हम्म...
दर वर्षीप्रमाणे आजही तेच झाले
जे व्हायचे तेच झाले
जगण्यासाठी..
कोणाला तरी मारावेच का?
आजही कोणीतरी जीव देतय
तितकाच जीव घेतय.......
कोणासाठी...कशासाठी...कशामुळे..
उत्तर आहे का ?
स्वप्न होतं त्याच्या बाबांचे आईचे
रोज त्यांच्या स्वप्नांची राख होते...
सिगरेटच्या ashट्रे मध्ये
त्यांच्या कष्टाचे चीज.....
चाखनाच्या प्लेट मध्ये संपते
हे असले चिल्लर जगणे कशासाठी..
स्वार्थासाठी...पोटासाठी....प्रेमासाठी!
उत्तर आहे का ?
मोठ्या आशा-आकांक्षांचे आयुष्य
अपयशासाठी संपवले जाते
असे !
त्या आई-वडिलांचा काय दोष
मित्र-आप्तेष्टांचा काय दोष...
उत्तर आहे का ?
हे असच चालू राहील का ?
की सारे तसेच चालत राहील.......
- शशांक नवलकर ९-१-२०१०.
No comments:
Post a Comment