होती कोणाची ओली आठवण

सारा झाला चिंब पसारा

पाहूनी तिलाच भिजताना...

होती ती परकीच जणू

पाहत तिला तिचा प्रियकर होता

लेखणी ही भिजली होती

लिहीताना तो पाऊस होता



नशा चढला त्या थेंबांचा

अश्रूही पीणे जमले होते

गोठण्यास काही शिल्लक नव्हते

होते ते ही आटून गेले...

मग आठवलेले मी रडताना

होता तोच वरूण राजा

पाहूनी मजला हसत होता

मग मी ही त्यासवे मैत्री केली...

ढाळता अश्रू भिजत असताना...



ते पानही पार भिजले होते....

लिहीता लिहीता थिजले होते

भिजलो होतो मीही लिहीताना..

कारण त्यातही तो पाऊस होता



- शशांक नवलकर १४.६.२०११

No comments: