अखेर....
तिने ते बंड जिंकले....
त्या भिंती...अन त्यावरील गिधाडं
सा-यांना मात देऊन
ती निघाली....
धावत होती...पळत होती...
जग धावत होते..थांबले होते..
ती सुद्धा...
तिचे तिलाच कळत नव्हते..
नकळतच कुणा परगावी...
माणूस माणसास अजाण जेथे
असे एक नगर..विस्कटलेले...
प्रहर रात्रीचा..
दॄष्य तेच शेकोटीचे..
अन विस्मरलेल्या आठवणी...
पेटून उठल्या....
अग्नीच्या मंद प्रकाशात...
अजाणतेपणी कोणीतरी स्पर्शले...
निर्विकारपणे...निर्लज्ज....
मागणी.....
शरीराची..व्याभिचाराची....
अनावरला क्रोध तिचा...
जणू क्रोधधारी चंडिका...
शिर छेदिले करवतीने.....
पुन्हा एकदा लाल रंगाच्या गुलालाने...
तन तिचे बरबटले...
मन तिचेही तेव्हा निर्विकार झाले..
आजवर कोणत्याही स्त्रीला तेथे...
कोणी छेडले...नाही
ना कधी कोणीच पुरूष तेथे आढळले...
मी एक दिवस news मध्ये पाहिले....
पोलिसांनी तिला कैदेस नेले..
स्त्रीशोषणास लढा देण्याची
हि शिक्षा..?
असेच असते का न्यायाचे तंत्र....
कधी कोणीच जगू शकत नाही का ?
स्वतंत्र......
- शशांक नवलकर १७-१-२०१०
No comments:
Post a Comment