Sunday, January 31, 2010

chemical romance (भाग १,भाग २,भाग ३)

chemical romance भाग १

त्याने दगडाने ठेचले होते...
काय कारण होते.?
तिने गर्दना छाटल्या होत्या
कशासाठी??
त्यांचे नाव गाव काय होते??
ते कोण होते
काय माहित ???
बापाच्या सुडासाठी...
ठेचले ज्याने
तंत्रद्न्य म्हणून गुणगान त्याचे...
विदेशी तरसूनी आला
परतूनी बापासाठी....
त्याणे वाहिला देह बापा वैंकुंठा....असा....
तो महेश.............
पिता-प्रेमासाठी आयुष्य सोडले...
सा-या जगाशी वैर जोडले....
दैवानेही पाठ दाखविली...
तरीही....
त्याचं नशीब काही और होते..
दुष्कॄत्यासाठी कैदेस नेले...
पण तो कधी तेथे गेलाच नाही ????!!!!.......
============================================================
chemical romance भाग २

आयुष्य जगण्या
सुंदर स्वप्ने रंगविली...
आकाशी उंच उडण्यास...
भरारी घेतली....
ती....कोण होती.....
मदनिका..भवानी...सटवी....गावभवानी.....
नाही..यापैकी कोणीच नाही !!
लावण्यवती बुद्धिमान....अशी..
प्रामाणिक विद्यार्थिनी...अन शिक्षिका....
वैशाली..........ती...
इभ्रतीसाठी....झटली...
इवल्या पोरीचा जीव वाचवण्या
स्वत:च हलाल झाली........
पण जीव गेला तो गेलाच........
त्या इवल्या पोरीचा अन त्या अनेक पोरांचा
सुद्न्य असूनही...वेडास शरण जाऊनी.....
जगास वेड लावले....
अन पुन्हा एकदा त्यांचेच लक्ष वेधले.......
ती कैदेस कधी गेलीच नाही !!???

============================================================

chemical romance भाग ३

"प्लीज मला इथून सोडवा.....
मी वेडी नाहिए.........."
"तो माझा बा होता.....
त्याने कोणाचे काय बी केले न्हाय"
ते किंचाळत नव्हते....
एक मेकांस सांगत होते...............
अचानक...
त्यांच्या van जवळ स्फोट झाला....
सारे काही सुन्न्न झाले....
कोणास काहीच ऐकू येत नव्हते......
ते दोघे ही हातात हात धरून पळाले ??!!
का ??
पोलीस त्यांच्या मागावर होते.....
पण ते पळत होते..........पळत होते..................
एका रसायन कारखान्यात गेले...
थंड वारा...चांदणे.....एकमेकांकडे बघताना...........
असे काही नव्हते.....
शीत वातावरणात
दुर्गंध अन कोंडणारे श्वास....
अपर्यायाने त्यांना बाहेर येणे उणे
वाटेत शेकोटी..दिसली...
.
.
.
.
.
दोघांनी एक-मेकांस मिठी मारली....
पोलीसांनी दोघांस एकत्र पाहता गोळी मारली...
अन.................

- शशांक नवलकर १८-१-२०१०

No comments: