त्या रूमवरची पोर
म्हणे आजकाल उघडी नागडी फिरते
कुठं गेली ती...
कोणी सांगेल का ?
कोणाकडे गेली ती
सांगेल का ?
लोकं म्हणतात
आजकाल ह्या ठिकाणी कोणी फिरकत नाही...
त्या भिंतीवर काय लिव्हलय...
म्हाईत हाय न पोरा...
कोणी ह्या शिवाय काहीच का बोलत नाही???
जेव्हा पाहिले मी तिथे...
पडले होते कुजलेले शव तेथे....
अन भिंतीवर लिहीले होते
"जागते रहो"
का कोणी ह्या शवास उचलले नाही..
का त्याचे कोणी पोस्ट मोर्टम केले नाही...
का ते असेच सडत राहीले...............????
.
.
.
.
"थांबाआआआआआआआआआआआआआअ"
ते प्रेत काहीसे ओळखीचे भासे...
कधीतरी पाहिले काही सापडले असे...
माझा फोटो या प्रेताकडे कसा...
माखल्या रक्तबंबाळ हातांनी
प्रेतास त्या उचलले.....
दूर ठिकाणी त्यांचे
मी अंत्यसंस्कार केले............
काय गरज होती...मला
ते सर्व तरीही केले
कारण...................
.
.
.
.
.
.
.
.
.
"तो माझा बा होता"
- शशांक नवलकर १४-१-२१
No comments:
Post a Comment