क्षितिज - भाग १
आगीतून क्षितिजाकडे जाताना...
मी त्या दोघांना पाहिले........
त्यांच्या शवांवरती अश्रू-फुले वाहीली..........
खरच.....कधी वाटले नव्हते...
थरारून जाईन मी ही इतका.........
त्यांच्याबद्दल लिहीताना.........
आयुष्यावर काय सगळेच लिहितात..
मी पण लिहीलय कित्येकदा...
त्यांच आयुष्य........
लिहीताना.....
माझ्या अंगावरही काटा आला होता
काट्यांतून वाटा काढणारे त्यांच लक्ष्य....
त्यानेच माझे लक्ष वेधले.
त्यांचे लक्ष्य काय होते?
माहीत नाही.......!!
त्या प्रत्येक शब्दात.....
मी त्यांचं आयुष्य जगुन पाहिले........
खरच......
तेव्हा कोठे कळले होते
लक्ष्य नक्की काय असते
================================
क्षितिज - भाग २
लोकं म्हणतात......
तुझ्या कविता वाचल्या की...
अंगावर काटा येतो.........
मग मला सांगा......
त्यांच काय होत असेल......
जे असं आयुष्य प्रत्यक्ष जगतात..........
एकाच कवितेत किती प्रश्न....?मलाही पडलेले.......
त्यांच जग...त्यांची स्वप्नं...त्यांची दु:ख
लिहीताना.....अनुभवताना..........
सगळा प्रश्नोत्तराचा खेळ असतो
जो जिंकेल...
तो एक नवीन प्रश्न असतो..........
मग खेळ पुन्हा सुरू.....
लपंडाव....पकडा-पकडी....चोर-पोलीस
अन व्हू...डेअर्स विन्स...
नशीबाचा.....
(नव्यानेच महतीस आलेला एक खेळ "bang bang")
================================
क्षितिज - भाग ३
ह्या सगळ्यात...........
खूप झिजते........
खरच.....असच असतं का जीवन....
जगण्यासाठी...मरण्यासाठी......मारण्यासाठी...;
जिंकण्यासाठी ?!
असच जिंकायच होतं
त्यांना त्यांच क्षितिज........
पण.....
नियतीचा साला खेळच निराळा..
त्यांना त्याच्या क्षितिजापर्यंत
पोचवता...पोचवता...
त्यांनासुद्धा वर पोचवलं........
जाता जाता खूप घेऊन गेले.........
अन एक गोष्ट देऊन गेले......
जगण्याची एक नवी आशा....
पार करण्यासाठी डोळ्यासमोर ठेवले होते.......
एक नवे क्षितिज..........
त्यांच लक्ष्य......त्यांच क्षितिज
काय होतं माहित आहे का?
नाही ना....?
विचार करा........
नक्कीच सापडेल
- शशांक नवलकर २०-१-२०१०
No comments:
Post a Comment