वाट पाहिली त्या दिवसाची
वर्दळ दिसे जेथे सावल्यांची
अंध:काराने गजबजलेली...
एक डार्क कविता लिहिण्याची
जन्म जिथे मनुष्याचा...
उजेड जिथे प्रकाशाचा...
अस्त जिथे सूर्याचा....
उगम तेथेच सावलीचा...
अबोलतेपणी अजाणतेपणी...
सावल्याही होतात कधी बोलक्या...
अनेक वेदना अवखळ स्पष्ट होतात...
जेव्हा जिवंत भावनाही होतात मुक्या
जे शक्य नाही प्रकाशात...
होई साध्य ते अंधारात
लपंडाव तो सावल्यांचा
चालत राही...अनंतात
ओढ मलाही त्या सावल्यांची
लागते जणू एक नशा.
म्हणूनच लिहीतो एक कविता पुन्हा....
शोधुनी त्या सावल्यांची दिशा...
- शशांक नवलकर १०-४-२०११
No comments:
Post a Comment