Tuesday, March 11, 2008

स्वप्नात माझ्या....



थांबवावे बघणे ते द्रुश्य
थकले माझे डोळे बघून
कंटाळलो मी त्या भयानक चित्राला
मिटावे डोळे निद्रेत...जावे स्वप्नात माझ्या

स्वप्नात माझ्या...नसेल सांडत रक्त
नसाव्यात कोणाच्या यातना...अश्रू
जळू नयेत कोणाची स्वप्न....आकांक्षा
असावा तिथे फक्त आनंद...अस्वाद...स्पर्श

स्वप्नात माझ्या...न मिळावा आईचा ओरडा
नसावा माझ्या प्रेमाचा रंग असा कोरडा
स्वप्नात माझ्या...तिने यावे मिठीत घ्यावे
कोणी नसावे तिथे...फक्त ति असे व मी

जग हे आज गजबजलेले...गडबडलेले
उभे ताठ कमानीवर...पायथ्याशी बिथरलीले
उध्वस्त होते जग हे...आज मिटावेत डोळे इथे
जर पहावा स्वर्ग जगताना...जावे मग स्वप्नात माझ्या

नसेल तिथे दु:ख-यातना...नसतील काळ्या सावल्या
कोणीच न खेळावा आयुष्याचा लपंडाव तिथे
लाभावी तिची साथ जो पर्यंत हातात तिचा हात
अंधार असावा पण चांदण्या प्रकाशात...स्वप्नात माझ्या

1 comment:

HAREKRISHNAJI said...

बॉग सुरेख आणि देखणा