Sunday, January 31, 2010

"WRONG TURN"

माणूस चुकतो
सुधारतो..
चुकत राहतो
सुधारत राहतो..
पण कधी कधी एकदा चुकतो..
तो शेवटचाच...
चूक-अचूकाचा तो खेळ
अन एक wrong turn..

प्रेमात पडतात
हरवून जातात...त्या प्रेयसीत
आयुष्य हरते...सारे काही हिरावते
कोणी सांगितले?
प्रेमात पडायला...
प्रेमात पडणे-तुटणे फुटणे....
breakoff करणे...
रडत बसणे
आणि बरेच काही..
मग एक wrong turn...

अपयश येते
नैराश्य येते........
खूप दु:ख होते
दारूत तुंडूब बुडावेसे वाटते....
नशा करावसे वाटते...
मग एक वेगळा नशा...
"बाई"...
एवढ्या उचापती कशसाठी?
यशासाठी की अपयशासाठी...
खरच या सगळ्याची गरज असते का ?
असाच...
यश अपयशाचा हिशोब...
अन एक wrong turn....

चूक - बरोबर
प्रेम - ब्रेकोफ - विरह
यश - अपयश - नशा - मॄत्यू
या सगळ्याची साखळी
अश्या अनेक साखळ्यांची माळ
कशासाठी? ...???
प्रत्येक वेळी
wrong turn असायलाच हवा का ?

- शशांक नवलकर १०-१-२०१०

No comments: