Wednesday, January 9, 2008

शेकोटी आणि आग



आज तीच थंडी तीच गर्मी मला आठवते
तीच आग त्याच आठवणी तीच मजा आठवते
जितकी प्रखर जळत होती त्या शेकोटीची आग
आज प्रत्येकाचे आयुष्यसुद्धा असेच जळत असते

आयुष्याचा दिवा झळकला प्रज्वलित झाला
तो दिवा न विझणारा झाली त्याची मशाल
आज पेटली आहेत अनेक जगं पेटले आहे प्रत्येकाचे आयुष्य
उरला होता तो फक्त काळासर धूर अंधरात पसरलेला
राहीली होती फक्त राख व विझली होती प्रत्येकाच्या आयुष्याची शेकोटी..

त्याच आगीत विझल्या अनेक रात्री
त्याच रात्रीत पेटली होती ती आग एकदाच
जणू ती आग विझणारच नव्हती
पण त्या आगीचा अंत होता होता ती बनली त्यांच्य आयुष्याची शेकोटी...

ह्या शेकोटीमध्ये जळली अनेक प्रकारची आग
अनेकांनीच पेटवली होती ती आग अन त्यांचीच झाली होती राख
ती आग होती प्रेमभंगाची,अंधविश्वासाची अन प्रत्येकाचा शेवट करणारी
पण हळूच कोणीतरी पेटवली होती एक नवीन आग
ती आग होती प्रत्येकासाठी एक नव्या आत्मविश्वासाची

शेकोटी जळली फक्त त्या रात्रीपुरतीच
ज्यांनी त्यांची उब घेतली त्यांनाच कळली तीची मजा
जे त्या शेकोटीनेच आग पेटवायला गेले त्यांचीच झाली राख
पण ह्या आयुष्याची ही शेकोटी कधी विझलीच नाही

जळत होते सर्व काही होणार आहे प्रत्येकाची राख
पण आयुष्याची ही आग कधीच विझणार नाही
कोणीनाकोणी ती शेकोटी पेटवतच राहणार

No comments: