Sunday, January 31, 2010

"असायलम"

दूर कोणत्या ठिकाणी
अंधार्या खोलीत मला ढकलून दिले
बोटांची नख विखुरलेली
केस विस्कटलेले
अंग घामाने बरबटलेले.........
अन माझ्या नावापुढे शिक्का..............
वेडी !!!
का?
मी वेडी नाहीये ............
मला वेड लागलेले नाहीये...
रक्ताबद्दल रक्त
आणि हिसाब बराबर
हाच हिशोब आहे ना ह्या जगाचा
मग मी हि तोच मांडला होता ना
सर्व म्हणाले तोंड काळे करून आली भवानी
मग मी हि त्यांना म्हंटले
आज मी तोंड काळे नाही........
........लाल करून आलेय
म्हणून मला इकडे फेकले......
त्या मुडद्यांनी
अंधार्या खोलीत मला खुप भीती वाटते
काका मला प्लीज इथून बाहेर काढा
प्लीज इथून बाहेर काढा ...........
.
.
.
.

मागून एक सावली आली..........
सावलीतून एक हात माझ्या खांद्यावर पडला .............
अन माझ्या तोंडावर जोरात आघात झाला .........
कोणीतरी माझ्य्हा कानाखाली ठेवून दिले
अन कानात फक्त घुमत होते.........
चूप बैठ "....." साली
पागल कही की.........................

- शशांक नवलकर १२-१-२०१०

No comments: