३ मार्च सकाळचे ११ वाजलेले असतील मी माझी टेस्ट संपवून ऊठत होतो , मनात अनेक विचार येत होते मी पास झालो असेन वा नाही पण म्हंटले मनी जे व्हायचे ते होईल अन मागून ती नियंत्रक आली अन म्हणाली " तू पास झालास , ९४९... " काही क्षणांसाठी मी स्तब्ध होतो पण नंतर आनंद आकाशाएवढा मोठा झाला होता..... बाहेर पडलो तर एक मुलगी रडत होती.. दिसण्यावरून चांगल्या घरची होती पण मी विचारलं काय झालं ... न बोलता निघून गेली.... मी सर्वांना माझ्या टेस्ट ची बातमी सांगत होतो अन तेवढ्यातच ती मागनं आली अन म्हणाली.....
(सत्य घटनेवरून लिहीलेली ही कविता आज पोस्ट करतोय)
" i m fail "
"मी फेल झाले"
हेच ऐकायच होतं न तुला...
झालं का तुमचं समाधान...
ओरबाडलेल्या मनाला....
अपयशाचे घाव मिळाले...
अन त्या सळसळत्या रक्तासवे
मी सारे मिटवण्यास निघाले...
जगणे असते कशासाठी..
आयुष्य साकार करण्यासाठी...
स्वप्नं पूरी करण्यासाठी....
पण नको मला ते आता सर्वकाही....
खरच हे व्रण बुजवण्यास औषध असते तर ...
मला कोणतेच व्यसन नाही ....
कसलीच ओढ नाही...फक्त एक लक्ष होते...
तेही मी दुरावले..अपयशी गमावले.
नैराश्य घेऊनी घरी परतले
काय सांगू बाबांना....
कष्ट करून त्या माणसानी पैसे जमवले...
अन मी ते माझ्याच मस्तीत घालवले...
पण मी ठरवले..
जे घडले ते सत्य सांगायचे.....
वाट पाहत आसक्त उभा तो पिता..
मजकडे आशा ठेऊनी बघत होता
पण मी नीरस नजरांनी त्यांच्याकडे पाहिले.....
"बाबा.... मी फेल झाली" ....
एकच वाक्य क्षणभंगूर वेदनांच कारण
त्यांनी मला मिठीत घेतले
अन ते म्हणाले...
" पोरी तू पुन्हा नव्याने सज्ज हो....."
अन जो आत्मविश्वास निर्माण झाला...
तो अढळ होता...
खरच " thanks " ....
- शशांक नवलकर
No comments:
Post a Comment