ती कविता मनातील भावनेतून निर्माण होते
तर ही कविता त्या शेजारच्या भावनेबरोबर नेहमी येते
या कवितेला वाचता येते सहज
पण नाही लिहीता येत तिच्यासाठी एक ओळ
माझ्या मनात या दोन्ही कविता येत असतात
पण त्या दोन्ही मला हव्या असतात
कविता केली की मन हलके होते
कविता आली की ह्रदय भरून येते
कविता अंधार व्यक्त करणारी
कविता त्या अंधारातसुद्धा उजळून दिसणारी
कविता माझ्या प्रेमळ भावना व्यक्त करणारी
कविता माझ्या प्रेमाची उपमा म्हणून शोभणारी
नसतो दोघींमध्ये एवढा फरक
असतात एकाच नावाच्या पण
ती कविता कविता असते
भावना प्रेम दु:ख सांगणारी
अन ही कविता असते
भावना समजून घेणारी
मजवर खूप प्रेम करणारी
आणि माझ्या प्रत्येक दु:खात साथ देणारी . . .. . .. . . . .. . . . . .
No comments:
Post a Comment