रात्रीचे दॄष्य आजही आठवते
टांगलेल्या बाबाचे...
.
.
तीच रात्र...
तीच रूम
पण माणसं नवी...
त्या दोघीजणी
एकमेकींस अनोळखी..
त्या मुलीला शेकोटी बघायला आवडते
शेक घेण्या ती तेथे गेली...
अंधार..
थरथराट..
कर्कश्श आवाज..किंकाळी
अन सर्व बांध फुटले.....
अश्रू वाहू लागले..
रक्त सुद्धा........
बस्स...
पुन्हा ती कधीच
उभी राहू शकली नाही....
शेवट नेहमी सुरूवातीलाच होतो...
सुरूवात शेवटापासून करावी
उरली होती ती एकली
थरार अजुन वाढत होता...
त्यांना कोणी थांबवणारे नव्हते...
ती स्त्री...धाडसी
न कोणास बिलगणारी...
पण धरणीकंप होता सारे काही कोसळतेच
घेराव घातला...
मिळून करू बलात्कार....
त्यांनी ठराव मांडला....
तेव्हा रात्र निजत होती..
न कोणी ऐकणारे न कोणी बघणारे
होत होता "GANG BANG"
बांध फुटत होते बंधही तुटत होते
रक्त वाहीले सर्वत्र......
झाले सारे काही शांत
ऐकू येत होते तेव्हा फक्त
"BANG BANG"
पण ते रक्त तिचे नव्हते.......
- शशांक नवलकर १०-०१-१०
No comments:
Post a Comment