Wednesday, June 18, 2008
विझलेले अस्तित्व
उन असो पाऊस असो...
ती रात्र एक सारखीच असते
सुर्यास्त असो वा सुर्योदय
आमचे अस्तित्व हे विझलेलेच असते
आपल्या आपल्यांसाठी भटकत असतो
पोटा-पाण्यासाठी भरकटत असतो
सुर्यअस्त होता.... अंधार पसरता....
आमचे कोणीच नसते....न आम्ही कोणाच्या असतो
चिखलात फेकून चिखल उडवतात
कमळ बनवून कळ्या उधळतात
जळफळत्या आगीत जळत असतो.....
आग शांत होत नसते पण अस्तित्व.... विझलेलेच असते
सुर्य उगवता जगण्यास वेळ नसतो
सूर्य मावळता जगण्यासाठी खेळ असतो
प्रेम माया आपुलकी सारे फक्त शब्द
प्रत्येक रात्र का असतो आम्ही फक्त नि:शब्द्
जळत्या काडीसारखे आम्हाला विझवले जाते
काचेच्या बाहुलीसारखे सर्वत्र खेळवले जाते
आमचे प्राण हे आमचे नव्हतेच कधी.....
शिल्लक आहे फक्त अस्तित्व जे कायम विझलेलेच असते
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
hi kavita mazyahi astitvachicha saksha dete.
dhanyavad.
mazya blogla bhet de.
prakashkshirsagar.blogspot.com
Post a Comment