Wednesday, June 18, 2008

विझलेले अस्तित्व


उन असो पाऊस असो...
ती रात्र एक सारखीच असते
सुर्यास्त असो वा सुर्योदय
आमचे अस्तित्व हे विझलेलेच असते

आपल्या आपल्यांसाठी भटकत असतो
पोटा-पाण्यासाठी भरकटत असतो
सुर्यअस्त होता.... अंधार पसरता....
आमचे कोणीच नसते....न आम्ही कोणाच्या असतो

चिखलात फेकून चिखल उडवतात
कमळ बनवून कळ्या उधळतात
जळफळत्या आगीत जळत असतो.....
आग शांत होत नसते पण अस्तित्व.... विझलेलेच असते

सुर्य उगवता जगण्यास वेळ नसतो
सूर्य मावळता जगण्यासाठी खेळ असतो
प्रेम माया आपुलकी सारे फक्त शब्द
प्रत्येक रात्र का असतो आम्ही फक्त नि:शब्द्

जळत्या काडीसारखे आम्हाला विझवले जाते
काचेच्या बाहुलीसारखे सर्वत्र खेळवले जाते
आमचे प्राण हे आमचे नव्हतेच कधी.....
शिल्लक आहे फक्त अस्तित्व जे कायम विझलेलेच असते

Sunday, June 15, 2008

ही कविता फक्त तुझ्याचसाठी....


आपल्याला आयुष्यात अनेक लोक येता-जाता भेटतात.. भेटीचे माध्यम वेगवेगळे असू शकते.... online असो किंवा
offline.... ती भेट एक वेगळाच अनुभव असतो. काही लोक क्षणार्थी स्मरतात... तर काहील लोक क्षणार्धात विसरून जातात... पण माझ्या आयुष्यातील एक अनुभव... एक भेट...त्या व्यक्तिसाठी एक खास कविता...




दु:ख प्रेम...यातना भावना
हास्य अश्रू.. हे सारं कोणासाठी
तू आहेसच खास...तुझा सहवास
करतो ही कविता फक्त तुझ्याचसाठी

उन पाऊस वादळ वारा
शब्दच असे असतात...वाहून जाण्यासाठी
तुझी मैत्री तुझा विश्वास जिंकण्यासाठी
तुला ही कविता फक्त तुझ्याचसाठी...

नाते तुझ रहावे असेच अतूट
तुझा विचार येता शब्द होती एकजुट
विसावतात तुझे शब्द तुझ्या आठवणी....
त्यातूनच बनते माझी कविता... फक्त तुझ्याचसाठी....

कधीतरी तू वाचशील ही कविता...
माझ्या भावना, माझे शब्द तुला कळ्तील
तुझ्या आठवणी तुझे बोल आठवतात...
म्हणूनच करतो आज ही कविता फक्त तुझ्याचसाठी

तुझ्यासारखी कोणीच नाही....


कधी न वाटले होते आज....
तुझी मैत्री ठरेल इतकी खास
आठवतो तो क्षण ....
तुझ्याशी पहीलाच बोलताना....
तुला hi बोलताना....तू bye बोलेपर्यंत बोलताना....
रागवायचीस तू प्रत्येक वेळा जशी आज
म्हणायचीस आलाय तुला भलताच माज
पण तरीही वाटायचीस मला तू खास....जशी आहेस आज
जेव्हा पण तुझी आठवण यायची...
मनात काय ह्र्दयात तुझी काळजी असायची
तू समजत नव्हतीस मला नाही समजलीस आज
पण मी तेव्हाही तुला समजलो होतो अन आताही समजत आहे
best friend...प्रेयसी....एक छान व्यक्तिमत्व कसं असाव
हे फक्त तूच अन तूच सांगू शकतेस...
अन मी ही तुझ्याबद्दल हेच सांगतो सर्वत्र...
तुझ्यासारखी कोणीच नाही....

Sunday, June 8, 2008

रात्रीचा पाऊस



नभ दाटून येता...
थंड वारा वाहतो
सूर्य अस्त होता....
वरूणराजा बरसतो

लखलखती तो प्रकाश
वीजांचाच तो लखलखाट
बरसता सरी नाद बेधुंद
पसरती माती साथ सुगंध

चिंब चिंब होऊनी पावसात
विसावते माझे मन तिथे
तन मन मज बहरते....
ती रात्र पावसात बरसते जिथे....

वादळ.. वारा... गडगडाट
सर्व काही असे ही रात्र
बरसातात सरी घननाद अश्या
ह्या रात्रीच्या पावसात....

तू भिजतेस तेव्हा....




थेंब थेंब चिंब करती मला..
असा पाहतो मी तूला
वेड लागते आज पाहून तुला
तू भिजतेस जेव्हा...

नाते तुझे माझे काहीच नाही
पण का जुडते ते नाते पुन्हा पुन्हा
थांबवूनी सारे....स्तब्ध नजरांनी पाहतो तुला
तू भिजतेस जेव्हा...

चिंब चिंब तुझे तन...मोहले माझे हे मन
सळसळती हवा...तुझ सौंदर्य.. भिजवते मला
नाही सोडवे तुझा लळा....पहत रहवे तुला...पुन्हा पुन्हा
तू भिजतेस जेव्हा...

क्षण तो यावा पुन्हा पुन्हा...
पाहत रहावे तुला पुन्हा पुन्हा
हातात हात घेऊनी भिजावे तुझ्या सवे...
वाटते हे सारे मला पुन्हा पुन्हा...
तू भिजतेस जेव्हा ....

Wednesday, May 28, 2008

पुन्हा भेटीस येताना...


क्षण तो आज आला आहे....
दिस तो आज उगवला अहे
ह्र्दयच नाही डोळे मज भरून आले
तू पुन्हा भेटीस येताना.....

न विसरता तुझा स्पर्श
दिवस विसरत गेले सहर्ष
पण असेल तो क्षण खास..
क्षण....तू पुन्हा भेटीस येताना

सजले होते तेव्हा सजले आहे आज
तुझ्या आठवणींत किती सरले सांज
स्वप्नांतली ती सांज..आज ठरेल खास
जेव्हा एक होईल तुझा अन माझा श्वास

जगले प्रत्येक क्षण तुझीच आस
सहला होता एकट्यानेच तो त्रास
खरच आहेस तू की फक्त तुझा भास
गुरफटता तुझ्या मिठीत..तुझाच गंध...तुझा सुवास

वेड हे माझे की तुझे शाहाणपण
नाही राहवत आता एकही क्षण
वेड्या थांबव ना आता हा खेळ
तू नाही आलास तर संपवीन ह्या आयुष्याचा खेळ.....

आठवतात ते क्षण तू मिठीत घेताना
सतावतात हे क्षण तू मिठीत येताना
आता नाही राहवत तुझी वाट पाहत मला
सजवलय बघ मी माझे जग........तू पुन्हा भेटीस येताना

मानवंदना.....




शब्द माझे अपुरे पडतात...
आठवणीच तुझ्या आज पुय्रा पडतात...
भेट होती काही क्षणाचीच
पण नाते जुळ्ले हे कायमचेच

संबंध नव्हता तुझा-माझा
ओळखत नव्हतो तू मला मी तूला
संबंध आहे आता तुझा-माझा
मायेचा..प्रेमाचा...आपुलकीचा..

जीते आयुष्याहून मोठे सत्य नाही
कर्म आहे तुझे श्रेष्ठ असत्य नाही
सौंदर्य सजते तुझे असे निखर....
मनापासून सांगतो..जिंकशील तू आयुष्यातील प्रत्येक शिखर.

नाते तुझ माझ्या शब्दांस निमित्त
ते आजे एक अनमोल बंधन
नाते तुझे माझे असेच राहावे अतूट

करतो आहे ही मानवंदना तुला
आनंद होतोय आज मला
अर्पिले आहेत हे शब्द आज फक्त तुझ्याचसाठी
ह्या नात्यासाठी ... तुझ्या व्यक्तिमत्वासाठी ....

@शशांक

Saturday, May 24, 2008

वेड....


विसावते माझे मन आज इथे
माझ्याच जगात माझ्याच मनात
वेड आहे मजला ह्या जगाचे...जीवनाचे
कोणी थांबवू शकते का हे वेड... नाही कोणीच नाही

वेड आहे मला ह्या रंगांचे..ह्या कलेचे
चित्रकार मी...माझ्याच आयुष्याचा
रंगांत मिसळून गेलो आज
रंगहीन चित्रच होते मज आयुष्याचे
थांबले का हे वेड नवरंगांचे.... नाही कधीच नाही

वेड आहे मला शब्दांचे... शब्दांतून घडणाय्रा जादूचे
ही जादूच आहे का माझे शब्द... की माझ्याच शब्दांचा खेळ
जीवनातील अनेक शब्द असेच पुसले गेले
पण मे थांबलो नाही माझेच शब्द आहेत माझ्या ओळी...माझ्या कविता......
कधीच संपणार नाहीत ह्या ओळी ना हे कवितांचे वेड
थांबणार नाही हे वेड शब्दांचे.... नाही कधीच नाही

मी आहेच एक वेडा....तुझ्या प्रेमाचा वेडा
तुझ्यासाठी चित्र काढतो....कविता करतो
अनावर झाले आहे हे असे सर्व म्हणतात..
पण कुणाला माहीत मजा ह्याची न्यारीच
कोणीच नाही थांबवू शकत तुझ्या प्रेमाचे हे वेड नाही कधीच नाही

@शशांक

Thursday, May 22, 2008

वेडी....


नीलस डोळ्यांची तिखट नजरांची
तु हसताच पडणारी खळी
घेते कसा माझा आज बळी
देह तुझा मोहक सुंदर असे
झालो मी तुझ्या प्रेमात असा वेडा..........
पण हे सर्व तुझ्यासाठी नाही ग.....
कारण तू आहेस एक वेडी........!!!!
वेड हे कोणाला नसते
पण तुझं वेडच आहे निराळे
रंगातून रंग रंगणारी
शब्दांतून शब्दांच्या पलिकडे जाणारी
आहेस तू एक अनमोल.... वेडी.......!!!
अप्रतिम आहेत तुझ्या कल्पना
खूपच सुंदर आहे तुझी आवड
मोहते मला सुद्धा तूझी ही निवड
पण मज का कळेना... आहेस तू एक वेडी!!!
वेड लागते सर्वांनाच पण कधी ते दिसते कधी ते लपते
दाखवतेस तू तुझे वेड मजला
लागले मजलाही तुझे हे वेड
वेडा झालो मी पण आता.....होशील का तू माझी वेडी!!!!

आता हिला सोडा हो.....


पहा करते ही किती नखरे..........
एक नाही दोन कीती मिळावते बकरे
नसतो हीला कोणाचाच लळा
पण एकटीच करते सारा पब्लिक गोळा
ओठांत असते हिच्या वेगळीच नशा
करतायत सारे हिच्यामागे उचापत्या
पोरींना आलाय भरपूर राग
जळवलीय तिने त्यांच्या स्वप्नातील बाग
हिच्यासाठी कंपनीपण भारी अन कंपन्या भारी
मोहात पडले व धाडकन पडले
तिच्या प्रेमात काय सारे बडबडगीत जमले
काय करावे हिचे...लागलाय सगळ्यांनाच लळा
हिम्मत आहे का... हिचा कोणी दाबेल गळा
काही होऊ शकले नाही आजवर....सारे आले आता वरवर
म्हणून म्हणतो हिचा नाद सोडा.....
सस्पेंस नको आता climax आला....

सांगाल का ही म्हणजे कोण....सांगा...सांगा
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अहो विचार काय करताय....दारू
आतातरी हिला सोडा हो...........

Monday, May 19, 2008

माफी मिळेल का.....


शब्द तुझे आज आठवतात...
मनात खूप काही साठवतात
कोपय्रात मनाच्या राहूनी उभा
ते क्षण....त्या आठवणी..पाहत असतो

नादान मी त्या चित्रांत
पाहतो आज चित्रापलिकडे
काही नाही तिथे ना राहीले कोणी
गुनाह जाहीला असा मजकडून..
परमेश्वरा...माफी मागतो मिळेल का ?

अनेक डोळे झाक-झाकूनी
गमविले सारे आज
उघडतो डोळे आज सावरूनी
डोळ्यांत अश्रूंची धार राखूनी

नको हवा कोंडा आयुष्याचा
घुसमट होते आहे आज
पुन्हा उगवतो उभा राहूनी
ना आता उरली कसलीच आस

गुनाह केला आहे....प्रायश्चित मिळेल का
चुकाच आहेत अनेक....दुसरी संधी मिळेल का
प्रेम नाही तिरस्कार आहे...माणुसकी मिळेल का
माफी मागतोय आज तुमची....माफी मजला मिळेल का

Thursday, May 15, 2008

तुला पटवताना....


तुला पटवता पटवता आले नाकी नऊ
पण तू मला काही पटत नाहीस
आयुष्याचा इतिहास-भूगोल करून झाला
तरी तुझा विश्वास काही बसत नाही

आता तुला जिंकू तरी कसे
काय करू सांग स्वप्नात पण तूच असे
प्रिये एकदा हो म्हणतेस का
तू माझा मी तुझी म्हणतेस का

लिहीतो ह्य ओळी पहीलाच
पोरगी पटवायला कविता ही पहीलाच
म्हणेन.. "अब मान भी जाओ मेरी जान..."
म्हणू नकोस... "चल हट यू इडियट.."

प्रेमात पडून झालाय डोक्याचा हा भुका
करतोय का मी आता इवल्या इवल्या चुका
कधीतरी माझ्यासाठी तू येशील काय...
प्रिये या राज्याची तू राणी होशील काय

Tuesday, May 13, 2008

ctrl+alt+delete........


एक एक क्षण आयुष्याचा
filter होत असतो...
सु:ख...दु:ख..यातना ctrl करत असतो
पण कधीतरी व्हावे हे आयुष्य switch
च्यायला...नशीब माझं सारख time out होत असत
एखादी पोरगी आयुष्यात login करून जाते
अन एक मोठ fatal error देऊन जाते
प्रेम करावे की नाही ह्यातच मी hang होत असतो
एकटाच dump होऊन crash होत असतो
सुख मिळवण्यासाठी सर्वत्र esc करावे लागते
नाही मिळाले तर दारू अन नशामध्ये shift व्हावे लागते
का ही दु:क यातना कधी alt होत नाहीत
प्रत्येक वेळी मलाच का सगळे delete करावे लागते
सर्व काही विसरून शेवटी restart करावे लागते....
पण आयुष्याची process जगण्यात सुद्धा मजा असते
नको त्या process kill करून टाकाव्यात
मग बघा आयुष्य जगण्यात काय मज्जा असते
नको असेल जर सु:खी जीवन तर मारून बघा हा shortcut
करून पहा तुम्ही तुमचे आयुष्य ctrl+alt+delete....

@शशांक

Thursday, May 8, 2008

तू जाशील तेव्हा



एक होती परी ..
गोडस होती खरी
ती माझी नव्हती तरी
आवडायची आपल्यापरी

होती ती इतकी खास
कधीच सरली नाही तिची आस
वेड्यालगत हवा होता तो सहवास
उरलाय आता फक्त तिचा आभास

आवडत होती ती मला खूप
मोहात पडलो पाहून तिचे रूप
हो तिने कधीच म्हंटले नाही
मज वेड्याचे हे प्रेम कधीच संपले नाही

आज तिला हाक मारतो
प्रिये तू थांबशील का...
हा वेडा तुझी वाट पाहत राहील
तू जाशील तेव्हा...तुझी वाट पाहत राहील

Sunday, May 4, 2008

बंडखोर तो........


शब्दांत कधीच नव्हता तो
बोलायचे होते खूप अबोल होता तो
जगत होता जगणाय्रासाठीच
पण...जगण्यात त्याच्या जीवन नव्हते
जगतो आहे आज फक्त जगण्यासाठीच...
प्रेम केले त्याने मनापासून ह्रदयपर्यंत
का कधीच त्याला ते मिळाले नाही
झाले तुकडे ह्र्दयाचे अनेक
जोडतो आहे तेच ह्र्दय तो पुन्हा पुन्हा
एकांत अवकाश उडू पाहणारा खग तो
उडण्यापरी पर छाटलेला खग तो
न कोणी आहे त्यासाठी आज ....
मिळवतो आहे तो सर्वस्व आज
प्रेमात आहे तिच्यावर पण....
आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवली..तिथे असतो "पण"....
मिळते नव life दररोज...का असतो तिथे नेहमीच sacrifice....
उभा राहतो तो अनेकदा पडून
थांबला का....?नाही कधीच थांबणार नाही तो
ह्र्दयातून गहिवरलेला....हसत मुखवट्याचा
हरलेला आहे पण जिकण्यासाठीच जगणारा
माझ्या कवितेतुन उगवलेला पहिलाच असा बंडखोर तो........

Saturday, May 3, 2008

बंडखोर ती ....


शब्दांत माझ्या असते ती
बोलते मज शब्दांतून निशब्द ती

जगते जगणाय्रांसाठी
पण स्वत:च्या जीवासाठी झटते ती

प्रेमा मध्ये हरली ती...
सर्वस्व सारे प्रेमाने जिंकते ती

भावना दुखावल्या...जखमा जळाल्या
प्रेमाच्या गोडव्यानेच...मायेचे जग हे जिंकते ती

अस्तित्व आहे तीचं लक्षणीय
ह्र्दय...प्रेम...मन सर्वच तिच आहे विलक्षण

मायेनेच जग सारे जिंकते ती
माया...प्रेम...भावना जपणारी देवीच ती..

माझ्या कवितांमध्ये वसलेली
एक मानिनी... तेजस्विनी ती...

Tuesday, April 29, 2008

चित्रकार...मी तुझ्या प्रेमाचा



नाजूक असा तो स्पर्श
रात्र होती ती मिलनाची
थांबवले नव्हतेस तू मला
नाही थांबवू शकलो होतो मी तुला

प्रत्येक क्षण आता असतेस तू
मनातच काय ह्र्दयात वसतेस तू
एक झालो होतो आपण तेव्हा
बोल ना प्रिये...मला विसरशील का

चित्रकार आहे मी असा
वेडा रंग रंगांचा जसा
मोह मला नेई वाहून तुझ्या प्रेमरंगात
होशील ना माझ्या प्रेमरंगात....

सौंदर्यात हरवतो मी तुझ्या
जणू हरवतो मी चित्रात तुझ्या
रंगवले मी स्त्रीत्व तुझे ....
तव आठवले ते क्षण प्रेमाचे

रंगातूनही स्पर्श होतो मला
तुझ्या प्रीतीचा तुझ्या यौवनाचा
जेव्हा चढतो मला तुझा नशा
गुंग होतो मी प्रेमात तुझ्या

पाहतो तुज चित्राकडे
असते तुझे अस्तित्वच खडे
न बोलवे काही तुज पाहता
तुला पाहतच राहावे.... तुला पाहतच राहावे

Wednesday, April 23, 2008

सखे मला माफ करशील ना...


जेव्हा त्याच्याकडून चूक घडते व त्याची शिक्षा तिला भोगावी लागते तेव्हा त्याने लिहीलीली ही कविता
माझ्या शब्दात......

सखे मला माफ करशील ना...

तू नव्हतीस काल परवा
होतो मी कसा एकटाच
पण भेटलीस जेव्हा त्या दिवशी
कळलेच नाही आपली मैत्री अशी जमली

कधीच कोण माझ्याशी बोलले
जेवढे जवळचे सर्व लांबच गेले
पण तू होतीस मला अनोळखीच
अन पटकन मज तू आपलेसे केले...

पाहीली होती मी तुझ्यात प्रेयसी
पण नशीबच म्हणते ती नाही तुझी
मैत्रीचं नातं जगावं कस...शिकावे फक्त तुझ्याकडून
कारण आहेसच तू माझी लाडकी सखी

काल तुला माझ्यामुळे पडला मार
आली माझ्या डोळ्यात अश्रुची धार
जर तुझ्याजागी असतो मी तिथे
तर हसत हसत खाल्ला असता तुझ्या वाटणीचा मार

आज मी एकटा आहे
पण तू आहेस..एका सावलीसारखी
माझ्यासाठी कोणीच नाही
पण तू आहेस...माझी लाडकी सखी...

Sunday, April 20, 2008

राणी...


अंधारातही तेजस्वीनी तू
प्रेमातही मज प्रेयसी तू
तुझ्या प्रजेची सम्राज्ञी तू
तुझ्याच राज्यातली एक राणी तू

कधी ना थांबलीस आयुष्यात तू
प्रेमळ आहेस सुंदर आहेस
कोण आहेस तू
मनातील...ह्र्दयातील....राणी आहेस तू

जीव लावतेस जीवासाठी तू
जगते आहेस जगणाय्रांसाठी तू
अंधारातही उजेड पाडतेस..तारकाच तू
सखे तुझसारखी कोणीच नाही..खरच कोण आहेस तू..

हसणे तुझं घेई मज जीव
तुज नजरा मज करती घायाळ
तुझसाठी मज सर्वस्व करतो मी अर्पण...पण..
स्वत:च्याच जगाची स्वामिनी तू..खरच एक राणी आहेस तू

Thursday, April 17, 2008

प्रेमा...तुझा रंग कसा



तुझ्या त्या निलस नजरांतून
मज पाहतेस तू जेव्हा
जणू त्या निळाशार सागरात..
तुझसवे विलीन व्हावे..

तुझ्या तेजपुर्ण शरीराकडे पहावे...निरखून
यावे तुज कवेत व गुरफटून जावे
त्या गुलाबी ओठांवर ओठ टेकावेत
तू लाजावेस व यावे मज मिठीत...

अंधारातही तेजस्वीनी तू
मज स्वप्नांतील मानिनी तू
नाव तुज आहेत आज अमाप
सांगशील प्रिये तुझ प्रेमाचा रंग कसा...

प्रेमात तुझ्या अनेक रंग
जाहलो मी असा गुंग
ना सोडवे तुझा मज लळा
सांग प्रेमा....तुझा रंग कसा

Tuesday, April 15, 2008

ओळखशील का....


प्रत्येक खेळात पहीली तू दुसरा मी...
जिंकायचे होते तुला
जिंकलेले बघायचे होते मला..
जेती आहेस सर्वत्र आज...मला तू ओळखशील का...

खेळात मी हरलो...हताश झालो
जवळ यायचीस तू...व टेकायचीस तुझे ओठ
लहानच होतो आपण..
आठवणींत त्या तू मज ओळखशील का...

पहायचे होते तुला उडताना आकाशात
गच्चीतून पतंग उडवताना...
आज तू घेते आहेस उंच भरारी...ह्या जगात
पाहतो मे तुजला ह्या उंच आकाशात...ओळखशील का...

लहान हसता हसता टेकलेस तु तुझे ओठ
व मी सुद्धा मारली तुला मिठी
पण तेव्हा कुठे कळत होते काय असते प्रेम...
पण आज आहे माझे तुझ्यावर प्रेम....ओळखशील का...

Sunday, April 13, 2008

आयुष्याचे झाड



कोणी का राहीलं नाही एकटे
विचार करतो मी का असा
जेव्हा असतात सर्व इथे तिथे
सर्वच जर आहेत इथे...तर का मी असा एकटा

एकटा...एकटा...एकटा पुरे झाले...
नाही करी मी आता तो विचार
न जगावी ती दु:ख जगावे फक्त ती सु:खं
आयुष्यातील दु:खी झाड खुंटून टाकावीत

मनात येती आयुष्याचे झाड...
वाढवले मी कित्येक वर्षे
ना कधी थांबले वाढणे..पण...
पण त्या झाडाकडे कोणीच पाहिले नाही

झाडं बनली वारा देण्यासाठी
पण मज हे आयुष्याचे झाड...
नाही कधी थांबले ना कधी झडले
नाही पाहत इथे कोणी तर थांबू नये वाढत जावे

साधीसुधी म्हणच आहे बुवा...
झाडे लावा झाडे जगवा...
आयुष्याचे झाड आपले जगवा..
पालव्या फुलतील सु:खाच्या
त्यांना कधीच खुंटू नका देऊ

Wednesday, April 9, 2008

मी एक कटपुतली



अनेक धाग्यांनी गुंफलेली
दुसय्राच्या हातानी बंधलेली
मुक भावनांनी भरलेली
अशीच मी एक कटपुतली

नाचते मी त्याच्या तालावर
बोलते मी त्याच्या बोलावर
ना फुलती हास्य ना पाझरती अश्रू
म्रुत असून जगणारी मी एक कटपुतली

ना मज होती वेदना
नाहीत मज त्या भावना
त्याच्या हातीच माझी चावी
त्यानेच चालणारी...मी एक कटपुतली

ज्याच्या तालावर केला नाच
त्यानेच केला माझा नाश
फेकून दिले अंधारात तव
सुरू झाला पुन्हा तो खेळ

कधी हा नाच ना थांबवती
अशी मी एक कटपुतली...

- शशांक

Sunday, April 6, 2008

ही स्पंदनं फक्त तुझ्याचसाठी


प्रेम केले मी तुजवर
भावना अर्पिल्या तुजवर
न काही ठेवले माझ्यासाठी
सारी स्पंदन फक्त तुझ्याचसाठी

खेळत राहीलो एकटाच मी
तुझा खेळ सावल्यांचा
पण खेळ मी सुद्धा खेळलो
ह्र्दयाच्या ह्या खेळात...माझी स्पंदन फक्त तुझ्याचसाठी

कोणी नसावे त्या ह्रदयात
असावीस फक्त तू तिथे
तुझं ह्र्दय असावे मजसाठी
माझ सर्वस्व फक्त तुझ्याचसाठी

तुझ्यानेच उगवावा मज दिस
तुझ्यानेच संपावी मज रात्र
असावे एखादे जग जिथे
असावे तू माझ्यासाठी व मी फक्त तुझ्याचसाठी...

तुझे श्वास आहेत माझ्यासाठी
माझा सहवास आहे तुझ्यासाठी
तुझे ह्र्दय आहे माझ्यासाठी व माझे तुझ्याचसाठी
आहेत ही सारी स्पंदनं....फक्त तुझ्याचसाठी..

Monday, March 31, 2008

जगले आयुष्य आज मी तुझ्यासाठीच....



स्वत:हून जास्त प्रेम तुझ्यावर
केले होते मी...माझे सर्वस्व अर्पण
तुझा भास..तुझा सहवास....
तुझ्याच प्रेमात पडले होते मी...

नाही कधी मिळाले मज काही
ना मिळाले काही मज आज..
स्वप्न रंगवत होते आपली...
पण स्वप्नांतील रंगच आज झाले नाहीसे...

खूप ठरवले होते मी स्वत:शीच
नाही पाहणार तुझ्याकडे कधीच
पण प्रेम होते तुझ्यावर आधीच
संपणार नव्हते ते आज व कधीच..

तू मला सोडून निघून गेलास
अश्रूंच्या ओंझळीत मला सोडून गेलास
मला विसरून जा म्हणतोस
मग का माझ्यासाठीच रडतोस ....

आज तो मला सोडून गेला होता
काळीज मज काढून निघून गेला होता
रंगहीन झाले मज आयुष्याचे चित्र आज
मरण सुद्धा मज नशीबात का नव्हते....

कारण जगले होते आयुष्य मी फक्त तुझ्यासाठीच...

Sunday, March 30, 2008

तू तुझ्यासाठीच....मी ही तुझ्यासाठीच...


अश्रुंच्या धारा पाझरतात
मज डोळ्यातूनी फक्त तुझ्यासाठी
उमलते हास्य मज चेहय्रावर
मलाच ह्या अवस्थेत बघताना...

जवळ घेतलेस मला
परका होतो मी.. आपलसं केलस
जर आपले बनवून परके करायचे होते
तर का आपले म्हणून प्रेम केलस

क्षण क्षण जगलो फक्त तुझ्यासाठीच
कित्येक त्यागही केले फक्त तुझ्यासाठीच
एकच इच्छा होती...असावीस फक्त माझ्यासाठीच
पण...जगलीस तू आयुष्य फक्त स्वत:साठीच

तुझ्या भावनांसाठी आयुष्य जगलो अमर्याद...
आज वाटते मला जगावे फक्त स्वत:साठीच....
अंधार करून निघून गेलीस मज आयुष्यात
आहे आता फक्त त्या काजव्यांची साथ...

चालतो आहे एकटी ही वाट काजव्यांच्या प्रकाशात .....

Thursday, March 27, 2008

काजव्यांच्या प्रकाशात


अंधारातील फुले वेचता
पडावं चांदण अंधारातच
निस्तेज अव्यक्त मन
व्हावे तेजपूर्ण चंद्र्प्रकाशाने

आयुष्यातील अंधार दूर करावा
अंत:करणातील प्रकाशानेच
मना-मनातील अंधार संपेल
मनातील प्रकाशानेच..

प्रेमामधला अंधार,अविश्वास
नाहीसा करावा प्रेमाच्याच प्रकाशाने
अंधारातून मार्ग काढतो….माझ्याच प्रकाशाने

अशाच काळोखी वाटेत
असावी त्या काजव्यांची साथ
दाखवावा त्यांनी प्रकाश

त्या प्रकाशवाटेत चालत जावे…चालत जावे

Saturday, March 22, 2008

जगावे फक्त स्वत:साठीच...


आज आठवले ते क्षण...
सु:खाचे दु:खाचे संकटातले आनंदातले
सर्व काही एकसारखे होते...पण क्षणात विस्कटणारे
आज संपले ते सर्व कारण सर्वच होते विस्कटलेले

जीव लावला जिथे जिथे
काहीच मिळाले नाही मज तिथे तिथे
जर हे सर्वच नव्हते मजसाठी
मग का मज जळवले इथे

जळून गेले ते चित्र आयुष्याचे
पण आज रंग बदलले आहेत
नवीन रंगातच रंगून जावे
आयुष्याच्या नव्या चित्रात हरवून जावे

ना कोणाची तमा...ना कोणाची आस
सर्व असावे फक्त स्वत:साठीच
जगावे आयुष्य स्वत:च व संपववावेही स्वत:च
शेवटी जगावे आयुष्य स्वत:साठीच

पण आयुष्य हे संपत नाही...कारण कोणीतरी आहे...
कोणीतरी आहे जे जगते आहे मजसाठी...शोधु कुठे

Friday, March 21, 2008

भावना...आठवणी....होळी



आयुष्यात न मिळे जे काही
विझून जावे ते सर्व काही
न मिटत असावे जे काही
जळवून टाकावे ते सर्व काही....

विसरून सर्व काही साजरी व्हावी होळी

परका करून गेले आपलेच आज
मुक्त झालो का मी त्या नात्यांतून आज
ज्यांच्यासाठी जपल्या भावना....जीव-जिव्हाळा
त्यांनीच भस्म केल्या माझ्याच भावना

भस्मसात व्हावी ती दु:ख करावी साजरी होळी

आयुष्य जिच्यासाठी रंगवेले तिनेच हरले ते रंग
जपला मज प्रेमाचा रंग व तिनेच उडविला तो रंग
उडवावा फक्त गुलाल दोन हातांनी सजवावी ती होळी
रंगावे त्याच रंगात जे निघून जातील फक्त पाण्यानेच

रंगात रंगून जावे व सर्व काही विसरून जावे ....
विसरून जाव्यात त्या आठवणी...साजरी करावी होळी

अमर्याद.....


तुझ्या आठवणी तुझ्या यातना
वाहती रक्त बनून माझ्या नसांतून
तुझे बोल तुझे हसणे का थांबवतात माझे श्वास?
तुझा स्पर्श...तो भास....का जळवतात मला?

जीवन का जगावे मी फक्त तुझ्यासाठी
का तू नाही जगत माझ्यासाठी
दूर असतेस तू मजपासून आज
पण का तुला माझाच हवा सहवास...?

तुजसाठी थिजलो उजेडात..रणरणत्या उन्हात
न मिळे सावली न मिळे सय मिळे तो फक्त अंधार
फक्त तेव्हा फक्त त्या क्षणी.......
मी आहे म्रुत्यु व तू आहेस अमर्त्य...

जिथे तू अंत करी मी तिथे सुरुवात
तू पाही स्वप्न मी करी ती पूर्ण
त्या क्षणी फक्त तू...फक्त तूच...
असे जळणारी आग व होइ माझीच राख..

आता उरली नाही मर्यादा भावनांची
ना उरले ते शब्द कोणासही मर्यादित
राहीला नाही तो स्पर्श धीर देणारा..प्रेम देणारा
कारण....तू फक्त तू आहेस अमर्याद.....

Sunday, March 16, 2008

सुंदर मी होणार



आज त्याचे लक्ष नाही मजकडे
त्याच पोरींची किलबील त्याकडे
कधीतरी असेल त्याचे लक्ष मजकडे
तेव्हा असेल तो फक्त माझ्याकडे…..

आज टाकले सर्वांनी मज
सोडून गेले मज सर्व एकटे ….
वेधीन मी त्यांचे लक्ष मजकडे
तेव्हा असेल पाहत तो माझ्याकडे

घ्यावे त्याने मला त्याच्या मिठीत
त्याच्या स्पर्शाने लालबुंद व्हावे मी
माझ्या स्वप्नाच्या राजकुमारासाठी....
फक्त त्याच्यासाठीच.... सुंदर मी होणार

आज आला आहे तो दिवस
दिवस जेव्हा मी त्याच्या मिठीत…
असेल ते माझे सुंदर स्वप्न …..
आज ते स्वप्न साकार होणार

फक्त तुझ्यासाठीच आज सुंदर मी होणार..

- शशांक

Tuesday, March 11, 2008

स्वप्नात माझ्या....



थांबवावे बघणे ते द्रुश्य
थकले माझे डोळे बघून
कंटाळलो मी त्या भयानक चित्राला
मिटावे डोळे निद्रेत...जावे स्वप्नात माझ्या

स्वप्नात माझ्या...नसेल सांडत रक्त
नसाव्यात कोणाच्या यातना...अश्रू
जळू नयेत कोणाची स्वप्न....आकांक्षा
असावा तिथे फक्त आनंद...अस्वाद...स्पर्श

स्वप्नात माझ्या...न मिळावा आईचा ओरडा
नसावा माझ्या प्रेमाचा रंग असा कोरडा
स्वप्नात माझ्या...तिने यावे मिठीत घ्यावे
कोणी नसावे तिथे...फक्त ति असे व मी

जग हे आज गजबजलेले...गडबडलेले
उभे ताठ कमानीवर...पायथ्याशी बिथरलीले
उध्वस्त होते जग हे...आज मिटावेत डोळे इथे
जर पहावा स्वर्ग जगताना...जावे मग स्वप्नात माझ्या

नसेल तिथे दु:ख-यातना...नसतील काळ्या सावल्या
कोणीच न खेळावा आयुष्याचा लपंडाव तिथे
लाभावी तिची साथ जो पर्यंत हातात तिचा हात
अंधार असावा पण चांदण्या प्रकाशात...स्वप्नात माझ्या

Wednesday, March 5, 2008

खेळ मुखवट्याचा



खेळ लहान मुलांचा
खेळ भातुकलीचा
खेळ लपंडावाचा
पण खेळ मुखवट्यांचा....?

कधी फुलवती हास्य
कधी पाझरती अश्रू
चेहय्राचे व्यंग बदलती
असा कसा हा खेळ

जगावे जीवन सु:ख-दु:खात
त्यात बदलती अनेक चेहरे
चेहरे हात देऊन साथ देणारे
चेहरे अंधारात ढकलून देणारे

कधी संपतच नाही का हा खेळ
जेथे असे एक मुखवटा....
त्याच्याच मागे असे अनेक
कधीच संपणार नाही हा खेळ

जिथे असतील प्रेमळ भावना
जिथे असतील दु-ख् अश्रू
बदलत राहतील व्यंग त्याचे
अन चालूच राहील तो खेळ

खेळ त्या मुखवट्यांचा

Monday, March 3, 2008

मनाच्या कोपय्रातून....


उभी मी खिडकीत त्या
चिंतेत होती मी तुझ्या
पण अजून मी तिथेच होती
प्रतिमा जी चिंतेत होती

त्या खिडकीतून पाहते मी..
धावते चालते ते जग नथांबणारे जग
त्या खिडकीतून पाहते मी..
अनेकांचे स्वप्न साकारलेले...विस्कटलेले

पाहते मी आज स्वत:ला तिथून
लहानपणी बागडताना...खेळताना
पाहते मी स्वत:ला तिथूनच...
सगळ्यांना सोडून जाताना त्याच्यासोबत

थकले होते ते डोळे ति चित्र पाहून
थिजले होते शरीर तिथेच उभं राहून
निघून जावे तिथून एकदाचे पण...
मनाच्या कोपय्रातून मी डोकावून पाहीले...आज

वाट पाहत होते सर्व माझी तिथे
माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा पाझरल्या
मनातील अंधाराला भेदत धावत होती प्रकाशाकडे
थांबली तिथे...थांबले माझे श्वास...पुन्हा ति खिडकी आली....पण

जेव्हा त्या खिडकीतून डोकावले....तिथे...
मजसाठी कोणीतरी वाट पहात होते...

Sunday, March 2, 2008

खेळ



पाहत होतो मी तो खेळ
खेळ मज आयुष्याचा
खेळ तिच्या सावल्यांचा
कोणीच थांबवणार नव्हते तिथे

प्रेमात तिच्या पडलो मी
नात्यात कसा गुरफटलो मी
पण तिच्यासाठी कसा फरफटलो मी
बघत होते सर्व पण कोणीच धावले नाही मजसाठी

खूप त्रास सहन केला
दु:ख यातनांमध्ये जीव निघुन गेला
ती पाहत होती मला उभी राहून
देव सुद्धा पाहत होता माझ्या आयुष्याचा खेळ

शेवटी वाटले संपवावा हा खेळ
मुक्त व्हावे त्या भावनांतून-यातनांतून
तिला विसरणे सोपे नाही..पण आठवणेही कठीण
काट्यांच्या हे खेळामध्ये रक्तबंबाळ झालो मी...

कोणी न आले मज अश्रू पुसणारे
एकटाच का मी होतो तिथे
जगीन मी एकटाच तिथवर
पण आज हवे आहे कोणीतरी मज हे सांगणारे...

थांबव हा खेळ नको खेळू तो एकटाच

Wednesday, February 27, 2008

आज ती आली होती...


माझ्या अनेक आठवणींत ती होती
अनेक स्वप्नांत फक्त तीच होती
पण आज नव्हती आठवण नव्हती
जिथे ती मला सोडून गेली...तिथे आज ती आली होती

तिच्या आठवणींत जगत होतो आयुष्य
कोय्रा कागदांचे पुस्तकच बनले ते आयुष्य
पण तिच्या गंधाने ती पाने रंगून गेली
अशा पुस्तकांची गर्दी होती...तिथे आज ती आली होती

ह्र्दयातील स्पंदनं वाढत होती
जणू माझे ह्र्दय तिला हाक मारत होते
पण ती हाक तिला ऐकू आली नाही
कारण तेव्हा ती माझी नव्हती...पण का तिथे ती आली होती?

मन माझे म्हणत होतं नको पाहू तिथे
ह्र्दय माझे सांगत होते पुन्हा तिला जाऊन मिठीत घ्यावे
कोणा कोणाचे ऐकू मी कोणीच काही बोलत नव्हते
आज तिच्या मिठीत मी नव्हतो पण....तिथे आज ती आली होती

मन माझे घट्ट केलं ह्र्दय माझे भरून आले
आतुर होतो मी तिच्या भेटीसाठी
घ्यावे तिला मिठीत व मिटवाव्यात त्या आठवणी
पण तिथे आज ती एकटी नव्हती...पण ती माझ्यासाठी तिथे आज आली होती

Sunday, February 24, 2008

मी विरूद्ध मी...



कधीतरी घ्यावा शोध मी मज स्वत:चा
शोध मज मनातील आसक्त भावनांचा
तिथे नसतात सावल्या नसतो प्रकाश
असतो फक्त मी अन माझे प्रतिबिंब

प्रतिबिंब मज भावनाचे असे तिथे
प्रतिबिंब सुखी व्यक्तिमत्वाचे
आशा-निराशांचे सुख-दु:खांचे
कोणीच नाही तिथे...फक्त मी विरूद्ध मी...

कल्पनारम्य वाटे हे सर्वकाही
पण खरच घ्यावा शोध स्वत:चा
त्या प्रतिबिंबासमोर असतो फक्त मी...
व मजसमोर असते माझे प्रतिबिंब

प्रतिबिंबात दिसे मज प्रकाश
पण मला न दिसे माझी सावली
विरक्त माझे मन कोरडे झाले ह्र्दय
अलग असे सर्व काही जिथे दिसे मी विरूद्ध मी...

कधी असा दिस यावा एकरूप व्हावे
प्रकाशात सावली असावी ह्र्दयात रक्त वहावे
कुठेही दु:ख नसावे असावा फक्त आनंद
पण प्रत्येक वेळी असते हे प्रतिबिंब इथे-तिथे

शोध घ्यावा सर्वांनी स्वत:चा
जिथे आहेत दु:ख-यातना वाद-कलह
डोकाऊन पहावे आपल्या आयुष्यात
आपल्या प्रतिबिंबाला जवळून पहावे

जेव्हा घेतला मी मज स्वत:चा
पाहील मी मज स्वत:ला प्रतिबिंबात
वाटते एकरूप व्हावे त्या रूपाशी
पण उरते फक्त ते प्रतिबिंब.. जेव्हा असतो मी विरूद्ध मी

Saturday, February 16, 2008

सावल्यांची कविता....


यावा तो दिवस
दिवस सावल्यांचा
अंधाराचा दिवस
काळोखाचा दिवस

जिथे असावे सावल्यांचे अस्तित्व

नांदावे सावल्यांनी सर्वत्र
जिथे असावे आपले अस्तित्व
जिथं आहे जन्म माणसाचा
तिथेच आहे जन्म त्या सावलीचा

नसावा प्रकाश त्यांना घालवणारा...

त्यांना काही सांगायचे आहे
मरणाय्राला वाचवायचे आहे
मारण्याला थांबवायचे आहे
प्रकाश का हे थांबवू शकत नाही?

त्या सावल्यांना काहीतरी सांगायचे आहे

कोणीतरी करावी कविता सावल्यांसाठी
ती असावी फक्त त्या सावल्यांसाठी
जिथे असावे सावल्यांचे अस्तित्व
पण त्या सावल्यांचा संवाद नाही व्हावा

कोणी ही का ऐकत नाही त्यांचे...

जे थांबवू नाही शकत हा प्रकाश
सावल्यांना ते अंधारात करू द्या
करावी एक कविता सावल्यांसाठी
जी फक्त त्या सावल्यांनाच वाचू द्या

म्हणून मी केली ही कविता त्या सावल्यांसाठी
कोणी वाचणार का?

थांबावा आज तुझा हात



आला तो दिस प्रेमाचा
दिस तुझा आणि माझा
दिस प्रत्येक प्रियकराचा
दिस प्रत्येक प्रेयसीचा

आज येई तो क्षण प्रेमाचा जिथे थांबावा तुझा हात

ना असावा वाद कुठेही
असावा संवाद सर्वत्र
एक व्हावे दोघांचे श्वास
नाते जुडावे दोघांचे खास

जिथे असावा त्या स्पर्शाचा आभास तिथे असावा तुझा सहवास

जगा ते प्रेमाचे क्षण
बनवावेत ते अविस्मरणीय
जगावा तो दिस प्रत्येकाने
अनुभवावा तो अस्वाद प्रत्येकाने

जिथे असावा प्रेमाचा सहवास तिथे थांबावा तुझा हात

तो दिवस येई फक्त एकदाच
जेव्हा जुळतात दोन ह्र्दयांची नाती
देवाच्या दरबारी बनले नाते
नाते ते होते प्रेमाचे..नाते जिव्हाळ्याचे

असावे तुझे नि माझे असे अनमोल नाते तिथे मी थांबावा तुझा हात

वाचावीस तु ही कविता
जवळ यावेस कवेत यावेस
जगावे मी फक्त तुझ्यासाठीच
असावा तुझा सहवास मज आयुष्यात

जिथे आहे तुझा आभास,तुझा सहवास तिथेच थांबावा मी तुझा हात

Tuesday, February 12, 2008

जगावा तो दिस पुन्हा पुन्हा ...


जगतो आहे मी प्रत्येक दिवस
दिवसातील तो एक एक क्षण
त्या प्रत्येक क्षणाचा आभास
त्या आभासाचा अनुभव तो स्पर्श

पण जगावा तो दिस पुन्हा पुन्हा... तो दिस प्रेमाचा...

सारे जग जगती दो दिस प्रेमाचा
साजरा करती तो क्षण प्रेमाचा
तिची चाहूल लागावी तिच्या मिठीत पडावे
आठवणींत माझ्या तिने माझ्या मिठीत रडावे

अनुभवती मी श्वास तिचा फक्त त्या दिवशी... जगावा तो दिस पुन्हा पुन्हा

ज्यांना ना लाभती ते प्रेम...ना प्रेयसी
नका होऊ दू:खी तयाची ओढ त्यांना लागसी
आयुष्यात प्रेम मिळतेच अस नाही
पण का नाही ते मिळवावे व आनंद मिळवावा

ते क्षण बनवती तो दिस प्रत्येक क्षणी खास....जगावे त्या क्षणांसाठी.. तिच्यासाठी

साजरा होवो तो दिन प्रेमाचा
तिन्ही प्रहरी तिन्ही सांजी तिन्ही निशा
असावा तयाचा पसर सर्वत्र दिशा
असा असावा तो दिन प्रेमाचा...तो क्षण प्रेमाचा

यावा असा दिवस आयुष्यातील प्रत्येक क्षणी.... मी जगावा असा हा दिस पुन्हा पुन्हा ...
यावा असा दिवस तुमच्याही आयुष्यात त्या दिवशी जगावे तुमचे प्रेम....

तुम्ही ही जगावा तो दिस पुन्हा पुन्हा...

wish u all a happy valentines day

लागली ओढ त्या क्षणांची आज



थंडीत घालवलेले ते गरम दिवस
उन्हामध्ये आडोशातले ते दिवस
भर पावसात भिजलेले ते दिवस
चांदण्या रात्रीत घालवलेले ते दिवस

आज आत्ता ते दिवस मज आठवतात... म्हणूनच लागली ओढ त्या क्षणाची आज

प्रत्येक क्षणात आठवणी अनेक
आठवणींत रुतलेले स्पर्श अनेक
नाते दोघांचे एकसारखेच असते
म्हणूनच ते असतात अविस्मरणीय

आठवतात मला ते क्षण आठवतात ते स्पर्श... ओढ लागली आहे मला त्या क्षणांची आज

रुततात प्रत्येक क्षणांत अनेक संबंध
त्या संबंधात रुततात अनेक मर्मबंध
जगावे ते क्षण आज अनेकदा जणू
कधी न जावेत क्षण ह्या आयुष्यातून पुन्हा...

बनून जावेत हे क्षण ह्या आयुष्यातील रंग व रंगवावे मी मज आयुष्याचे चित्र

रंगून जावे ह्या प्रेमरंगात
क्षणात जावे हरवून त्या प्रेमाच्या
झालो आहे मी क्षणभंगूर त्या एका क्षणासाठी
पुन्हा जगावेत ते सोनेरी क्षण स्मरावेत ते सोनेरी क्षण

आज वेध आहे मज त्या दिवसाचा.... म्हणूनच मज लागली आहे ओढ त्या क्षणांची आज

Saturday, February 9, 2008

लागली ओढ त्या शब्दांची आज



शब्दांच्या ओळी बनतात जेव्हा
आठवतो तो प्रत्येक शब्द मला
तो शब्द कधी न विसरणारा
काय होते त्या शब्दात ज्यातून बनते ही कविता.....

मला लागली आहे ओढ त्या शब्दांची आज

दु:खी कविता प्रेम कविता
व्यंग कविता व्यक्तिमत्वावर कविता
ह्या सर्वांत ऋतले होते अनेक शब्द
ओळखू शकलो असतो त्या शब्दांना मी तर...

ते शब्द आज मला हवे आहेत जणू.. वेडच लागले त्या शब्दांचे

आज ऐकावीशी वाटते तिची हाक
तिच्या ओठांतून ऐकावे ते शब्द... शब्द प्रेमाचे
ऐकून ते शब्द मज अंत:करण भरून यावे
पण ते शब्द हरवले आहेत मज अंत:करणात

शोधू कुठे मी त्या शब्दांना मज लागली आहे ओढ आज त्या शब्दांची

असते त्या शब्दांचे महत्व अमाप
कारण ते शब्द असतात कधी न संपणरे
प्रत्येक शब्द प्रत्येकासाठी महत्वाचा असतो
कधी तो वाईट असतो कधी चांगला

अमूल्य असतात हे सगळे शब्द म्हणूनच ओढ लागली आहे आज त्या शब्दांची

शब्द आनंदाचा शब्द प्रेमाचा
क्षण सुखाचा क्षण उल्हासाचा
शब्द दु:खाचा शब्द विरहाचा
प्रत्येक क्षण समावती त्या शब्दांजोगे वैषिष्ठ्य

म्हणूनच मला आज लागली आहे ओढ त्या शब्दांची...

Thursday, February 7, 2008

विझून जाऊ देत त्या आठवणी मज मनातून



सुखद आठवणी आनंद देतात
दु:खद आठवणी दु:खच देतात ना....
त्या आठवणी विसरून जाऊ शकतो पण..
त्या अंत:करणातून विझत नाहीत...जखमा देत असतात

पण आज ते क्षन आले..जेव्हा विझती त्या आठवणी मज् मनातून

ही दु:खी कविता नाही असे म्हणतो मी
पण जी दु:ख होती त्यांना आज विझू देत
आयुष्यात येत आहेत अनेक आनंदाचे क्षण
आज त्यांना मला जगू देत...अनुभवू देत

जगू दे मला ते आनंदी क्षण व विझून जाऊ देत त्या आठवणी मज मनातून

त्या दु:खात होते मज अन तिचे आनंदाचे क्षण
पण आज ती नाही तिचे क्षण नाहीत काय करू मी त्यांचे
नाही तमा आज मला त्या क्षणांची जे मज देती त्रास
काटेच ते झाले आहेत आता रूपत आहेत अंत:करणात

दूर करू दे मला त्या काट्यांना विझून जाऊ देत त्या आठवणींना

जेव्हा असतो सगळीकडे आनंद पसरलेला
तेव्हा काय करू मी ह्या दु:खद क्षणांचे... आठवणींचे
ते आनंदी क्षण त्या आठवणी जणू पुन्हा पुन्हा जगाव्या
आयुष्याच्या लेखातून जणू ते पान गळून जावे ज्यात असावेत ते क्षण..त्या आठवणी

म्हणूनच का ते सुख तो प्रत्येक क्षण मला जगू दे व विझून जाऊ दे त्या आठवणी मज मनातून

Wednesday, February 6, 2008

देवा मी तुझ मांगतो ते मिळत नाही...


लहान मुले प्रार्थना करतात
मोठी मुलं प्रार्थना करतात
प्रार्थना आपण सुद्धा करतो.. प्रत्येकाने करावी
पण प्रार्थनांना यश मिळते़ का?

देवा मी तुझ मांगतो ते मिळत नाही...

प्रेम केल त्यांनी तिच्यावर जिवापाड
त्यांनी प्रार्थना केली तिला मिळवण्यासाठी
तिच्या सु:ख दु:खासाठी खूप काही केले
पण त्यांच्या प्रार्थनांना यश कधी आले का?

प्रेमासाठी मागतो पण देवा तुज ते मागतो तेव्हा मिळत नाही...

आयुष्यात यशस्वी व्हावे म्हणून लोक प्रार्थना करतात
मेहनत करून यश नाही म्हणून देव-भक्ती स्वीकारतात
यशासाठी घाम गाळणारे अश्रू गाळण्यास भाग पडतात
त्यांच्या श्रमाला त्यांच्या भक्तीला त्यांच्या अश्रूंना कधी यश आले का?

मेहनतीचा दुवा दिलास पण देवा तुजकडे यश मागतो ते मिळत नाही...

प्रार्थना केली प्रेयसी मिळण्यासाठी तुजकडे
प्रार्थना केली आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी तुजकडे
प्रार्थना केली दु:ख विझण्यासाठी आयुष्यातुन तुजकडे
पण अश्रूच मिळाले तिथे जिथे हवे होते सु:ख-आनंद

खूप आशा होती मला पण देवा तुजकडे मागतो ते मिळत नाही....


भक्ती माझी सदैव असे तुजवर मन माझे तुच जाणितो
मी आज तुजकडे पुन्हा एकदा काहीतरी मागतो देशील का मला जे मज आज मिळत नाही

Tuesday, February 5, 2008

हरवून जावे त्या विविध रंगात



लहान असताना चित्रकला शिकली होती
रम्यपणे एका कागदावर अनेक रंग रंगवले
पण आज आठवतात ते रंग रंगवलेले
त्या रंगानी आज रंगवावे आयुष्याचे चित्र असे वाटते

पुन्हा तो काळ परत यावा व हरवून जावे त्या रंगात

त्या प्रत्येक रंगात आठवते ते बालपण
त्या रंगात आठवतात ते सोनेरी दिवस
आज पुन्हा बसावे असे एक चित्र रंगवत
त्या चित्रात असावा मी माझे आयुष्य

पण ते रंग चढतील का ह्या चित्रावर....

आज रंग बदलले त्यात अनेकांचे रक्त मिसळले
चित्रांची शोभा नाही राहीली सगळे काही झाले रंगहीन
जर आज हवी असेल प्रत्येक रंगाला शोभा
तर रंगवावे असे एक चित्र जिथे असतील गडद रंग

ते चित्र न असेल जळणारे असेल फक्त रंगणारे मन रंगवणारे

होणार का तुम्हीसुद्धा तुमच्याच आयुष्याचे चित्रकार
भरणार का तुम्ही तुमच्या आयुष्यातले हरवलेले रंग.... तुमच्याच आयुष्यात
म्हणूनच मला आज वाटते पुन्हा जावे त्या भूतकाळात
त्या विविध रंगांमध्ये हरवून जावे .........

Sunday, February 3, 2008

ती मैत्रीण...


