Sunday, January 31, 2010

जागते रहो!!!

रोज रात्री
एक आवाज ऐकू येई........
"जागते रहो"..
वाटे कोण म्हातारा कान खातोय
रोज रात्री रूम वर जाताना...
शेकोटी पेटलेली पहायचो...
काही माणसे पाहायचो...
बाराच्या सुमाराला
नेहमी आवाज ऐकू यायचा...
"जागते रहो"....
एक थंड रात्र....
लवकर घरी परतताना..
सर्वत्र अंधार होता..
शेकोटी दिसत होती...
माणसे हसत होती..........
आज तो आवाज आला नाही...
माझा डोळा काही लागला नाही...
काही चुकल्यासारखे वाटले...
खिडकीबाहेर डोकावले.........
पुन्हा कधीच झोपलो नाही....
त्या म्हाता-या बाबाचे
शव उलटे टांगलेले....
रक्त शिरातून गळलेले.......
अन लिहीले होते.........
"जागते रहो"

- शशांक नवलकर ९-१-२०१०

No comments: