Thursday, January 31, 2008

मुक्याची कविता....


अनेक जण तेव्हा गप्पा मारत होते
एकमेकांच्या चर्चेत सर्व जण रमले होते
लपून छपून तो त्यांच्याकडे पाहत होता
आज त्याला सुद्धा काही बोलावेसे वाटत होते

पण हा तर त्याच्या नशीबाचा खेळ होता कारण तो मुका होता

प्रत्येक प्रेमी आपल्या प्रेयसीला i lov u म्हणताना
आपल्या ह्र्दयातील प्रत्येक ओळ वाचून दाखवताना
तो सर्व काही प्रत्यक्ष पाहत होता पण त्याला राहावत नव्हते
त्याला सुद्धा बोलायचे होते मोकळेपणाने बोलायचे होते

पण हा काळ त्याचा नव्हता...मन त्याचे बोलत होते पण तो... मुका होता

शब्द त्याचे अडखळले होते कधीच उमटणारे नव्हते त्या मुखावर
देवानीच त्याच्या आयुष्याशी खेळ केला होता
जणू त्याच्या हालचालींचा खेळ तो बघत होता
अश्रूंना त्याचा नव्हती सीमा कारण त्याला काहीतरी सांगायचे होते

काळ आज का थांबत नव्हता त्याची हाक ऐकत नव्हता... कारण...तो मुका होता...

नाही त्याच्या सुखांची कोणाला परवा
नाही त्याच्या अश्रुंची कोणाला जाण
एकटाच होता तो अबोला ज्याला कोणीच जाणू शकले नाही
देवच ऐकत होता का त्याची हाक त्याला तो जणू बोलवत होता

शेवटी तो काही न बोलताच निघून गेला... पण काहीतरी नक्की सांगून गेला....

1 comment:

HAREKRISHNAJI said...

आपले विश्व खुप देखणॆ आहे