मी मज स्वत:ला हरलो आज त्या दु:खांना हरलो
त्या वेदना यातना ते दु:खी क्षण सर्वच विसरलो
पण तू मला भेटलीस माझी सखी बनून
मला आता असे वाटते की कोणी तरी आहे माझ्यासारखे

आयुष्यात कोणाची कमी दूर करणारे कोणीच भेटत नाही
पण तू मला भेटलीस अन माझी sweet friend ची कमी दूर झाली
अशीच मैत्रीण मी शोधत होतो जिला मी समजू शकेन
अशीच मैत्रीण मी शोधत होतो जी तू आहेस

प्रत्येक नात्याचा रंग नेहमीच वेगळा असतो
आयुष्य माझे रंगहीन होते पण आता कळत आहेत ते रंग
पण माझ्या मैत्रीचा रंग अजून तसाच आहे
कारण त्यामध्ये तुझ्या मैत्रीचा रंग मिसळलेला आहे

आयुष्यात कधीच कसली अपेक्षा करू नये
मी कधीच कोणाकडून कसलीच अपेक्षा केली नाही
पण अनपेक्षित देणगी दिली आज देवाने
तूझ्यासारखी मैत्रीण त्याने मला दिली

माझी ह्या देवाकडे प्रार्थना आहे
तिची मैत्री मला कायम लाभावी
माझी मैत्री तिला कायम लाभावी
तूझी न माझी friendship अशीच अतूट राहावी

नशा...


आज चढतो आहे मला नशा...

नशा शब्दांचा नशा कवितांचा
धुंद होऊनी त्या शब्दांत
लिहितो मी आज ही कविता
झिंगावेसे वाटते आज त्या कवितांमध्ये

चढते मज आज ही नशा त्या कवितेची त्य शब्दांची

दारू ची नशा आयुष्य उध्वस्त करी
जोरू ची नशा नेई रस्त्यावर जणू
पण कवितेची नशा असते निराळीच
त्या शब्दांच्या नादात भावनांच्या नादात झिंगत राहावे

थांबावेसे नाही वाटत ह्या नशात रमताना..चढू दे मज हा कवितेचा नशा

न असावी कसली चिंता
न असावी कसली हुरहुर
विसरून जावीत सगळी दु:ख सगळे विचार
हरवून जावे त्या शब्दांमध्ये त्या कवितांमध्ये

चढतो मला आज हा वेगळाच नशा...येते मज आज वेगळीच मजा

नको आज कुठलाही रिकामा ग्लास
नको आहे मला कुठलीही रिकामी जागा
कोणीही नसले तरी चालेल आज
कारण गुंग होणार मी ह्या कवितांत आज

जेव्हा चढते ही अजब नशा बघा येते कशी मज्जा.....

रेशीमगाठी


अलगद जुळता जुळता जुळली ही नाती
म्हणूनच का म्हणतात त्यांना रेशीमगाठी
नाजूकच असतात ती का लवकर तुटतात
असतात नाती ती अनमोल म्हणूनच म्हणतात त्यांना रेशीमगाठी

आठवणींच्या होत्या त्या अनेक गाठी
का थांबल्या नाहीत तुटण्यावाचून त्या रेशीमगाठी
त्या बंधनाची अनामिक हुरहुर जिवा लागावी
जणू पावसाने चातकाची वाट पहावी

त्यांच्या आयुष्याला अर्थ मिळावा
बघता बघता अकुंराचा वटव्रुक्ष व्हावा
बंधन नाही उरले पण होते ते एक नाते
आठवणीच का नाही पण होत्या त्या रेशीमगाठी

अस्तित्वाला ओळ्ख माझ्या ज्या मुळे मिळते
असतात ती अनमोल नाती असतात त्या रेशीमगाठी
मना भिडणाय्रा गुजगोष्टी तीच तर खरी नाती
कधी न व्हावीत अलग अशीच जपावीत ही नाती

आठवणींच त्या होत्या का की होते ते माझे जीवन
विलग करता न उरते काही हीच तर होती त्यांची खरी मिळावण
न संपावीत ती नाती न संपावेत ते मर्मबंध
कधी न व्हावीत अलग हीच आहे त्यात शपथ

होते ते क्षण आनंदाचे



अश्रू वाहून गेले काळोख निघून गेला
उमटले चेहय्रावर हसू प्रकाश उजळला आज
नव्हते दु:खा़चे सावट मज मनावर अंत:करणावर
वादळ चक्रव्यूह अंधार सर्व काही संपले होते

आज ते दिवस आले होते हो होते ते क्षण आनंदाचे

प्रत्येक क्षण अनेकदा जगावासा वाटत होता
पुन्हा कधी तो जाउ नये इतका हवाहवासा वाटत होता
विझला होता तो अंधविश्वास तो काळोख आज कायमचा
उजळला होता तो आत्मविश्वास पसरला होता सर्वत्र प्रकाश

कोणासाठी ही थांबले नाहीत ते दिवस येणे होते ते क्षण आनंदाचे

उदास मन माझे राहीले नव्हते
आज नभ जणू आनंदाने भरून आले होते
अश्या अनेक +ve कविता लिहाव्याश्य वाटत होत्या
आज आयुष्यात दु:ख मावतच नव्हते सु:खच होते सर्वत्र

जगात आज सर्व काही उल्हासित होते कारण होते ते क्षण आनंदाचे

कोणीतरी तिला सांगेल का रडू नकोस आज
तुझ्या प्रेमात विश्व कधीच नव्हते पण विश्वात प्रेम पुनश्व मिळेल
जर मनात असेल तेवढी इच्छा आणि आस्था तर ते प्रेम पुनश्च मिळेल
नको सोडूस कधी जिद्द प्रेमात सगळे काही माफ हीच जिद्द

दु:खानी माझे प्रेम आज खुंटणार नव्हते आहेत हे आता क्षण आनंदाचे

आयुष्यातील दु:खांना करा आज तुम्ही नाहीसं
पत्येक क्षण तुम्ही बनवाल अनमोल प्रकाशाकडे लोटा
नका बघू आयुष्यात फायदा आणि कसलाच तोटा
आयुष्य जगत राहा आनंदाने आत्मविश्वासाने

परिचय होतो आहे तुमचा ह्या जगाला कारण आले आहेत आज हे क्षण आनंदाचे

Thursday, January 31, 2008

मुक्याची कविता....


अनेक जण तेव्हा गप्पा मारत होते
एकमेकांच्या चर्चेत सर्व जण रमले होते
लपून छपून तो त्यांच्याकडे पाहत होता
आज त्याला सुद्धा काही बोलावेसे वाटत होते

पण हा तर त्याच्या नशीबाचा खेळ होता कारण तो मुका होता

प्रत्येक प्रेमी आपल्या प्रेयसीला i lov u म्हणताना
आपल्या ह्र्दयातील प्रत्येक ओळ वाचून दाखवताना
तो सर्व काही प्रत्यक्ष पाहत होता पण त्याला राहावत नव्हते
त्याला सुद्धा बोलायचे होते मोकळेपणाने बोलायचे होते

पण हा काळ त्याचा नव्हता...मन त्याचे बोलत होते पण तो... मुका होता

शब्द त्याचे अडखळले होते कधीच उमटणारे नव्हते त्या मुखावर
देवानीच त्याच्या आयुष्याशी खेळ केला होता
जणू त्याच्या हालचालींचा खेळ तो बघत होता
अश्रूंना त्याचा नव्हती सीमा कारण त्याला काहीतरी सांगायचे होते

काळ आज का थांबत नव्हता त्याची हाक ऐकत नव्हता... कारण...तो मुका होता...

नाही त्याच्या सुखांची कोणाला परवा
नाही त्याच्या अश्रुंची कोणाला जाण
एकटाच होता तो अबोला ज्याला कोणीच जाणू शकले नाही
देवच ऐकत होता का त्याची हाक त्याला तो जणू बोलवत होता

शेवटी तो काही न बोलताच निघून गेला... पण काहीतरी नक्की सांगून गेला....