Sunday, January 31, 2010

बंड....

थरथरते अंग..
भिजलेले ओले चिंब..
सगळे भुकेल्या नजरेने बघत होते....
हात पाय बांधलेले...
अशी मी एक वेडी...
कोण मी?
मी वेडी नाही.......
तुम्हाला मी भीत नाही.
मागणे आहे मला...
त्या ईश्वराशी..
ज्याने मला बनविले..अन मला...
का ? ह्या नर्कात घालविले........
हटणार नाही मागे मी आता
कोणात असेल दम...
या रोखून दाखवा...
पुकारले आहे मी आता बंड....
.
.
येथे छळणा-याही स्त्रीया..पिळणा-याही
"लेज" म्हणून मिरवणा-या डिवट्या
मला इथून निघायचय..
कोणी माझे ऐकतय का ?
प्लीज मला इथून बाहेर काढा...
कोणी ऐकतय का............?
पुन्हा तेच ऐकू येई
"चुप बैठ ___ साली...."
मी म्हंटले...
"तु कौनसे घी से बनी है"
पुन्हा माझ्यावर हात उगारला गेला...
तोल तेव्हा माझाही सरकला
काय होत होते कळत नव्हते
जणू ह्यालाच कोणीतरी "असायलम" नाव दिलं होते
मीही आघात केला...
त्या सटवीचा खून केला...
बस्स्स्स झाली ती पिळवणूक....
अखेर मी मुक्त झाले...
आयुष्य जगण्यासाठी..
मोकळे श्वास घेण्यासाठी...
पाखरासारखे बागडण्यासाठी.....
मग मागून एकाने विचारले..
"क्या आयटम रेट क्या है तेरा ?"
.
.
ते असायलम होते की कारखाना ??
"बार"कोड असेलल्या बाहुल्यांचे दुकान...
का एक चक्र..
नर्कातून नर्कात अन नर्कातूनच नर्कात ...
कोणी सांगेल का ?

- शशांक नवलकर १४-१-२०१०

No comments: