Sunday, May 20, 2007

मैत्री अशीच असावी . . . . का ?


आता आपण चांगले मित्र असू
नंतर कधी आपण खूप चांगले मित्र असू
कालावश झाली तर आपली मैत्री ? . . . .

तू माझ्याशी बोलणार नाहीस
अन आपले नाते संपुष्टात येईल

मला एकदाच सांगायचे आहे
की माझ्या आयुष्यात तूझे महत्व आहे
तूझ्यासाठी मी माझे आयुष्य बदलून टाकले
तू मला विसरलीस
तरी मला तुला विसरणे खूप कठीण आहे

कदाचित ह्या ओळी लिहिलेल्या
तू तुझ्या मित्रांना पाठवशील
तू माझ्याशी नाते तोडले असले तरी चालेल
माझ्या जवळपास असून सुद्धा

कधी ही कविता कधी त्यांना पाठव
ज्यांना तुझी आठवण येते
त्यांना पाठव जे तुझ्यावर प्रेम करीत होते
जरा त्यांनासुद्धा कळू दे

जेव्हा त्यांना कळेल
तुला त्यांना विसरणे नाही झाले असेल
तेव्हा तू त्यांचा आनंद अनुभवावास
तुला खूप बरे वाटेल

आपल्यापाठी आपल्या मित्रांची साथ आहे असे वाटेल
कारण तुला ही त्यांची पर्वा आहे
आयुष्यात प्रत्येकाला एका मित्राची गरज असते

कधीतरी तुला ह्याची जाणीव होईल
की तुझ्याकडे असे मित्र आहेत
जे तुझ्यासाठी खूप काही करू शकतात

तूला ही कविता वाचताना बरे वाटेल
कदाचित माझी आठवण येईल
पण हे तू नेहमीच लक्षात ठेव
तुझ्यासाठी कोणतरी काळजी करणारे
ह्या जगात नेहमीच कोणीतरी असेल

Tuesday, May 15, 2007

तिची कविता (ही वाट )



ती वाट सरळ असते पण. . . .
ह्या आयुष्यात अनेक काटे
पसरलेले असतात
अगदी एका गवतासारखे

त्यांचीच का आपल्याला
फुलं बनवायची असतात
बिकट वाट करून नाही चालत
हा प्रवास शेवट्पर्यंत आपलाच असतो

वाटेतून येणाय्रा जाणाय्राला पारखावे
त्यावर मगच बरोबर चालावे
नाही तर हा प्रवास खुंटत जातो
अन ती वाट अन तो प्रवास दोघांचा अंत होतो

डोळे झाकून चालून धडपडायला होते
चुकून पायाला ठेच लागते
डोळे उघडे ठेवून चाला की हो
तुमचे शिखर तुम्हाला नक्कीच सापडेल

अश्या ह्या अनेक वाटा तसेच अनेक प्रवास
आपल्या वाटा नेहमीच वेगळ्या होत राहणार
पण तेच ते प्रवास अन त्याच त्या वाटा
कधी ना कधी आपल्याला भेटवत राहणार

जरा बाहेरचे जग पाहूया की हो
तिथेले जग तिथेच पारखूया
ही वाट चालतच राहणार
त्या प्रवासाचा आनंद मात्र चुकवू नका

अन त्या आठवणींची कपि अशीच आपण जपूया . . . .

Sunday, May 13, 2007

इंद्रधनुष्य असेच असते का ?


पाऊस खूप पडत असतो
तन मन अन सारे काही चिंब करत असतो
पण ते इंद्रधनुष्य तसेच नसते राहीले
जर त्या सुर्यकिरणांचे ह्या पावसाबरोबर मिलन नसते झाले

ह्या जगात कधीच कोणाला आनंद झाला नसता
जर ह्या जगात दु:ख अन यातना आल्याच नसत्या
पण हेच जणू ते आयुष्य
त्या सरत्या पावसाच्या धारा अन सुर्यकिरणांना मिळवणारे

सर्वच दिवस सारखे नसतात
कधी त्यांच्यात अंधार असतो काळ्या ढगांचा
कधी असतो उजेड त्या निसटत्या सुर्यकिरणांचा
असेच असते का हे इंद्रधनुष्य . . . . ?

प्रत्येक पावसात उभे राहता
रंग छटा वर्णिती रंग त्या निसर्गाचे
त्या धारेचा अस्वाद घेताना
ती बोलकी फुले . . . .
खूप काही बोलवून दाखवी

असेच असते का हे इंद्रधनुष्य . . . ?

आयुष्यात असे अनेक पाऊस पडून जातात
त्या पावसामधे ते ढग भेदणारी अनेक इंद्रधनुष्य नजरेस पडतात
त्या पावसाच्या धारांची मजा घ्यावी
त्या रंगछटा पाहता पाहता

तुम्हाला तुमच्या आशेची सुर्यकिरण नक्कीच सापडेल . . . . .

Friday, May 11, 2007

बोलकी फुले . . . .


कधी कधी बागेत चालत असता
अनेक सुगंध दरवळती
अनेक रंग उधळती जणू
ती फुल काहीतरी सांगत असावी

चालत असतो मी त्या फुलांना पाहत
समोर येते ते पारीजातक
म्हणते मला माझ्या नाजूकपणावर नको जाऊस
ते पारिजातक असेच बोलता बोलता कोमेजून जाते

सुंदर सुंदर चाफा बोलती
मला जवळ घ्या
त्या चाफ्याने मन माझे सुगंधित होई
मग माझे मन मलाच म्हणे प्रीतीला जवळ करी तो चाफा

समोर येई ते गुलाब
त्या ठिकाणी मला अनेक गुलाबं दिसे
रंग अनेक पण साम्य एकच असे
ते फुल होते काट्यानी बहरलेले

हा गुलाब खूप काही सांगे
सफ़ेद गुलाब म्हणे
मला जवळ घ्या
तुमच्या नाजूक मनात माझा सुवास दरवळू दे
अन मैत्री अजून घट्टटट वाटू लागे

गुलाबी गुलाब म्हणे
जा मला जाऊ द्या कोणाकडे
अन हळूच प्रीतीची भावना मनात जागवे

शेवटी उरला तो लाल गुलाब
तो हातात आला की सारखे सांगत असतो
की मला जवळ ठेवू नकोस
मी जितका कोमल नी सुंदर दिसतो तेवढाच दु:ख ही देऊ शकतो

खरच असते की म्हणा
तोच की तो गुलाब जो प्रिती मैत्री अन शांतता दर्शवीत असतो
अन तोच का तो गुलाब
जो आपल्या काट्यानी आपल्याला दु:ख देत असतो

तोच लाल गुलाब
आपल्या काट्यांनी आपले जीवन काट्यमय करीतोच
तो गुलाब
त्या प्रितीची आठवण
मनात नेहमी जागवत असे

ती ट्रेन . . .


रोज सकाळी धावत धावत
अनेक ती ट्रेन पकडतात
खूप गर्दी असते प
ण सवयच असते त्यांना लटकायची

नेहमी कुठे न कुठे थांबत असते
प्रवासमात्र चालूच असतो
अनेक ओळखी होतात
अनेक आपले अनोळखी होतात

स्टेशन वरून स्टेशन पार पडत असतात
नवे सखे नव्या सख्या काहीश्या भेटत जातात
स्टेशना स्टेशनांचा संबध त्यांचा
स्टेशन येते अन ते पुन्हा आपल्या वाटेस निघून जातात

कधी एखादी अशी ओळख होते
जी कधीच अनोळखी होत नसते
स्टेशन असो वा सिग्नल ती भेट कधीच संपत नसते
खरोखरच की ही ट्रेन माणसं जोडत असते

इथे अनेक माणसे हरवतात
अनेक प्रसंग आठवणी बनून जातात
अनेक आठवणी नष्ट होतात
पण राहीला तो फक्त जिव्हाळा
हा प्रवास असतो कधी न संपणारा

आयुष्य हेच की अनेक अनुभवांचे
तीच का ती ट्रेन प्रत्येकाला जवळ करणारी
तीच का ती ट्रेन मार्ग जोडणारी
तीच का ती ट्रेन आठवणी सोडून जाणारी
अन तीच का ती ट्रेन आपल्या जीवन-रेषा जोडणारी

निसर्ग


हवा पाणि झाडे फुल
प्राणी पशू अन पक्षी अ
शीच काहीशी असतात ती द्रुश्य
असाच काहीसा असतो तो निसर्ग

पहाटे कधी एखाद्या गावात
घरातील खिडकीतून डोकावून पहावे
धुक्यांनी भरती आल्यासारखा तो हिरवा समुद्र
जणू त्या हिरव्या समुद्रात पोहत राहावे

त्या हिरव्या समुद्राला
काटेरी झुडुपांचा किनारा असतो
पण माझे मन हे काट्यमय झाले आहे
त्यामुळे तो काटयांचा किनारा सुद्गा
खय्राखुय्रा समुद्राच्या मऊ वाळूसारखा वाटू लागतो

तो निसर्ग मला हवा हवासा वाटतो
जेव्हा मी उन्हाने दाटून आलेल्या जागी
त्या थंड गार वाय्राने त्रुप्त होतो

जेव्हा त्या पावसाचे थेंब
माझ्या डोळ्यांवर चारून जातात

हा निसर्ग जर एका चित्रात अवतरला तर. . . .
मी ते चित्र सारखे निरखून पाह्त बसीन
त्या निसर्गात जणू मिसळून जाईन
त्या निसर्गात एकच कमी भासते
त्या प्रितिमय चेहय्राची

कोणी मला निसर्गाचे काही गाणे गाऊन दाखवेल .. .. . .
तर मी त्याला म्हणीन
वेड्या निसर्ग हा काही गाण्याचा विषय नसतो
त्याला आपण अनुभवायचे असते
त्या निसर्गात राहून त्याला जपायचे असते

मला सारखे वाटते . . . .


सारखे मला वाटते की

कधी मी माझ्यामध्येच हरवतो
कधी हरवलेला मी मज स्वत:लाच सापडतो
दिस उगवतो दिस मावळतो
रात्री जाग्या होतात आणि निजतात सुद्धा

पण त्या रात्री माझी पावले चालत असतात
तेच ते गाणे मी गुणगुणत असतो
पण माझी वाट संपत नसते
कारण मला सारखे वाटते की
नवीन वाट समोर येईल

मला सारखे वाटते की कोणी मला ह्या सगळ्यापासून दूर घेऊन जावे
मला सारखे वाटते की कोणी त्या आठवणींपासून मला लांब न्यावे
मला सारखे वाटते माझ्या आयुष्यात कोणीतरी यावे ते
रिकामे झालेले ह्र्दय त्या सुंदर स्पंदनांनी भरून टाकावे


मला सारखे वाटते डोळे मिटताच तिचा चेहरा समोर यावा
अन डोळे उघडताच तिच समोर यावी
असे वाटणे अन वाटून घेणे चालूच आहे
प्रत्यक्षात मला तुझी गरज आहे
कारण मन माझे एकटे झाले आहे
त्याला तुझी साथ हवी आहे . . . . .

फक्त एक दिवस . . .


फक्त एक दिवस . . . .
फक्त त्य प्रात:कालासाठी
मला तुझे हास्य पाहायचे आहे
मी सारखा हसत राहीन
तुझे अश्रू पाझरता
ते मी मोत्यासारखे जपीन

फक्त त्या प्रात:कालासाठी
मी तुला जे पाहीजे ते मिळवून देईन
तू मला फक्त ते हास्यच दे
आणि त्या हसण्याचा गोडवा मला जाणवू दे

त्या प्रात:कालाच्या आशेमागे
मी तुझ्यासाठी माझे जग थांबवीन
आणि तुझ्या भातुकलीच्या खेळात
राजा-राणीच्या खेळात सहभागी होईन

त्या प्रत्येक सु:खासाठी
त्या भर दुपारी
मी माझे सर्वस्व तुझ्यासाठी अर्पण करीन
मी माझे स्वत:ला विसरून जाईन

त्या क्षणांसाठी मी . . . .
मी त्या काळजी
त्या चिंता सर्व विसरून जाईन
फक्त तुझ्या त्या गोड हसण्या साठी

फक्त त्या मध्यन्हाच्या सोख्यासाठी
मी तुला जगातले सर्व सु:ख देईन
ते सर्व काही करीन
तुझ्या त्या गोड हसव्या साठी

त्या संध्याकाळी
मी तुला माझ्या कवेत समावून घेईन
तुझ्या आयुष्याच्या तु
झ्या जन्माच्या गोष्टी
तुला हळूवार पणे सांगत होती

मी त्या संध्याकाळीमी
त्या प्रत्येक क्षणी
मी देवाला पूजत बसीन
मला आयुष्यातील सर्वात मोठी भेट दिल्याबद्दल

मी त्या माता-पित्यांना मदत करीन
जे आपल्या मुलांना शोधत आहेत
त्यांच्या आठवणीत कणत आहेत
जे पालक त्यांच्या मुलांच्या खोलीत न जाता
त्यांच्या थडग्याकडे वळत असतात

मी प्रार्थना करीन
त्या माता-पित्यांसाठी
जे आपल्या मुलांना
त्या होस्पिटल मध्ये कणताना
आणि त्रास सहन करताना अस्वस्थ होत आहेत

आणि हळूच तुझ्या डोक्यावर पापा घेईन
तुझ्या त्या सुंदर केसांवर हात फिरवून
देवाकडे एकच प्रार्थना करीन
ती पुन्हा पुन्हा असाच एक दिवस
माझ्या आयुष्यात येत राहा . . . . . .

रात्री पावले चालत जाता


अनेक वाट पाहत गेलो
अनेक वाट चालत गेलो
प्रत्येक वाटेत सु:खं अवतरली
अन प्रत्येक वाटेत दु:ख अवतरली
पण ही वाट माझी नाही सुटली

ती वाट मला आपली वाटते
त्या काळोख्या अंधारात
त्या चांदण्या रात्रींमध्ये
चांदण्या प्रकाशात न्हाऊन जाता जाता

सखे सोबती सोडून जाता अ
नेक झाडं पाहत जाता
ते गाणे मनात गुण गुणत असते
त्या गाण्याची मी मजा मात्र मी घेत असतो

स्वप्नच जणू की काय
मी तिच्या खांद्यावर डोके ठेवूनत्या ताय्रांकडे पाहत होतो
आणि त्या ताय्रांमधली नक्षत्रे मोजता मोजता
जणू तिच्या तारकमय झालेल्या नयनांत हरवून गेलो

अश्याच रात्री चालत जाता
हळूच मागून कोणी येते
असा भास करून जाते
तारकांतून एक नक्षत्र जमिनिवर अवतरते

रात्र आहे तारकांची
तर रात्र आहे शांततेची
मन माझे मज नेई त्या तारकांमध्ये
विसरून जाई मी माझे स्वत:ला

असाच चालत राहतो त्या रात्री अपरात्री
त्या वाटांमधून माझी पावले मला कुठे घेऊन जातील
माझे मलाच माहीत नसते
पण अशाच रात्री मला त्या चांदण्यात घेऊन जातात

मन माझे सुखावत असते . . . सारी दु:ख विसरत असतो . . . .

ते गाणे संपण्याआधी. . . .


तुम्ही त्या मुलांना पाहीले का
त्या झोपाळ्यावर खेळताना
त्या पावसाच्या धारा ऐकल्या का
जमिनीवर नाच करताना

त्या फुलपाखराच्या बागडण्याकडे पाहीलत का
त्या सुर्याचा अस्त होताना त्याचा निरोप घेतला का
जरा हळूच चाला की
संथ होऊ दे हे जग सारे

वेळ खूप कमी आहे पण
ते गाणे कधीच संपले नाही
तुम्ही प्रत्येक दिवसाचा आरंभ-अस्त
असाच धावता धावता करत असता का ?

कधी कोणाची चौकशी केली तर
त्याचे उत्तर शोधत असता का
जेव्हा दिवस मावळतो तेव्हा तु
म्ही तुमचे डोळे मिटता का ?

त्या अनेक अनेक विचारांच्या
भोवय्रातुन बाहेर पडलात तर . . . .
जरा हळू चाला
संथ होईल हे जग सारे तुमच्या बरोबर

वेळ खूप कमी आहे
ते गाणे कधीच संपणार नाही
कधी तुमच्या मुलाला सांगितले का ?
उद्या पुन्हा एक नवीन सकाळ उगवेल

तुमच्या उत्सुकतेत तुमच्या आनंदात
विसरुन गेलात त्याचे दु:ख त्याचे सु:ख
कधी तयाचा स्पर्ष चुकता चुकता
एका मैत्रीभावनेचा अंत होतो

कधी न बोलु शकलो
एखादा शब्द आपुलकीचा
जरा हळू चाला की हो
ह्या जगाला ही तुमच्याबरोबर संथपणे चालू द्या

वेळ खूप कमी आहे
तरी ही अजून ते गाणे चालूच आहे
जेव्हा तुम्ही एखादे लक्ष गाठत असता
जेव्हा उत्सुकतेने आनंदाने घाई करता
तेव्हा त्या घाई घाईत त्या लक्ष मिळाल्याचा आनंद मागेच सोडून येता

जेव्हा चिंता करता करता
घाई घाई मध्ये दिवस मावळतो
एखाद्या न उघडलेल्या पेटीसारखे को
पय्रात फेकून दिले जाते

ते आयुष्याचे न उलगडलेले कोडे
आयुष्य ही काही एक शर्यत नव्हे
जरा हळू चाला ते गाणे संपण्याआधी. . . .
ते गाणे ऐकण्याचा आनंद घ्या ....

सखे सोबती सोडून जाता

सखे सोबती सोडून जाता
सखे सोबती सोडून जाता
आठवण त्यांची येत असते
झाल्या गेल्या सर्वस्वाची
आठवण सारखी येत असते

मित्र कि मी सखे म्हणावे
प्रत्येक क्षणांचे सोबती असे ते
शत्रूंचाही विसर पडावा
असे त्यांचे नाते असे ते

कोणी असावा बालमित्र कोणी
असावा वर्ग मित्र
कोणी असावा नवा मित्र
ज्यांसी ते नाते उमगले
त्यांना विसरणे कठीण झाले

दिवसामागून दिवस उलटले
वर्षामागून वर्षे उलटली
सखे सोबती म्हणता म्हणता
कालावश ते होऊ लागले

अश्रु पाझरती जेव्हा माझ्या
मित्रांची मज आठवण येते
सु:ख दु:खाचे क्षण आठवता
सखे सोबती निघून गेले

अश्याच आठवणी जगता जागवता
अनेक मित्र होऊन गेले
सखेच का ते बनून गेले म
नात घर ते करून गेले

हसता हसवता . . .

कधी दु:खी कधी सु:खी
कधी रडती कधी हसवीती
दु:खं अशी जमता जमवता
हसता हसवता पाझरत असतात

आयुष्यातील क्षणांक्षणांतून आठवण तुझी येत असते
नकळतच अश्रुंची एक धार वाहत असते
पण नकळतच का तुझ्या त्या सुखद आठवणी
फ़ुलवत असतात मला हसता हसवता

नकळत कोणी दूर निघून जाते
दु:ख अश्रु देऊन जाते
मग मागून हळूच डोळे झाकते
चेहय्रावर ह्ळूच हास्य फुलवते

दु:खी असता जवळ येतेस
वाहत्या अश्रुंवर हात ठेवतेस ह
ळूच जवळ येऊन गोड बोलतेस
तो गोडवा जणू मनात रुजतो
चेहय्रावर एक हास्य फुलवतो

म्हणूनच म्हणतो प्रत्येक क्षण आठवता
आठवण तुझी येत असते
मन माझे दु:खी होते
हळूच तुझी चाहूल लागते
जणू तू येउन चालून जातेस
मन माझे दु:ख विसरते चे
हय्रावर हास्य फुलवते

हसता हसवता . . . . .

झाड

आपण नेहमी म्हणतो
झाडे लावा झाडे जगवा
पण खरोखर आपण झाडे लावतो
पण ती जगवत नसतो

लहानगे रोप असते
वेलींच्या ओढ्यामध्ये गुरफटलेले
सुंदर सुंदर फुले बहरती
सुंदर सुंदर सुगंध दरवळती

कधी न राहीले भान त्याचे
कापत गेलो कुंटत गेलो
तेच ते होते झाड जे
मज अन सर्वत्र श्वास पसरवत होते

ते झाड असते पिंपळाचे
जाळीदार पानं देणारे
ते झाड असे गुलमोहराचे
गुलाबी फुलांनी गुलाबी करणारे

पण माणूसच का तो
झाडे लावत असतो व ती मारीत असतो
तीच असतात झाडे
जी त्या माण्साच्या म्रुत्युकाली उभी असतात तयाचे शव वाहून नेण्यासकधी

कधी त्या झाडाच्या सावलीचा आडोशा घेत असतो
त्या सावली मध्ये नाहीसा होत असतो
पण नसते ती सावली
जेव्हा ते झाड नसते

प्रेमी येतात त्या झाडामागे
प्रेम आणि प्रेम वाढवत असतात
त्या झाडावर u & me forever असे लीहीत असतात
पण ते झाड नसते त्याची आठवण जपायला जेव्हा ते झाड नसते उभे

लहानगे रोप होते जेव्हा झाड
तेव्हा वाटते की त्या झाडाला कापू नये
पण जेव्हा ते व्रुद्धींगत होत असते
तेव्हा त्याच्याकडे कोणाचेही लक्ष नसते

त्या झाडाखाली खूप खेळलो
त्या झाडाला येणारी फळ वा फुले उपसली
पण ते झाड तसेच उभे होते
काही ही बोलत नव्हते

पण जेव्हा ते झाड तोडायची वेळ येते
तेव्हा ते झाड तसेच उभे असते
ते झाड पडते
त्या सर्व आठवणी त्या झाडासकट धुळीला मिळतात
पण त्या झाडाच्याच जागी कधीना कधी
एक रोप उभेच असते

रोप लावीती रोपं वाढवती
फुले उमलती फुले बहरती
ते झाड उभे राही वर्ष न वर्षे
पण प्रत्येक क्षणी आठवण येई
जेव्हा ते झाड नसे अवती भोवती

तुला आठवताना ....


कधी मी त्या सरलेल्या आठवणींमध्ये हरवतो
तेव्हा मी आयुष्यातल्या सर्व आठवणींमधून वावरत असतो
जेव्हा त्या सुंदर आठवणींमधून मी वावरत असतो
तेव्हा मी जणू त्या आठवणींच्या विश्वात हरवलेला असतो

त्या आठवणींमध्ये चुकूनच जणू तुझी आठवण येते
त्या अनमोल क्षणांची आठवण येते
त्या प्रत्येक व्यक्तिची आठवण येते
त्या सुख - दु:खांची आठवण येते

तुला आठवताना मी हे जग विसरतो
तुला आठवताना आयुष्यातले सर्व क्षण विसरतो
तुला आठवताना ती दु:खं विसरतो
तुला आठवताना हरवलेले ते अश्रू विसरतो

त्या आठवणींमध्येच माझे सर्वस्व हरवून गेले
जेव्हा मी तुला त्या आठवणींमध्ये सोडून गेलो
असाच मी त्या आठवणींत हरवून जातो
मनातल्या मनात लहान मुलासारखा रडत असतो

तुला आठवताना ... तुला आठवताना........

म्रुत्यु

मी नेहमी म्हणतो
आयुष्य खूप सुंदर आहे
सु:खी आहे दु:खी आहे
पण कधी तरी येतो तो अंत

अंत प्रत्येक भावनेचा
अंत प्रत्येकाच्या जीवनातील मर्यादेचा
अंत प्रत्येकाच्या इच्छाशक्तीचा
आणि ज्याला आपण म्हणतो .....म्रुत्यु

तो निर्जीव असतो
त्याला नाही भावना कळत
नाही कळत प्रेम-आस्था
तो येतो आणि सर्व उध्वस्त करून जातो अगदी एका वावटळीसारखा

कधी म्रुत्यु आनंद देतो मुक्तीचा
मोक्ष मिळण्याचा
तर कधी म्रुत्यु संपवतो
आनंद आपल्या जीवनातील आठवणींचा

म्रुत्यु असते जीवनाच्या अभ्यासानंतरची परीक्षा
तर म्रुत्यु असतो नव्या जीवनाचे उघडलेले दार
आपण म्रुत्युला थांबवू शकत नाही
म्रुत्यु आपल्यासाठी थांबू शकत नाही

तो खूप काही घेतो
तो खूप काही देतो
ठरवायचे असते आपले आपणच
म्रुत्यु द:ख देतो की सु:ख घेतो

ठरवायचे असते आपले आपणच
की म्रुत्यु असते एक शेवट
की नव्या आयुष्याची सुरुवात
असाच असतो हा म्रुत्यु आठवणी संपवणारा आ
ठवणी जागवणारा

अंतानंतरचा शेवट आणि शेवटाची सुरुवात . . .

किनारा

ओल्या वाळूत चालत असता
सुर्यकिरणांचा आडोशा घेत जात असतो
प्रात:कालाची वेळ असते
सुर्य नीट बाहेर आलेलासुद्धा नसतो

समुद्र काहीतरी सांगत आहे
असे समजून जणू मी त्या लाटांकडे पाहत असतो
लहान मुलं त्या वाळूमध्ये खेळत असतात
लहान लहान किल्ले बनवत असतात

त्यांना हे माहीत असते ते किल्ले पडणार
तरी सुद्धा ती मुलं पुन्हा नवे किल्ले उभारतात
पण ते किल्ले त्या किल्ल्यांपेक्षा मोठे असतात
आणि ते मोठ्यातली मोठी लाट सामोरे जातात

कधी कधी जणू हा किनारा
खूप काही स्वत:मध्ये समावून घेत असतो
ती दु:ख ती सु:ख त्या आठवणी
अन त्या भावनासुद्धा कधी कधी हा किनारा संपवतो

त्या किनाय्राला लोटणाय्रा त्या लाटांच्या आशा
प्रत्येक माणसाच्या जीवनाच्या आशा
त्याच्या भावनांच्या आशा
पण हाच तो किनारा . . . .

जो एक नवीन आयुष्य देत असतो
त्या लाटेला परत बोलवत असतो
कधी कधी मिलनही घडवून आणतो
कधी कधी शांततेचा अंत शोधुन देतो

पण माझे मन मला नेहमी याच किनाय्रावर नेते
जिथे माझ्या भावनांचा होतो अंत
पण त्या अंतामधुनच एक नवीन सुरुवातही होते
माझे मनसुद्धा त्या लहान मुलासारखे असावे
जिथे सर्व आशांचा अंत होतो
तिथेच नवीन सुरुवात करायला सांगतो

हा किनारा कधी संपतच नाही
कारण ह्याच किनाय्रावर अनेक अंत होतात
अन त्याच किनाय्रावर अनेक सुरुवातीसुद्धा होतात

फक्त तुझ्याच साठी .....


आयुष्यातले प्रत्येक क्षण मोजत असता
मला हळूच चाहूल लागून जाते
एक सावली पडून जाते
थंड वारा वाहवून जाते

तेव्हापासून सारखी मी वाट पाहतो
त्या सावलीची
ती चाहूल त्या
थंड वाय्राच्या झोक्याची
नजरेसमोर येणाय्रा त्या व्यक्तिच्या प्रतिबिंबाची

तेव्हा पासून
मन माझे मला सांगत असते
वाट पाहायची तिच्यासाठी
वाट पाहयची त्या सावलीसाठी

कधीतरी ती व्यक्ति समोर येते
मनाला आनंदाचा अस्वाद देते
तिच्या फक्त गोड शब्दांमधून
अनेक गोडवे जाणवतात

तेव्हा माझे मन स्वत: ठरवते
सर्व काही मिळवीन फक्त तुझ्यासाठी
सर्वकाही सोसीन फक्त तुझ्यासाठी
आयुष्यातला प्रत्येक क्षण देईन फक्त तुझ्यासाठी

आयुष्यातील सर्व दु:ख
गोळीसारखी एकाच वेळी गिळून टाकीन
डोळ्यातले अश्रु न थांबल्यास तुझे चित्र पाहीन
अन ते डोळे मिटिन

मला असेच वाटते ....
आयुष्य जगावे हे तुझ्याच साठी
सर्व काही संपवावे फक्त तुझ्याच साठी
प्रत्येक क्षण सोनेरी बनवावा फक्त तुझ्याच साठी
हे ह्र्दय काढून द्यावे
फक्त तुझ्याच साठी . . . ..

तपस्या

मी करतो ती तपस्या
मनातील कामना पूर्ण होण्यासाठी
मी करतो ती तपस्या
माझे अस्थिर मन शांत करण्यासाठी

तपस्या करावी अनमोल प्राप्तीसाठी
तपस्या करावी अनमोल व्यक्तिसाठी
अशीच करावी का तपस्या
वर्ष दिवस रात्र पाहून

जीवनाचा मार्ग शोधावा अशीच ही तपस्या करून
तपस्या त्या दु:खी मनाचीत
पस्या त्या धडधडणाय्रा ह्र्दयाची
मीच का तो तपस्या करणारा
मला हवे असणारे सुखहवी असणारी शांती मागणारा

होईल का ती तपस्या पूर्ण
होईल का ती कामना पूर्ण
तो मनाचा कासावीसपणा
ती मनातील अस्थिरता दूर होईल का ?

माझ्यापासून जवळ येइल का ती अनमोल व्यक्ति
म्हणूच आयुष्यातील हा असा काळ
माझ्यासाठी माझी तपस्या . . . .

कविता आणि कविता

ती कविता मनातील भावनेतून निर्माण होते
तर ही कविता त्या शेजारच्या भावनेबरोबर नेहमी येते
या कवितेला वाचता येते सहज
पण नाही लिहीता येत तिच्यासाठी एक ओळ

माझ्या मनात या दोन्ही कविता येत असतात
पण त्या दोन्ही मला हव्या असतात
कविता केली की मन हलके होते
कविता आली की ह्रदय भरून येते

कविता अंधार व्यक्त करणारी
कविता त्या अंधारातसुद्धा उजळून दिसणारी
कविता माझ्या प्रेमळ भावना व्यक्त करणारी
कविता माझ्या प्रेमाची उपमा म्हणून शोभणारी

नसतो दोघींमध्ये एवढा फरक
असतात एकाच नावाच्या पण
ती कविता कविता असते
भावना प्रेम दु:ख सांगणारी
अन ही कविता असते
भावना समजून घेणारी
मजवर खूप प्रेम करणारी
आणि माझ्या प्रत्येक दु:खात साथ देणारी . . .. . .. . . . .. . . . . .

मैत्री . . . . .

कधी कधी एकमेकांबद्द्ल बोलता बोलता
एकमेकांशी एकदुसय्राबद्दल काही ना काही तरी
तेव्हा कुठे एक नात्याची सुरुवात होते
तेव्हाच कुठेतरी तुझ्या नि माझ्या मैत्रीची सुरुवात होते

ती मैत्री जीवाभावाची .......
ती मैत्री वर्षां वर्षांची ......
जेव्हा आपली मैत्री होते .....
तेव्हा दोघांनाही एकमेकांचा आपापल्या मैत्रीचा हेवा वाटतो

असेच आपण मित्र
असेच आपण मित्र ..........
जेव्हा होतो एकमेकांपासून दूर
तेव्हा पून्हा भेटल्यावर एकमेकांशी गप्पांमध्ये हरवून जातो

अशीच असेल जर ही मैत्री
तर मिसळून जाईन ह्या सुरेख नात्यात
ह्या मैत्रीमध्ये मिसळून जातो असा मी
मित्र मित्र करत राहतो मी

कधी एखादी मैत्रीण होऊन जाते
ती मनातले सर्व भाव विस्कटून जाते ती
मित्र - मैत्रीणी बनता बनता
मिसळून जातो एका नात्यात

अश्या त्या नात्यात जे कधी न सोडवू शकले मला अन तीला
तेच ते नाते मैत्रीचे
जे मिळाले मला त्या रूपाने
कधीही विसरू शकणार नाही तीला

अशीच ही मैत्री जीव जिव्हाळ्याची
अशीच ही मैत्री कट्टी बट्टीची
अशीच ही मैत्री नात्या गोत्यांची
अशीच ही मैत्री प्रेमा प्रेमाची............

मला काही तरी सांगायच आहे . . . . .


एका मुलीच्या भावना मी ह्या कवितेतून व्यक्त करण्याचा पहिला असा हा प्रयत्न

मला काही तरी सांगायच आहे
माझ मन मला हलकं करायच आहे
कोणी माझे बोलणे ऐकेल का ?
मला तुमच्याशी काही तरी बोलायच आहे

खूप दिवसांपासून मी त्याला शोधत होती
त्या अनेक सावल्यांमधून त्याला मी शोधत होती
मनातल्या आशा सरत चालल्या होत्या
तरीही मी त्याला पुन्हा पुन्हा शोधत होती

मी त्याच्या विचारांमध्ये गुंग झाली होती
अचानक मला त्याची चाहूल लागली
त्याचे मला प्रतिबिंबच जणू मला दिसले
मी त्याच्याकडे धावत गेली
पण तिथे असे काहीच नव्हते

माझे मलाच काही कळत नव्हते
मी त्याची अजूनही वाट पाहत होते
त्याची चाहूल अजूनही शोधत होते
पण माझे सर्वस्व जणू........त्या अश्रुंच्या धारेमधून वाहून गेले

पाऊलवाट


येता जाता अनेक रस्ते भिडतात
आपल्या आपल्या मार्गी जाऊन संपतात
पण ती वाट त्या पाऊलवाटा आपल्याला खूप वेळा भिडतात
आपले आयुष्य बदलून जातात

येता जाता रस्ते चालून जातो
अनेक मार्ग बदलत असतात
आयुष्याचे मार्ग बदलत असतात
पण ती वाट एकच असते
पण असतात पाऊलवाटा अनेक

वाट ती चालून जातो मी
त्या वाटेत अनेक व्यक्ति भेटतात
काही आपले होतात तर काही परके होतात
पण तरीही मी ती वाट चालतच राहतो

मनाला वाटत असते कधी संपेल हा प्रवास
मला ही येतो चालत राहण्याचा कंटाळा
मी चालत असताना हळूच मागून कोणीतरी येते
अन माझा हात पकडून मला पुढे घेउन जाते

अन माझी संपत आलेली वाट . . .
पुन्हा एक नवी वाट शोधते
माझा पुन्हा एक नवा प्रवास सुरु होतो . . . . . . .

अयुष्यातील वळणे . . . .

कधी तरी मला वाटत की मी हे सर्व सोडून कुठेतरी दूर निघून जावे
पण आयुष्याच्या वळणांवर ते वळण पून्हा कधी तरी परत येणारच
जेव्हा मी त्या वळणावर पून्हा येऊन ऊभा राहीन
तेव्हा माझे सर्वस्व बदलले असेल
अशीच असतील का आयुष्यातील वळणे . . . .

आणि मी कदचित एखादी नवी सरुवात करीन प
ण कधी हे दिवस सरतील कुणास ठाऊक
पण मला आशा आहे की माझे जीवन नक्कीच सुधारेल
कारण माझा मार्ग त्या सुटलेल्या मार्गाकडे चालला आहे
जो मी दोन वर्षांपूर्वी सोडला होता

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नेहमीच बदल होत असतात
आणि त्यात काही नवीन नाही
पण काही बदल हे त्या माणसाला बदलणारे सुद्धा असतात
आणि ज्यावर कुणाचाच बस नसतो

तरी पण तो माणूस सर्व सहन करू शकतो
कारण होणाय्रा बदलांप्रमाणे
माणसाची सहनशक्ती वाढत जाते
आणि त्यावर ही कोणाचा बस नसतो
आपल्या आयुष्यात कधी काही नवीन घडले की त्याचा आपल्याला आनंद होतो पण .....
कधी काही नवीन होऊन काही तरी बिघडते तेव्हा त्याची खंत सुद्धा आपल्याला होते

जर आपले आयुष्य असेच असेल तर
आपल्याला ह्या आयुष्यातून खूप काही मिळेल
ज्याचा आपल्याला खूप अभिमान वाटेल
आणि आपण सामान्य माणूस नसण्याचा आपल्याला हेवा वाटेल

जर अशीच असतील ही आपल्या आयुष्यातील वळणे
तर प्रत्येकाचे आयुष्य नक्कीच सुधारेल


वादळ

आयुष्यात वादळ येतात अनेक
जी सर्व काही संपवून टाकतात
सगळीकडे अंधार पसरवून टाकतात
व सर्व काही नव्याने सुरु करतात

वादळ असतात अनेक
ती कधी आपले आयुष्य बदलतात
ती कधी आपल्याभोवतीचे आयुष्य बदलतात
पण ही वादळ अजुनसुद्धा कोणी थांबवू शकले नाही

वादळांना सामोरे जावे लागते
जेव्हा ती आपले आयुष्य उध्वस्त करतात
वादळ नकोशीसुद्धा वाटत नाहीत
कारण ती आपल्या आयुष्याचे नवे पर्व निर्माण करतात

अशीच ती वादळ माणसं संपवत असतात
जे त्या वादळाला सामोरे जात नाहीत
व अशीच ही वादळं माणसं घडवत असतात
जी सर्व काही संपले असून सुद्धा . . . . . .
नव्याने उभे राहण्याची आकांक्षा बाळगत असतात

अनोळखी

आयुष्यात येताना जाताना लोक भेटतात
एकमेकांच्या ओळखी होतात
एकमेकांमध्ये मैत्री होते
आणि ती ओळख अगदी द्रुढ होऊन जाते

पण एकदा अशी ओळख होते
जणू असे वाटू लागते वर्षा वर्षांची मैत्री असावी
जेव्हा होते अशी ओळख
तेव्हा नाती जुळतात अनेक

शी ही ओळख मित्रा मित्रांमधली
अशी ही ओळख नात्या नात्यांमधली
अशी ही ओळख तुझी नि माझी
जणू ती ओळख मनात जाऊन रुजते

कधी अशीच भेटते ती ओळखणारी व्यक्ति
कधीच न बोललेल्या गोष्टी आम्ही बोलतो
बोलता बोलता ती ओळख पाळख विसरून जातो
एकमेकांच्या विचारांत हरवून जातो

कधी मला भेटते ती ओळखणारी व्यक्ति
ओळख न दाखवून निघून जाते
राहून जातात त्या गप्पा
विसरून जातात ती जुळलेली नाती
अचानक का होईना पण,,,

,होऊन जाते ती व्यक्ति मजसाठी अनोळखी . . . . . .

रंग कवितेचे . . . .

कवी काविता करतात
आपले भाव इच्छा आकांक्षा त्यातून व्यक्त करतात
त्या कवीता सुरेख असतात
सुंदर असतात अगदी त्या कवींच्या मनासारख्या

जस-जश्या कवीता तयार होत जातात
प्रत्येक कवीच्या भावना त्यातुन फुलु लागतात
अगदी एका प्रात:काळी दव पडून
उमललेल्या फुला सारख्या

कविता दु:खी असते
सु:ख देणारी असते
खूप काही सांगणारी असते
खूप काही बोलणारी असते

प्रेमी प्रेमकवीता लिहितात
दु:खी विरह कवितेतून दाखवतात
काही कविता खूप वेगळ्या असतात
एका शब्दापासून तयार होतात
अन त्याच शब्दावर येऊन संपतात

म्हणूनच कविता ह्या रंगलेल्या असतात
प्रत्येक भावनेच्या रंगाने
प्रत्येक कविच्या मनातील विचाराने
त्यांच्या कविता आवडणाय्रांच्या प्रतिसादांनी
प्रत्येक सु:ख दु:खांच्या रंगानी

अशाच असतात त्या रंगलेल्या कविता
असेच असतात त्या कवितांमधले अनेक रंग . . . . .

भावना जपताना

मनातल्या भावना नाजूक अश्या
प्रेमाच्या भावना मैत्रीच्या भावना
नात्या-गोत्यांच्या भावना
माणसाच्या माणसाबद्दलच्या भावना

जेव्हा भरून येतात त्या भावना
ह्या नाजूक ह्रदयात
ह्या अशांत मनात
त्या काळजात रुजुन जातात

मन भरून येते जेव्हा त्या प्रेमाच्या असतात
आनंद होतो जेव्हा त्या प्रिय व्यक्तिपर्यंत त्या पोहोचतात
पण दु:ख होते जेव्हा त्या पोहोचत नाहीत
दु:ख होते जेव्हा त्या दुखावतात

आनंदाने बहरुन आलेले मन
विरहाने निराश होऊन जाते
आनंदाने फुललेले ते फुल
विरहाने कोमेजून जाते

ह्या भावना एका वाहत्या नदी सारख्या
भरून येतात तेव्हा भरून वाहतात
पण जेव्हा दुखावतात तेव्हा
तेव्हा दु:खरुपी गोट्यांच्या रुपात
वाहायच्या थांबतात

आणि त्या गोट्यांमधून वाहतात
फक्त त्या चमकणाय्रा अश्रुंच्या धारा

भावना जपल्या असत्या तर......
नसती झाली असती ती मन दु:खी
नसते झाले त्या ह्र्दयाचे तुकडे
नसता झाला कोणीही निराश

भावना दु:खावताना
भावना ह्या जपायच्या असतात
प्रेमासाठी सांभाळायच्या असतात
आपल्या आपल्यांसाठी जपाव्या लागतात
प्रिती - प्रेयसीसाठी जपाव्या लागतात
अशीच का होते अवस्था ह्या भावना जपताना!!!

अंधार......


कधी एकांतामध्ये कोणाची साथ नसेल तर तो बरोबर असतो
कोणाची साथ नको असेल तर आपल्याला हवा हवासा तो वाटतो
त्याच अंधारामध्ये उजेडाचा शोध करायला लावणारा असा तो
मनातील सर्व विचार स्वत:म्ध्ये समाविष्ट करून घेणारा असा तो
असाच आहे का तो अंधार

द्रुष्टी नंतरचा आभास तो असतो
दिवसानंतरच्या अवधीतला सहवास तो असतो
सावल्यांना मिळणारा आधार तो असतो
प्रत्येकाला सावली देणारा आधार तो असतो
असाच का प्रत्येकाला आवडणारा वा नावडणारा अंधार तो असतो

अंधार प्रत्येकाच्या जीवनातील दु:खामधला
अंधार त्या अखंड रात्रीच्या अस्तित्वातला
अंधार त्या प्रत्येक तिमिराचा अधारस्तंभ
अंधार त्या काळ्या ढगांचा सहवास
अंधार त्या बंद खोलीतला

उजेडामुळे सरणारा तो अंधार
निसटत्या काळ्या ढगांतून सरणारा तो अंधार
बंद खोलीला उघडल्यावर निसटणारा तो अंधार
मनातील चिंता दूर झाल्यावर नाहिसा होणारा तो अंधार
असाच हा अंधार प्रत्येकाच्या आयुषयातला आणि दैनंदीन जीवनामधला!!!................

कविता


मी नेहमी विचार करतो की मी कवीता केली तर
माझ्या मनात कधी कसे विचार येतील कुणास ठाऊक
पण कवीता हीच तर माझ्या विचारांची बोली आहे
प्रत्येक वेळी आपल्या मनामध्ये कविता निर्माण झाली तर ती कशी तयार होईल
याची आपल्याला धास्ती असते
पण कधी ती आपल्या मुक्त विचारांची भाषा सुद्धा असते

कविता केली तर आपले प्रेम उल्लेखीन
कविता केली तर मनातली दु:ख अवतरतील
कविता केली तर मनातले सुविचार अवतरतील
कविता केली तर मनतल्या भावना भरून वाह्तील त्या प्रत्येक ओळीतून
जर मी कविता केली तर माझ्या जीवनातले प्रत्येक क्षण मी त्यातून व्यक्त करीन

कविता करणे हेच जर आयुष्य असते तर काय झाले असते!!!
आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्या कवितेच्या एक एक ओळीतून अवतरला असता
जर कविता हेच आयुष्य असते तर कवी कवी नसते तर एखादे डौक्टर वगॆरे असते
जे लोकांचे आजार त्यांच्या सुंदर कवीतांनधून दूर करत असते

कविता ही प्रत्येक प्रेयसी आणि प्रियकरासाठी
कविता ही प्रत्येक दु:खी व्यक्ती साठी आपली दु:ख व्यक्त करण्यासाठी
कविता ही प्रत्येक सामान्यासाठी आपले सामान्य विचार कवितेद्वारे मांडण्यासाठी
अशीच असतीकां ही कविता जर ती मी केली असती तर ..........