Friday, May 11, 2007

किनारा

ओल्या वाळूत चालत असता
सुर्यकिरणांचा आडोशा घेत जात असतो
प्रात:कालाची वेळ असते
सुर्य नीट बाहेर आलेलासुद्धा नसतो

समुद्र काहीतरी सांगत आहे
असे समजून जणू मी त्या लाटांकडे पाहत असतो
लहान मुलं त्या वाळूमध्ये खेळत असतात
लहान लहान किल्ले बनवत असतात

त्यांना हे माहीत असते ते किल्ले पडणार
तरी सुद्धा ती मुलं पुन्हा नवे किल्ले उभारतात
पण ते किल्ले त्या किल्ल्यांपेक्षा मोठे असतात
आणि ते मोठ्यातली मोठी लाट सामोरे जातात

कधी कधी जणू हा किनारा
खूप काही स्वत:मध्ये समावून घेत असतो
ती दु:ख ती सु:ख त्या आठवणी
अन त्या भावनासुद्धा कधी कधी हा किनारा संपवतो

त्या किनाय्राला लोटणाय्रा त्या लाटांच्या आशा
प्रत्येक माणसाच्या जीवनाच्या आशा
त्याच्या भावनांच्या आशा
पण हाच तो किनारा . . . .

जो एक नवीन आयुष्य देत असतो
त्या लाटेला परत बोलवत असतो
कधी कधी मिलनही घडवून आणतो
कधी कधी शांततेचा अंत शोधुन देतो

पण माझे मन मला नेहमी याच किनाय्रावर नेते
जिथे माझ्या भावनांचा होतो अंत
पण त्या अंतामधुनच एक नवीन सुरुवातही होते
माझे मनसुद्धा त्या लहान मुलासारखे असावे
जिथे सर्व आशांचा अंत होतो
तिथेच नवीन सुरुवात करायला सांगतो

हा किनारा कधी संपतच नाही
कारण ह्याच किनाय्रावर अनेक अंत होतात
अन त्याच किनाय्रावर अनेक सुरुवातीसुद्धा होतात

No comments: