Sunday, January 31, 2010

अनामिका..

मनी अनेक स्वप्ने असे
ती पूर्ण करण्या सामर्थ्य तसे
सुंदर कूरूप यात मतभेद नसे
अश्या सोज्वळ स्वभावाची....
अनामिका...असे
आयुष्य तिच्यासाठी रंगमंच असे
माणसं सगळी कठपुतळी अन
त्यांचा सूत्रधार तो वरचा असे..
अन ती तिच्या जगाची राणी...
असच काहीतरी boaring
मी लिहीत असे
पण एकदा....
एक प्रसंग तिच्या आयुष्यात आला
जणू तिला पूर्णत: बदलून गेला...
दुपारची वेळ
ती आपल्यातच गुंग...
दोन स्त्रीयांनी ओरबारडले....
तिच्या अंगावरून रक्त वाहू लागले...
तिला केसांनी फरफटत..
एका अद्न्यात ठिकाणी नेल
म्हणे त्याला "असायलम" म्हणतात .
अश्या ठिकाणी वेड्या लोकांना ठेवतात ...
अनामिका वेडी ??? का ?
स्वप्न बघणारी माणसे वेडी का ?
आयुष्य - कटपुतलीचा खेळ समजणारी वेडी का ?
देवाला त्याचा सुत्रधार मानणारी वेडी का?
काय करणार
आजकाल सगळीकडेच वेड्यांचा कारभार...........

- शशांक नवलकर १२-१-२००९

No comments: