Wednesday, December 30, 2009

एक क्षण सोहळ्यासारखा...




आयुष्य जगण्या
पुरे असते एक आयुष्य
तेच जगता जपतो आपण
अनेक श्वास......अनेक आठवणी...
अन ते सारे विसावते........
एका श्वासासाठी.............

जेव्हा बनतात ते श्वास......
कारण...जगण्यासाठी....
तेव्हा आपले आयुष्य
बनतो एक सोहळा.....

जरी कोणी मानत नसे....
आयुष्य एक सोहळा...............
मग जगून पहा त्या प्रत्येक श्वासासाठी....
तो श्वास जगलेल्या क्षणासाठी...

कधी कधी ते आयुष्य ही हरते
त्या क्षणांसाठी...
त्या श्वासांसाठी.....
मग विसावतो तो अंध:कार

उजळून टाकू ते आयुष्य
पुन्हा नव्या ध्यासासाठी....
जगू नवे श्वास...
नव्या उत्साहाने जगण्यासाठी............
ना थांबतील ते श्वास आता...
ना कोणतेही क्षण...............
अन मग.........

मग
तुम्हीच म्हणाल......
जगता आयुष्य असे तो सोहळा...
जगता प्रत्येक क्षण असे तो सोहळा....
सोहळाची माझे आयुष्य..........
अन तो प्रत्येक क्षण एका सोहळ्यासारखा.........

- शशांक नवलकर ३०-१२-२००९.

Thursday, December 24, 2009

जळलेल्या आठवणी....



खूप जळतेयस ना आतून.......
कधीतरी मी ही तसाच जळत होतो..
रडत होतो तडफडत होतो....
तुझ्या साथ मिळण्यासाठी
सगळ्यांशी झगडलो
पण..
शेवट माझाच झाला..
कारण मी तुझ्यावर प्रेम करत होतो............
माझ्या जळणावर शिधाही पडल्या नसतील.......
त्या जळत्या शवास
एकच आस होती....
फक्त तुझ्या येण्याची....
गरज होती त्यास.............
तुझ्याच सावलीची...............
ते शवही नाही उरले आता..
उरली होती
फक्त राख...................
आज तेथे तू जळतेयस................
तुझ्या नव-याच्या मिठीत...
आठवतेयस तू मला...........
त्या प्रत्येक क्षणासाठी................
त्या प्रत्येक आठवणीसाठी..........................
कारण...........
त्या नाजुक काळजात..............
माझ्या अस्तित्वाची वात................
अन मी,
अजुनही जळत आहे.........................
अजुनही जळत आहे.........................


- शशांक नवलकर २४-१२-२००९.

Sunday, December 20, 2009

आज मी शोधत आहे.....


आज मी शोधत आहे.....
त्या सावलीला..जिची सोबत अखंड असेल
जिच्या सोबतीने संपेल तो अंधार..
एकांतातला अंधार...
आजवर कैकदा मी रडलो हसलो
त्या भावनेसाठी
आसुसलो......वाट पाहत राहिलो..
जणु एखादा चातक........
ताहनलेला..पावसासाठी आसक्त
आता मला जगायचय.......
तिच्यासवे..................
एक असे आयुष्य.........
जे असेल फक्त तिच्यासाठी...
अन ती असेल फक्त माझ्यासाठी
तो आभासही सुखावतो
तिचं मिळण्याचा
तिला मिळवण्याचा...
बस्स्स.........
आता पुरे झालं
भावनांची अंधळी कोशींबिर
सावल्यांचा तोच तोच लपंडाव
नको मला त्या रिकाम्या भावना..
तो......तोचतोच पणा
हवय एक जीवन.......
जगण्या तिच्यासवे....तिच्यासाठीच...........
रे देवा? पाठवशिल का तिला माझ्यासाठी?
आज मी तिला शोधत आहे..........

- शशांक नवलकर २०-१२-२००९.

Thursday, December 17, 2009

"show Stopper"

जेथे तिचे नाव नाही
ऐसे कोणते गाव नाही
ओठावरी हसू उमटते
पाहता तिला....
सारे काही थांबते
पाउल पडताच तिचे
स्वप्न पाहते क्षणोक्षणी
घेण्या उंच भरारी
छाटुनी पंख हरएकदा
चालते घेउनी नवे स्वप्न उरी.
.
.
चांदणे पाहता एकली
होईन मी एक तारका
सारे तारे मजभोवती
एकलीच मी मेनका...............
स्वप्न ते चंद्र तार्यांचे
साकार होते आज ते ..........
बनुनी मी एक तारका
सर्व झाले माझे चाहते

बनुनी तारका त्या आकाशी
आज आहे मी एकली
बनुनी एक निमित्त
अजूनही मी एकलीच ..........
.
.
जिंकुनी तो स्वर्ग
आज चढते नशा...
जणू अखंड दिसे
ती धूसर दिशा
आपलेही होता परके
न राहिले मीच माझी
भाग्य ही तितकेच फाटके
भोगते ती चूक माझी

येईन मी पुन्हा..
जाते आहे सांगताना
असेन फक्त मीच........

फक्त मीच.................
एकली.......................................................

Thursday, December 10, 2009

शेवटची कविता.....तुझ्यासाठी

म्हणे नाती खूप अनामोल असतात.....
जितकी मजबूत बनतात
तितकीच लवकर तुटत असतात ......

खरच ही नाती अतूट असतात का....?

जाताना म्हणतेस विसर मला
जमलेच तर आता सावर स्वत:ला
खरच प्रत्येकाला विसरणे सोपे असेल तर......

मी खरच तुला विसरू शकेन का ?

आज मारतो आहे स्वत:ला
एक नवे आयुष्य जगण्यासाठी
जगलो होतो ते नाते जपण्यासाठी

खरच मी तुझ्याशिवाय जगू शकेन का ?

अश्या अनेक कविता...
आज धूळ खात पडल्या आहेत......
तुझ्याचसाठी.....लिहिलेल्या...........

कदाचित तू त्या वाचल्या असशील............
कदाचित नसशीलही.....................


- शशांक नवलकर १० - १२ - २००९.

Saturday, December 5, 2009

खेळ....



किनारा वाळू चंद्र
पुन्हा जमला रे मेळ
शुक्रतारा शोधताना
रंगे प्रेमाचा हा खेळ

शब्द शब्दांची कविता
पुन्हा तोच खेळ
सावल्यांतही तुला शोधताना
न जाणे का संपतो हा वेळ

दिस सरतो एक असा...
तुझ्याविना.....एकलासा..
अंती त्या शोधतो तुला...
वाटे मग तोच दिस हवा-हवासा

हवी तुझी साथ मला..
ना आयुष्यभर ना जन्मजन्माची
रे शुक्रता-या चांदणे आहे तुला
साथ देशील का मला क्षणभराची......

हा खेळ असा
मिलनाचा...
तुझा-माझा.....
सावल्यांचा....
आणिक...प्रेमाचा

- शशांक नवलकर ५.१२.२००९

Saturday, November 28, 2009

तू जाताना.....


खरच....
खूप काही राहून गेले...
तुझ्या भावनांसवे
माझे अश्रूही वाहून गेले.
खूप काही सांगायचे...
काही बोलायचे....
राहून गेले...
तू जाताना....

ते अश्रू आटले असते का?
त्या आठवणींमध्ये धुके दाटले असते का?
ह्या मनातील प्रत्येक प्रश्न....
....असेच सुटले असते का?
ते प्रश्न, प्रश्नच राहून गेले...
तू जाताना....

आता प्रत्येक वाट अलग.....
तिचा अंतही अलग...
सारे काही मुक्त करून जातेयस.......
परत येशील का? त्याच वाटेकडे
परत.......
सारे काही तेच असेल....
पण काही तरी राहून जाईल........
"तू"....जाताना.........

जरी अंत:करणी गारठलो...
तरी जळत राहीन
त्या आठवणींसवे जगत राहीन......
पापण्याही गारठून ओल्या होतील........
तरीही मी जगत राहीन.......
तुझी वाट पाहत राहीन............

खरच.........
जगणे असेच असेल का ?
तू जाताना............

- शशांक नवलकर २८-११-२००९.

Friday, November 20, 2009

उध्वस्त मी.......................


प्रेमात तुझ्या
हरवूनी अस्तित्व माझे
तुटलो तुकड्यात मी
तुकड्यातुकड्यातूनही रक्त ओथंबले
जाहलो असा उध्वस्त मी

होऊनी निष्पर्ण तुझ्यासवे
त्यागले आज स्वत:ला
त्या प्रत्येक कर्मासाठी
पापासाठी पुण्यासाठी जगण्यासाठी
जाहलो असा उध्वस्त मी

ओठावर तुझ्या हसू पाहतो
जळतो मी
पाहुनी भस्म होत्या स्वप्नांना
त्या सर्वांसवे भस्म होतो मी
आज जळते आहे आयुष्य माझे
जाहलो असा उध्वस्त मी

पाहतो एक पहाट कोवळी
नवे आयुष्य जगण्यासाठी
श्वास घेण्या जातो जिथे
घुसमटतो त्या प्रत्येक क्षणासाठी
होतो अंत माझा होता तुझी सुरुवात
ह्या चक्रव्युहात
जाहलो असा उध्वस्त मी

मागतो मृत्यू तुझ्या देवाकडे
मरण्यासही आतुर जाहलो मी
नाही जेथे मृत्यूही
न काहीच माझे माझ्याकडे
आज जाहलो असा उध्वस्त मी............
उध्वस्त मी.......................

- शशांक नवलकर १९-११-२००९

Friday, November 13, 2009

"मी" विरूद्ध मी....



.
शोध घेता मी स्वत:चा
शोध मनातील वादळांचा
ना असे सावली ना दिसे प्रकाश
दिसे "मी"...
वादळात गुरफटलेला.....

वादळ...
माझ्याच प्रतिबिंबांचे
माझ्याच भावनांचे....
माझ्याच सावलीतले.....
माझ्याच मनातले......
जेथे दिसे फक्त....
"मी"

एक कल्लोळ गजबजलेला...
कोप-या कोप-यातही कर्कश्श...असा
मनी दाटते वर्दळ.....
तुटलेल्या स्वप्नांची....
हरवलेल्या आठवांची
अन... त्यात रूतलेला...........
"मी"

आज पाहता डोकावूनी.......
मनात........
असे फक्त "मी"च....
आणि मीच........

चाले एकच सामना.........
"मी विरूद्ध मी.....

- shashank navalkar 13.11.2009.

Thursday, November 12, 2009

"november rain"


तुला आठवताना
गुलाबी थंडीत चिंब करतो....
तो स्पर्श तो गारवा...ते क्षण
आठवतो असाच थंडावलेला
तो "november rain"

लागते अनामिक ओढ...
त्या पावसाची..त्या गारव्याची
तुला आठवतो भिजताना..
तेव्हा...
आठवतो...हा "november rain"

थरथरल्या ओठांनी स्पर्शिलेस
तेव्हा जाणवला तो स्पर्श...गोठवणारा
जणू गुरफटून जावे त्या गारांसवे
तुझ्या मिठीतच........
तेव्हा.....
हवाहवासा वाटतो "november rain"

चालता धुके तुझ्यासवे
जवळ येतेस तेव्हा....
तु माझीच असतेस.....फक्त माझी
जोडतेस मज काळजाचे तुकडे
होतात एक मने दोन तेव्हा...
होतो अविस्मरणीय असा हा "november rain"

हा पाऊस कधीच परत पडला नाही
अवतरला तो जेव्हा
आठवले क्षण अश्रू गारठवणारे
पुन्हा मला त्याच आठवणींत घेऊन जाणारे
असह्य झाल्या त्या वेदना...
पण हा पाऊस
कधी परत पडलाच नाही..........

- शशांक नवलकर १२.११.२००९.

"ती"तली


फुलपाखरं उडताना पाहते
त्यांच बागडणं पाहून स्वत:त हरवून जाते
दिवसा सुस्तावणारी ती बेनाम खोली
रात्री भरणा-या बाजारात
प्रत्येक "पाखराला" पायांनी लाथाडताना रोजच पाहते

फुलांचा सुगंध माडीवर येता
मन बहरून जाते
मोग-याच्या गंधातही शरीराचा वास काढत
येणारा गिराहिक पसंतीचा माल हेरते

तिला कधी नाव नसते
तिचं आयुष्यही निनावीच असते
नाव नसले तरी सर्वासाठी सारखच
एका रात्रीचं ती बि-हाड असते

बाजारबसवी....भटकभवानी
मदनिका कित्येकदा इतरांसाठी होते ती
पण........
हा "पण.."च बदलत असतो
त्यांचे जग त्यांच्यातली "ती"......

एक फुल कुणीतरी देतं...
प्रेमासाठी प्रणयासाठी...
पाकळ्यांसकट प्रत्येक पाकळी उपभोगण्यासाठी,
चार फाटक्या नोटांच्या आशेत स्वत: उपभोगली जाते
घुसमटणा-या मिठीतही घरच्या गरजांचा हिशोब मांडते.

तिचं आयुष्यही असतं ?

मलमलीच्या गालिच्यावरील कोलमडलेली ती
तरीही प्रत्येक रात्र तशीच रंगते,
ती जिवंत स्त्री असली तरी फुलासारखीच कुस्करलीजाते.........
फुलांसारखीच कुस्करली जाते.......

- शशांक नवलकर २८.१०.२००९.

october rain


थंड वा-यात
गुलाबी उन्हात
मंद गंध मातीचा
दरवळतो...

चिंब भिजता
ओल्या आठवांनी
घेता निरोप पावसाचा
पुन्हा अवतरला
तो

प्रेमाचा रंग बहरला
गुलाबी ओठांवरती
थेंब पडूनी मोह आवरला
तिच्या नयनांवरती
तो बरसतो

भिजण्याची मजा
पुन्हा हवी-हवीशी वाटे
पावसातही पावसानंतरही
जेव्हा पुन्हा असा पाऊस....
अवतरतो............

गुलाबी थंडीतही
चिंब ओलावा
पुन्हा सुखावतो..
असा हा "october rain"
मनी माझ्या
बरसतो.

- शशांक नवलकर १०/१०/२००९.

Tuesday, September 29, 2009

माणसांच जंगल



माणसांच्या गर्दीत माणसं एकटीच
माणसांचा शोध घेणारी तीच
अन स्वत:चा शोध घेणारीही....
तीच

जगण्याचा शोध घेता घेता
जगणे विसरून जीव घेता
माणूस म्हणवूनी
माणूसकीचाच जीव घेता

प्रत्येक माणूस हा माणसासाठीच
प्रेमासाठी क्लेशासाठी आनंदासाठी
अगदी पोटापाण्यासाठीही....!
फक्त माणूसच

आज म्हणे
माणसासारखा माणूस उगवला
जीता नव्हे तर डागडूजीतला
मानव उमगला....

पण माणूस म्हणजे माणूसच
श्वासासाठी श्वास देणारा
रक्तासाठी रक्त देणारा
शेवटी .... तो एक माणूसच

माणसांचेही एक जंगल असते ?
हो ..
जिथे माणसंच माणसं असतात
ह्या माणसाच्या गर्दीत मी ही असतो
एकटाच असतो...........
ती माणसंही आपापल्यासाठी
एकटीच असतात का?

- शशांक नवलकर २७-०९-२००९

Saturday, September 12, 2009

ती पायवाट...


ती पायवाट...
ती वाट चालताना
नेहमीच आजु-बाजुला बघत राहीलो
काटा रूतला हळूच चालताना
अन ती पावलच रक्तबंबाळ होत गेली

लाल रक्तांची पायवाट
चालायची सवयच झाली
काटयाकाटयातून वाट काढायची
अन चालत जायची ती पायवाट

रूतल्या काट्यांनी चालायचा
सरावच झाला...

खंत वाटते आता
ती वाट चालताना.............

काटयाकाटयातून चालण्याची
सवय मोडूनच गेली
ती पायवाट चालायची सोडूनच दिली..................

- शशांक नवलकर ११-०९-०९

Sunday, September 6, 2009

तो माझा होता




तो
आठवतो मला
ओघळणा-या अश्रूंतून
काटा बनूनी
रूततो काळजात
रक्तबंबाळ भावनेतून

त्याची आठवण
बनली आज एक दलदल
अंत:करणातील व्यथांची
काळजाच्या पडणा-या ठिक-या
पुरून उरल्या
ती आठवण आयुष्यभर जगण्यासाठी

ते
आलेले एक वादळ
माझ्याच स्वार्थामुळे!!
मनात दाटलेली वर्दळ
ओढावलेल्या एकटेपणामुळे
आसक्त झाल्या होत्या नजरा....
उरलेल्या अंधुक नजा-यामुळे

"तो माझा होता"
लाज वाटते का? म्हणे सर्व
प्रेम केले त्यावर मनापासून
विसरूनी सा-या जगा
आज बदलले आयुष्य सर्व
ओठी शब्द उरले फक्त आता....
"तो माझा होता"
"तो माझा होता"

- शशांक नवलकर ५-९-२००९

Thursday, September 3, 2009

कविता....कवितेसाठी....



प्रिय कवि मित्र आणि मैत्रीणींनो ही कविता फक्त माझ्या शब्दांतून निर्मिलेल्या कवितेसाठी आहे आणि मी आजवर केलेल्या कवितांसाठी आहे . कविता नाव असलेल्या सखींनो काहीही अवचित आढळल्यास क्षमस्व....


कधी सांगतेस कथा प्रेयसीची
तिच्या मनामनातून अंत:करणातून
जाणवते व्यथा त्या प्रत्येकीची
कविते...तुझ्याच शब्दांतून
म्हणूनच करीतो आहे
आज तुझ्यावरच कविता....

चिंब भिजतेस तू
ओल्या कागदांतून....
अनेकांना अशीच स्पर्शतेस
तुझ्या शब्दस्पर्शांतून
अनावर होतो अनाहूत पणे
आतूर होतो लिहीण्यासाठी
त्या हर एक भावनेतून
कविते...ही कविता फक्त तुझ्यासाठी

होतेस तू आधार
त्या त्या लाचारासाठी
होतो तुझा प्रचार
अशा कित्येक आचारांसाठी
तू वाहतेस अनेक मनांतून
तुझे अस्तित्व जपण्यासाठी,
होतेस अमर प्रत्येक पानातून
हे शब्द वाहिले तुला मी....
कविते.....फक्त तुझ्यासाठी

कविते.......होतेस तू
माझ्या विचारांतून
स्पर्शतेस मनांना तुझ्यामाझ्या शब्दस्पर्शातून
व्यक्त होतेस प्रेमातून व्यंगांतून भावनेतून
आज हे शब्द वाहीले तुला...
फक्त तुझ्याचसाठी
कविते लिहीले ही कविता
आज फक्त तुझ्याचसाठी

- शशांक नवलकर ०२-०९-२००९.

Sunday, August 30, 2009

तडजोडींचा रंगमंच



पडदा पडण्यापूर्वी नेहमीच
चेह-यावरचा मुखवटा गळून गेला
सु:ख येण्याआधीच ओंजळीत
तडजोडीच रस्ता शोधून गेल्या

घडवीत होतो एक नवा चेहरा
त्या प्रत्येक मुखवट्यावरती
तो प्रत्येक मुखवटा नेहमीच
अनेक व्यंगांतून गळत होता

आयुष्याचा हा रंगमंच
नकळतच खंगत गेला
उरल्या सुरल्या धाग्यांनी
तो कठपुतळीचा खेळ रंगत गेला

ओंजळीत नेहमीच अश्रू आले
सु:खासाठी नेहमीच मन आतुरले
तरीही सारीपाटावरचा खेळ चालतच गेला
तो चालतच गेला ... चालतच गेला

पडदा पडण्य़ापूर्वी नेहमीच
चेह-यावरचा मुखवटा गळून गेला
सुख येण्यापूर्वी ओंजळीत
तडजोडीच रस्ता शोधून गेल्या
तडजोडीछ रस्ता शोधून गेल्या

- शशांक नवलकर २९-०८-२००९

Sunday, August 16, 2009

... ...

एकांती तारकांत शोधते तुला
हरवून जाते मी तुझ्या आठवणीत
आसुसलेल्या नजरांनी आज सांगते तुला
येशील का रे तू.. माझ्या जीवनात..........

शब्द होऊनी बेफाम पाऊस धारा
तुझ्या आठवणींत बेधुंद कोसळतात
कसा आवरू हा पसारा आठवणींचा
आठवणींच्याच गारा काळजावर बरसतात

नकोत मजला हे अश्रूही आता
अश्रूंच्या पावसात मी कण कण ओघळले
प्रत्येक वेळी त्या पावसात तूच होतास
हे वेडया तुला कधी का ना कळले?

तूच म्हणतोस..घेईन मी मिठीत तुला
मी म्हणते...माझे आयुष्य दिधले मी तुला
येऊनी मिठीत तुझ्या गुरफटलेल्या कवेत
सुखाच मरण जगायचय मला एकदा.....

रूसला आज पाऊसही माझ्यावरती
म्हणूनी...एकदा मजसारखी तू ही बरस
इतकी बरस
इतकी बरस
इतकी बरस
की कर त्याला ही चिंब तुझ्या तुषारांनी
मग तो ही म्हणेल
हे पावसा तू माझ्यासाठी असाच बरस.......

बरसशील का रे अश्याच पावसारखा..
तू माझ्यासाठी............
होशील का रे तो पाऊस..
तू माझ्यासाठी.........
होशील का रे तो पाऊस तू माझ्यासाठी

- शशांक नवलकर १४-०८-२००९

तुज एकांती स्मरताना.....

तुज एकांती स्मरताना
मन घायाळ होऊन जाते
लाल गुलाबी पहाट जगताना
दु:खांती रात्र होऊन जाते

रे सख्या....आज तू नाहीस
अंत:करणी अनेक दु:खं वेचते आहे
अंधुक पाणावलेल्या नजरांनी
त्या प्रत्येक आठवणींत तुला शोधते आहे

बर झाले.....आज तू नाहीस
त्या सुंदर आठवणींना जपूनी
घटका घटका आयुष्य जगते आहे
त्या आठवणींही आज नकोश्या होतात
पण तुला आठवूनी श्वास जगते आहे

तुज एकांती स्मरताना
मन कावरं बावरं होते
नाही...आता नको हे आयुष्य
सा-यातुनही अलिप्त राहावेसे होते
नको आहे ते कैवल्य नको आहे ते प्रेम

काही क्षणही पुरेसे होतात
तुज एकांती स्मरताना
तुज एकांती स्मरताना...........

- शशांक नवलकर ५-८-२००९

असे कसे बांधिलेस हे नशीब रे

हल्लीच आलेल्या ’लक’ या चित्रपटातील गाणे "खुदाया वे".........
हे गाणे ऐकून, प्रेरीत होऊन लिहीलेली ही कविता.......

प्रतिक्रिया आणि प्रतिसाद अपेक्षित :

असे कसे बांधिलेस हे नशीब रे

नाती जुळवता जुळवता
दोन ह्र्दयांचे मिलन होऊन गेले
राहून गेलं...ते आयुष्य बदलून गेलं
दोन ह्र्दयांची स्पंदने जोडता जोडता....
असे कसे बांधिलेस हे नशीब रे

स्वप्न पाहतो ज्या नजरांनी
तेच तूटते नात्यांच्या बंधनांनी
चालतो त्या रणरणत्या उन्हातून
चटके कणत आयुष्याची मजा येई
तहानलेल्या मनी....तलाव जवळ वाटे
असे कसे बांधिलेस हे नशीब रे

अश्रू आटूनी मन खारट झाले
नात्यांचे बंधही आज कच्चे झाले
सावल्याही नाहीश्या होऊनी..
शरीर हे रिक्त झाले
का पळावे मी मज स्वत:पासून
असे कसे बांधिलेस हे नशीब रे

कुठ आलो मी आजवर
का? कुणास ठाऊक नाही...
शोधूनी एक नवा मार्ग...
बदलीन मज नशीब सारे..
असे कसे बांधिलेस हे नशीब रे

- शशांक नवलकर ४-८-२००९.

मी पण स्वार्थीच का ?

एक स्त्री कुमारी माता बनून आयुष्य जगते
तिचे डोळे तिच्या तिला होणाय्रा बाळाकडे लागून असतात
अनेक स्वप्न पाहिलेली असतात पण नियतीला ते मंजूर नसते आपल्या स्वार्थासाठी तिने त्या अर्भकाला मुकले
आपला स्वार्थ ?
सर्वच माता स्वार्थी असतात का ?
मी म्हणेन "नाही".


नाही दिले कधी वात्सल्याचे देणे
ना कधी मिळाले तुला वात्सल्याचे देणे
अभागी माय मी
वाटत होते मजला
का? मीच अशी चुकले
पोटतिडकीने जपून होती
तू येण्याची स्वप्न....पाहत होती
नाही उमगला मज निसर्गाचा खेळ
होऊनी बसला माझ्याच आयुष्याचा खेळ
आज क्षण क्षण जगतेय
तुझे हरलेले आयुष्य
एकदा मलाही जगायचय
माता बनूनी आयुष्य...
जर हेच असेल माझे स्वार्थ
तर खरच माझे काही चुकले का ?
देईन मी माझी ममता...
माझे वात्सल्य....
त्या तान्हुल्यासाठी...
असेल तेच माझे नवे आयुष्य
आहे हेच आता माझे एक स्वप्न
खरच सर्व माता स्वार्थी असतात का?
मग.....
मी पण स्वार्थीच का ?

- शशांक नवलकर ०२-०७-२००९

मी जाताना....

आजवर मी स्त्रीच्या भावनेतून अनेकदा लिहीले.....
ती स्त्री एक मुलगी...एक प्रेयसी....एक वैश्या.....कुमारी माता झाली आता मी अजुन एक प्रयत्न करीत आहे नववधू होणाय्रा स्त्रीच्या भावना व्यक्त करून...

प्रतिसाद...प्रतिक्रिया अपेक्षित

मी जाताना....

उद्या जाईन सासरी मी
नव्या नात्यांना कवटाळून
जुन्या नात्यांचा ओलावा
बंद मनाच्या कोपय्रात जपून

आई आजची जाते
घे कुशीत निजताना
न जाणे पुन्हा केव्हा
हे क्षण मिळतील जगताना

हातात बोट धरून चालवले
मी लहान असताना.......
तेच हात सोडून जातेय
नवी वाट चालताना......

ताई-ताई म्हणत....
आठवतोस तू रडताना...
राजा....आज मी तूला हाक मारेन....
तुला सोडून जाताना...........

उद्या जाईन मी सासरी
आठवणींना मागे ठेवून
नव्या आयुष्याची सुरूवात करेन
नव्या जगात पाऊल ठेवून.......

- शशांक नवलकर ३०-०७-२००९.

एक धागा सुखाचा...

लवकरच रक्षा बंधन येईल....."रक्षा बंधन"........ एक असा दिवस बहीण आपल्या भावाला राखी बांधते, ते त्यांच्यातील नात्याचे प्रतिक असते. त्यांच्या बंधनाची पडलेली एक गाठ असते. पण मी आज लिहेन ते त्या प्रत्येक भाऊ-बहीणीसाठी नाही...तर त्या भाऊ-बहीणींसाठी जी एकमेकांच्या खूप जवळ असून एकमेकांपासून अलिप्त असतात...... त्यांच्यातले प्रेम हे व्यक्त होऊन सुद्धा नेहमीच अव्यक्त असते. ते नाते.......मी ही जगतोय

त्या खास नात्यासाठी माझी ही कविता............


एक धागा सुखाचा...

गाठी पडल्या प्रेमाच्या
बनवूनी त्या रेशीम गाठी...
बांधूनी गाठ तुला प्रेमाची, गुंफते
नाते अनमोल हे फक्त तुझ्यासाठी
शोधीतो त्या रेशीमगाठी....
त्या गाठींत मिळतो एक धागा..
एक धागा सुखाचा...........

राहूनी अलिप्त सर्व-सर्वांपासून...
आहे मी तुझ्याजवळ..
सोन्या....शोधतोस एक धागा सुखाचा
तूच आहेस तो धागा.....
आपल्या नात्याच्या गाठीतला....
असतोस जवळ माझ्या जेव्हा.....
सापडतो मजला एक धागा सुखाचा.............

प्रीतीच्या प्रत्येक नात्यात तू असावीस...
आयुष्यात नेहमी तू हसत रहावीस
बनवूनी आपले नाते एक गाठ....
मिळविला तो एक अनमोल धागा.....
अतूट बंधनांनी बंधलेली गाठ....
त्यातच सापडतो मजला............एक धागा सुखाचा.............

जगतो आहे आज एक नाते ......
असेच अनेक रेशीमगाठींचे
पण एक गाठ उरते तुझ्यासाठी....
जिथे सर्व गाठी तुटूनी
उरते एकच नाते.........एकच धागा........
धागा......तुझ्या आपुलकीचा....तुझ्या मायेचा.....
एक धागा सुखाचा..................


- शशांक नवलकर १-०८-२००९.

एक प्रयत्न....

एक स्त्री आपले सर्वस्व हरवून बसते......"सर्वस्व", कारण....तिचा प्रियकर. ती त्याला खूप विसरण्याचा प्रयत्न करते पण तिला ते शक्य नाही.....तिच्या ह्या अव्यक्त भावना माझ्या कवितेतून मी व्यक्त करीत आहे

मनाच्या कोपय्रात आठवणींना जपून
तूला विसरण्याचा प्रयत्न करतेय
डोळ्यातील ओघळणारे अश्रू जमवून
तुला विसरण्याचा प्रयत्न करतेय

तुझ्या प्रत्येक स्पर्शाच्या मोबदल्यात...
आयुष्य उणे ठेवून जगण्याचा प्रयत्न करतेय
त्या स्पर्शातून अलिप्त राहूनी
तुला विसरण्याचा प्रयत्न करतेय

तू दिलेल्या प्रत्येक दु:खातून
हसून जगण्याचा प्रयत्न करतेय
प्रत्येक क्षण सुखाचा समजून
तुला विसरण्याचा प्रयत्न करतेय

शब्द सुचत नाहीत तुझ्यासाठी
तरीही कविता लिहीण्याचा प्रयत्न करतेय
आजही तुला विसरू शकले नाही
तरीही तुला विसरण्याचा प्रयत्न करतेय

- शशांक नवलकर २७-०७-२००९.

रिक्त स्वप्न.....

रीती स्पंदने काळजात ठेवूनी
स्वप्न पडते मनास ह्या
स्वप्न रीक्त काळजात
प्रेम रंग बहरण्याचे
स्वप्न तीचे
माझ्यात एक होण्याचे

आठवतात जेव्हा गाण्यातील ते बोल
"है तुझे भी इजाजत...
कर ले तू भी मोहोब्बत......."
पाहतो मी तिला माझ्यासवे
वाटते आता तूच होशील एक
................माझ्यासवे

दूधावरची साय लागे गोड
येई जेव्हा तिची आठवण
ओठावरील स्पर्श ही तितकाच गोड
जेव्हा आठवतो तो क्षण
आहे तिच्या प्रेमाची ही एक ओली आठवण.....

काळजाची स्पंदने वाढत जातात
प्रेमात मी तिच्या वीलीन होता होता
मुसळधार पाऊस सोसाट वारा
अलगदच तिचं मिठीत येणं
श्वास एक होत असतात
नकळतच......

ह्र्दयाची स्पंदने आणिक वाढत जातात
आणि...

आणी....काय!!!
डोक्याजवळ अलार्म वाजत असतो
सकाळचे आठ वाजलेले असतात

अन.......काळीज!!!
ते तर रिक्तच..............

- शशांक नवलकर २६.०७.२००९

ctrl +alt + delete 2

आयुष्य नेहमीच Shift करत राहिलो
ते क्षण delete करत राहीलो
कधी वाटते असावे आयुष्य error फ़्री
होईन असाच मी कायमचा free
पण माझा माझ्यावरच ctrl नाही!!

हे विधात्या हे जग जरा pause कर
मला इथून एकदा release कर
जर असेलच हे जग एक बंदिशाळा
तर मला इथेच freeze कर
कारण... इथे कोणाचाच आपल्यावर ctrl नाही

मग पाहिले मी करून
"ctrl + alt + delete"
आयुष्य मनासारखे alt होत गेले
जे नको होते ते सारे del होत गेले
मग...
माझ आयुष्य मीच ctrl केले..

पण........
"ctrl+alt+delete"
झाली पुन्हा तीच सुरूवात
तीच तीच process
आता वाटते आयुष्याची "process" kill करावी
कोणी नाहीच तर मग कशाला कोणती will असावी

होऊन जाऊ दे!!!......
म्हणतो.. होऊन जाऊ दे
हे आयुष्य "ctrl+alt+delete"
नको त्या process......
नको त्यांना सारखे kill करत बसणे.....
जगू दे कोणाला तरी हे error free जगणे...........

हे देवा मला करशील ना एकदा "delete"
मग सगळेच करतील....
"ctrl + alt + delete"

- शशांक नवलकर २४-०६-०९.

"blood stains"


when i overlooked that place
'thought it was no looking back
still kept on looking
took me to the flashback..
i was stud still and looking..

those were the days of life.....
to begin a new life...........
new friends new relations.......
that was a different life..
but i still remember that end of life
with that moment......

she loved me madly.....
i loved her deeply.....
time passed took us closer....
never ever thought it will be over....
time has passed and took her away.......
i was not there..........now far far away...

when she ended her life...
which destroyed my life...........
her love was flowing thru my vains...
why did she cut her vains........
left me standing with....."blood stains"
sometimes destiny never let us love...
not even live......

she was blushing.....
cute charming
fallen in her love...
till i bled in her love........

i still remember those "blood stains..."

- shasha 10/06/2009

आज ती येणार होती...

गोष्ट एका युवकाची...
college मध्यल्या युवकाची..
नवे आयुष्य नवे स्वप्न
होती ती त्यास जगायची.....
नव्या मैत्रीचा अनुभव.......
नव्या मित्रांची साथ
त्यासाठी सारा नवा अनुभव
झाली entry जेव्हा तिची
झाले सारे तिला पाहून लट्ट
ति त्याच्याकडे पाहून हसली...........
होता हा त्यासाठी एक नवा अनुभव
नजरा-नजरांचा खेळ सारा
तो तिच्या प्रेमात पसार झाला
सारे काही छान होते.......
सुरळीत सारे घडत होते
पण त्या दोघांचा मेळ...
नव्हता त्या विधात्याचा खेळ......
valentines चा दिवस......होत्या त्याचा वाढदिवस...
साजरा करता वाढदिवस
करणार होता प्रेमदिवस......... तिच्यासवे
येणार होती ती..... म्हणाली होती.......
पण घेऊन आली ती फक्त....... आसवे....
होता तो प्रेमदिवस......
त्याचा होता वाढदिवस....
पण तिच्यासवे त्याने जगला तिचा मरण-दिवस
डोळ्यात पाणी थांबले नाही...
रक्त त्याचे आटून गेले....
सारे काही शांत झाले........
शेवटी तो बोलून ऊठला........
"आज ती येणार होती"
"आज ती येणार होती"

- शशांक नवलकर ०७/०६/२००९

पण... ते जगणे राहून गेले

ठरवले..... नाही पहायच तिथे ........
नाही राहीले पहायचे तिथे
ठरवले सारे विसरूनी जगायचे...
काहीच विसरलो नाही पण जगायचे राहून गेले.........
आठवतात त्या आठवणी...
आठवते ती जागा...
आठवते ते college
नवी पहाट..
नव आयुष्य ... सारे काही नव्याने..
ठरवले होते सर्व काही नव्याने
आजही वाटे सारे कालच घडलेले..
आजही बिथरतो आठवूनी ते सारे घडलेले....
आठवणींच्या गर्दीत सारे असे का बिघडले...
नाही कधी हे कोडे माझ्या मनी उलगडले............
त्या काही दिवसाच्या प्रेमात.....
विसरून गेलो होतो मी मज स्वत:ला...
हो......होते ते काही दिवसांचे प्रेम...
तिच्यावर केलेल खर-खुर प्रेम...
का? मला ती काही दिवसात सोडून गेली........
पुन्हा उभा राहीलेलो मी......मला मोडून गेली
हे जीवन दिधले त्या विधात्याने......
मग का ती माझा जीव घेऊन निघून गेली
लाल रक्तांनी लिहेलेले प्रेमपत्र....
हाती माझ्या सोडून गेली
लिहीले होते............
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मनी माझ्या स्वप्न तुझे.........
स्वप्नी फक्त तुच असे...........
नाही जगणे आता तुझ्याविना........
काय करू हे आयुष्य आता तुझ्याविना........
रे सख्या पाहीलास का हा नियतीचा खेळ
त्या विधात्यालाही नको आहे आपला मेळ...
म्हणूनच संपवते आहे हा लपंडावाचा खेळ.......
सोडूनी जाता तुला मझसवे देऊन जाते हे पत्र.
लिहूनी माझ्याच रक्तानी.......
अल्विदा................................................
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ठरवले नाही पहायचे पुन्हा तिथे......
तरीही पहातो मी तिथे........
दिसतेस तू........
हसतेस तू........
दिसेनासी होतेस तू..........
आठवणींत तुझ्या आता सरतो दिवस
ठरवले आयुष्य नव्याने जगायचे
पण ते जगणे राहून गेले

शशांक नवलकर १२/०६/२००९ पण... ते जगणे राहून गेले

एक क्षण... काही आठवणी...

आठवते आज ते college
आठवतात ते दिवस
ते दिवस नव्या स्वप्नांचे
नव्या मैत्रीचा नव्या मित्रांचा नवा अनुभव...
सुंदर मुली...dashing दिसणे...
college कट्टा.....गरमागरम चहा पिणे...
ह्याच आठवणी घेऊन जातात मला पुन्हा तिथे.......
त्याच जागेवर.....
..
...
दिवस होते ते पावसाळ्यातले........
भिजत भिजत कोलेज ला जाणे...
कट्ट्यावर बसून चहा पिणे......
अन अकस्मात "तिचे" दिसणे.......
मग.......
रोज तिथे तिची वाट बघणे...
तिचे ते सुंदर दिसणे...
तिचे ते गोड बोलणे....
अश्या तिच्या गोड आठवणी....
..
...
बघता बघता तिच्या प्रेमात पडलो....
"ती" हळूच हसली...
वाटायचे.......
जणू तिला मिठीत घेऊन
ओल्या पावसात चिंब व्हावे....
पावसाच्या त्या ओल्या आठवणी आल्या..
आठवला तो क्षण...
तिच्या ओल्या ओठांना स्पर्शताना...........
अश्या तिच्या ओल्या आठवणी....
..
...
बघता बघता...
असेच दिवस उलटले..
आम्हा दोघांचे नाते बहरत गेले....
एकमेकांची मने जुळली अन अनेक नवी स्वप्ने रंगून गेली....
पण,
ती स्वप्ने रंगीत होता होता कोरीच राहून गेली....
..
...
काही दिवस ती college ला आलीच नाही
तिची पावसात मी रोज वाट पाहीली...
पण ती आलीच नाही..
काही दिवस उलटले...
अजुनही मी तिची पावसात भिजता... वाट पाहत होतो
तेव्हा ती आली होती...
पाऊस तिच्या गालावरील अश्रू बनून ओथंबला..
जणू अलगद काळजाचा ठोका चुकला........
हातात लग्न पत्रिका देऊन.......
निघून गेली....................
ते रंगीत स्वप्न पुर्ण होता होता राहून गेले
..
...
तो क्षण...
आजही आठवतो....
साय्रा आठवणी पुन्हा साठवतो....
अनेक वर्षे उलटून गेली....
मनी तो क्षण सारखा सतावतो....
येतो जेव्हा मी त्या जागेवर .......
त्या आठवणी तो क्षण..
जिवंत होतात त्याच जागेवर
.......

- शशांक नवलकर ७-०६-२००९

Friday, June 5, 2009

हवी तुझी साथ मला

कल्पी ताईच्या "मराठी कविता" वरील थ्रेड वर सुचलेली माझी कविता..

हवी तुझी साथ मला

हे जीते आयुष्य तुझ्यामुळे
जगतो आहे हे स्वप्न तेही तुझ्यामुळेच
मागणे आहे आज तुझ्याकडे...फक्त एकदाच
"हवी तुझी साथ मला........."

निर्मिलेस हे विश्व.... निर्मिलास हा संसार
निर्मिलास अंध:कार निर्मिलास प्रकाश...
आज अंध:कारातूनी प्रकाशाकडे वाट दिसते
त्याच वाटेतून चालता चालता...
"हवी तुझी साथ मला........."

घेतली उंच भरारी नवपंखांनी...
गाठायचे आहे एक नवे आकाश..........
बदलून टाकायचे आहे आयुष्य नवस्वप्नांनी
गाठतो आहे तेच नवे आकाश..
"हवी तुझी साथ मला........"

नाही खंत उरली आता कसलीच
नाही भीती आहे आता कसलीच
डोळे मिटताही तूच आहेस....
अंत:करणातही तूच आहेस...

म्हणूनच मागणे आहे आज तुझ्याकडे
फक्त एकदाच........
"हवी तुझी साथ मला........"

- शशांक नवलकर ५/०६/२००९

एक स्वप्न नवे....

कित्येकदा असा हताश उरलो मी..
हर एक वेळी प्रेमात का अपुरा पडलो मी ?..
खरच मी इतके प्रेम केले होते का ?
की ते प्रेमही जगण्यास नालायक ठरलो मी ?

नको आहे आता हे सर्व काही..
प्रेमाची ही गरज इथे उरली नाही..
जगीन आयुष्य हे असेच अपूरे........
करायचे राहून गेले ते स्वप्न अधुरे

आज आहे पुन्हा एक नवी पहाट...
चालण्यासाठी नवीन वळणावळणांची वाट
चालतो मी मार्गस्थ नव्या उषेचा
ध्यास बाळगूनी मनी नव्या स्वप्नांचा

पूसून टाकीन त्या सर्व आठवणी..
विझवूनी तो जळफळता आत्मा.....
आस एकच आता उरून राहील......
"कोणी मजसाठी या जगात शिल्लक राहील....?"

बर झाले मुक्त झालो.....
आयुष्य नव्यानं जगण्यास युक्त झालो......
कधीतरी होतील ती स्वप्न साकार..
आता ठरवलय...जीत्या आयुष्यास देईन नवीन आकार.......

हो करीनच मी माझे हे नवे स्वप्न साकार....
पुसूनी त्या सर्व आठवणी
जगाव एक नव आयुष्य........
एकच हा उरला असा हा निर्धार...............


- शशांक नवलकर ०३/०६/२००९

step mother....

so gorgeous so glamerous
she is a woman so precious
she lived life untold
her desires never been told

been loved been hated
till the moment every woman waited
nobody expcted.. a miracle happened
destiny's magic........two mothers faced

blessings of god..connects them........
a relation so different saparated them...
one mother cheerish..celibrated..
one mother....pained cried..and.......died..

nobody looked over that child....
whose mother passed..left him behind
god blessed one mother......
blessing of a child.......blessing of a relation

a woman so precious.....
a woman so gorgeous.........
a woman.. a mother......
a woman....... a step mother

he created relation
he created woman...........
woman became mother......
did god also created "step mother"

- शशांक नवलकर २७-०५-२००९

असेच असते का हे "वात्सल्याचे देणे".............

नवी वधू सुंदर नटलेली
मितभाषी ती होती अबोली..
ना कोणांस उमगला तो अबोला..
अवकाश उलटतता एक कळी उमलली....

गर्भवती माय ती हळूच हसली
तान्ह्यास जन्मता कळवळून ऊठली..
घडविलास निसर्गा तू खेळ असला...
अकस्मात घडला दोन मातांचा संबंध कसला
वेळी एकच जन्म दोन अर्भकांचा झाला

निसर्गही खेळी तो खेळ कसला...
पाहूनी हा खेळ आज तोही निशब्द झाला...
दोन्ही मातांना तान्हूल्याचा जन्म झाला
पण,....
जन्म देता एका मातेची सजली सुंदर कहाणी
जन्म देता संपली होती दुसय्रा मातेची जीवन कहाणी...

पोटी खेळल रूपवती मातेचे फुल...
कुस्करले जात होते गळून पडलेले फूल
अबोल ती आज बोलून उठली...
म्हणली....
नाही दिले कोणी यांस मातृत्वाचे देणे.......
देईन मी ह्या अर्भकास मज वात्सल्याचे देणे....

न जाणता त्या अर्भकाची जननी...
झाली ती यशोदा देवकीरूपी जननी..
विचारले तिने आज देवाला...
ममताही कमी पडे ते कसले देणे...
असेच असते का हे "वात्सल्याचे देणे"

Thursday, May 14, 2009

these are d best days of my life .....

times whn i got very my first dream...
of somethin i cud ever dream...
times whn i lived my very first dream
ohh...that was th very big thing
that was the best day of my life ...

whn i lost my very first love
i really felt like i will never ever love
but whn i got the one i love
ohh.... i was happi like nevre been yeah.....
that was th best day of my life

times whn i lost someone of my own
someone i never wish to lose
times whn i ever remembr him........
ohh....... hes always b wit me ......
that day is best day of my life

these times lived every moment with me
i live these moments every day
and whn these times will come with every moment
ohh....... i will live every moment of my life
cos these are d best days of my life

- Shasha™. 10-06-2009

शोधू कुठे तूला मी........(again)


नेहमीसारखेच काहीसे हे दिवस
नेहमीचेच जगणे अन तेच एकटे श्वास
वाटे कधी हे जगणे नसावे नेहमीसारखे
असावी तुझी साथ...एक व्हावेत आपले श्वास

तुझ्या विचारांत हरववूनी
भर गर्दित सुद्धा एकला मी
हरवतो वाटेत सावल्यांच्या खेळात फसतो मी
सांग ना सखे शोधू कुठे तूला मी

स्तब्ध नजरांनी पाहतो बागेतील पाखरे
नसे ती पाखरे एकटी असे निसर्ग सोबती
असतीस तू मज नशीबात जर
निसर्गाच्या छायेखाली असती तीच आपले सोबती

हळूच हसतेस काळजात ठसतेस
विसावते माझे मन तुझ्या आठवणींत
आठवणींतच त्या जगून गेलो मी
ह्या जीवा लागे फक्त तुझीच तमा....
सांग ना सखे.. शोधू कुठे तूला मी

माझ प्रेम व्यक्त होणे राहून गेले
मज प्रेमाचे बोलही अबोल होऊन गेले
काळ वेळ आणि तुला मी आज हरलो
एकांत अंधारात आज का असा रूतलो

सावल्यांतही शोधतो तुला मी
जरा मागे वळून बघ....
कसा मिठीत घेतो तुला मी
काळीजही माझे बोले आज.........
सांग ना सखे.... शोधु कुठे तुला मी......

- शशांक नवलकर ६.०५.२००९

कारण.....


"एक ओली आठवण" खरच चिंब करणारी होती... पण तिला चिंब करणारा तो निघून गेला होता तिचीच वाट पाहून पण तिच उत्तर खरच कोणीच ऐकले नाही....

कारण.....

वाट तुझी पाहत पावसात उभी होते
मग गालावरून ओघळणारे पाणी
पावसाचे का समजलास...???
मी दिलेल्या आठवणी विसरलास???
आठवता तू दिलेले ते क्षण..
चिंब होतेय मी त्याच ओल्या आठवणींनी...
आठवता तुझा हळूवार स्पर्श...
चिंब होतेय मी त्याच ओल्या स्पर्शाने.....
कारण..... तू नव्हतास..
आठवणी जगूनच जगेन तुझ्या...
प्रीतीच्या प्रणय-स्पर्शाच्या...
होतील त्याही चिंब....माझ्याच अश्रूंनी
ती वाटही असेल आता एकलीच...
माझ्यासारखी.....
कारण....तू नसशील.....
येत राहीन मी त्याच वाटेनं
तुला रोज भेटण्यासाठी
त्याच झाडाखाली उभी राहून
चिंब होत राहीन....
तुला रोज आठवताना...
नसेन मी तेव्हा एकटी.....
असेन फक्त तुझीच........
तुझी एक ओली आठवण..
आयुष्यभर जगेन...
कारण....तू आता माझ्यात असशील.....

- शशांक नवलकर ०२-०५-२००९.

Friday, April 24, 2009

please forgive me


please forgive me

मागितले तुला बाप्पा कडे.......
दिले पाठवून तूला माझ्याकडे.........
मागितली नव्हती प्रेयसी....
हवी होती मैत्री निर्मळ अशी.
मिळाली होती एक गोंडस सखी...
केलं मी आज तिला खूप दु:खी......

please forgive me....दुखवण्यासाठी.............

हसवता येई फक्त हसणाय्रालाच....
हसवता येई मनी रमणाय्रालाच....
नाही दिसे ओठावरी हसू आज तुझ्या....
व्यंग हे असे का उरले ओठी तुझ्या
ए सखे..... हसशील का........
पुन्हा परत पूर्वीसारखी असशील का...

please forgive me.... दुखवण्यासाठी..............

मन सांगे मजला माफी मागावी एकदा......
करशील ना ग मला माफ तू एकदा.....
मैत्री हे नांत आहे अजब........
मैत्री रूसली की वाटे सारे गजब.....
होईल ना ग सर्व पुन्हा एकदा छान......
राहील ना ग आपली मैत्री अशीच छान............

please forgive me.......दुखवण्यासाठी.........

- shasha......

Monday, April 20, 2009

दोन ह्र्दयांची स्पंदने ...





दोन ह्र्दयांची दोन स्पंदने
जेव्हा नकळतच एक होतात
चांदण्याही नभातल्या मग
चांदणे सजवू लागतात
जवळ येताच तू साजणा...
ही स्पंदनेही आता बोलू लागतात

श्वास गुंततो श्वासात इतका..
अलगद चुकतो ह्र्दयाचा ठोका...
नजरेत तुझ्या पाहता स्वत:ला
हरवते मी माझेच स्वत:ला....

विसरून जाते देहभान मी...
तुज विचारांत विलीन होताना....
क्षण एक एक ओला होतो
तुझ्याच विचारांनी चिंब करीतो...
तॄष्ण तॄष्ण ह्या वसुंधरेला...
तुझ्याच प्रणयाने तॄप्त करीतो

आठवतो स्पर्श तो पुन्हा पुन्हा..
जातो मजला घेऊन स्वप्नांच्या दुनिया
उघडता डोळे कवेत तुझिया
मग लाजही लाजे आज स्वताला

- भारती सरमळकर आणि शशांक नवलकर

Tuesday, April 14, 2009

" एक ओली आठवण "



संध्याकाळची संथ वेळ
रीते करीत होतो कप्पे मज मनातील......
तुझ्याच आठवणींचे...
रिम झिम पडणारा तो पाऊस
अन डोळे तुच येणाय्रा वाटेकडे लागलेले...
त्याच गुलमोहराच्या झाडाजवळ बसून...
तू येणाय्रा वाटेकडे पाहत होतो...
कारण....तू येणार होतीस ना.......
तेव्हा.....आठवला तो पाऊस
तूला मिठीत घेताना
ओल्या ओठांनी तुला स्पर्शताना
आठवले ते दिवस...
भर पावसात तुझी वाट पाहताना...
तू माझ्या कवेत येऊन
छातीवर डोक टेकून रडताना....
दिसले होते तुझे ओथंबते अश्रू...
तेव्हा...बोलून गेले तुझे डोळे सर्व काही...
आजही तसाच उभा राहीलो
त्याच रिमझिमत्या पावसात …भिजताना
त्याच पाणावलेल्या नजरांनी ..
तुझी वाट पाहत राहीलो
वेळ...केव्हाच निघून गेली होती
तरीही तू आली नाहीस
म्हणूनच,…
आज त्याच जागेवर
मी माझे आयुष्य
माझे श्वास
माझ्या भावनांसवे
सोडून जात आहे …
एक ओली आठवण...
फक्त तुझ्याचसाठी….
कारण...तू येणार होतीस ना........

- शशांक नवलकर १३/४/२००९.

Saturday, April 11, 2009

अधुरी एक कहाणी...



प्रेमरंग उधळूनी..
रंगात हरवून गेले....
तुझं प्रेम मिळवता...
स्वत:ला हरवून गेले...

स्वप्न पाहीले..
राजकन्येचे...
स्वप्न पाहीले..
तुझ्या-माझ्या मिलनाचे..
का? ते राहून गेले...
सर्वच काही विस्कटलेले...
तसेच काहीसे राहून गेले...

आज मी तुझी न होता..
परकी होत असताना...
दुसय्राची होऊनही...
हुरहुर लागते मज मनाला..
का? तू मिळाला नाहीस..
का? माझे स्वप्न मिळालं नाही...
का? राहीली तुझी माझी....
अशी अधुरी एक कहाणी...

- शशांक नवलकर ११/४/२००९.

Thursday, April 2, 2009

ए सखे माफ करशील ना....




गोडी गुलाबी
तुझी माझी..
प्रिय-प्रेयसी नाही...
अटूट मैत्री अशी
तुझी माझी..
अटूट नातं
माझ अन तुझ...

रागवतेस रूसतेस...
हसतेस लाजतेस...
रडतेस...हसवतेस.....
कीती असे हे मुखवटे
का असे मुखवटे..
मैत्री अशी तुझी माझी
मग हसना सखे....माझ्यासाठी..

भावना तुझ्या..
निशब्द...तू...
आठवणींत त्या
जगून जातेस कधीतरी
नकळतच कधीतरी
मन तुझ दु:खावते..
त्रासतो हा अबोला...
तुझ्या मनीचा मजला...

बोल ना ग ...
ए सखे माफ करशील ना....

- SHASHA™

Sunday, March 29, 2009

तू माझ्यात असताना.................


तुझे माझ्यात असणे
माझे तुझ्यात असणे
कधी न सोडवे हा लळा
स्पर्श असे तो वेगळा...
असाच एक अनुभव...
असाच एक क्षण...
तू माझ्यात असण्याचा...
माझ्या ह्र्दयाच्याच स्पंदनात
तूच असण्याचा....

पुसले होते मी ते क्षण....
तू माझ्यात नसताना...
मिटले होते मी माझे डोळे.....
तू माझ्याजवळ नसताना....
.... मिटलेच होते मी डोळे....
तेव्हा दिसली होतीस,....फक्त तूच....
खरच... मिटले होते मी माझे डोळे....
तेव्हा.....तुलाच बघण्यासाठी....

जगणे उणे श्वासाविना...
माझे मी न होणे तुझ्याविना...
आहे मी अपूरा तुझ्याविना....
आहे ही वाटही अपूरी तुझ्याविना..
चालतो आहे मी तुझ्यासवे...
बनूनी एक स्पर्श...एक आभास........

मी तुझ्यात असताना..
आहे माझी वाटही अपूरी ...
कधी कधी असतो मी एकटा.....
पण नसतो मी कधीच एकटा
.
.
.
तू माझ्यात असताना.................

- SHASHA™....

Thursday, March 19, 2009

satisfaction ("समाधान")



असूनही हात आज माझे रिक्त
न राहीलो मी कधीच अव्यक्त
हास्यमुखी मुखवटे का असोत...
हसून जगण्यातच आहे एक समाधान
प्रेम विरह सु:ख दु:ख सर्व आहे
आज त्यातही मिळते समाधान
कारण, आज मजकडे सर्वस्व आहे
ना कसली खंत ना कसली उणीव
आयुष्य मी जगतो आहे
प्रत्येक क्षण असेच हसत जगतो आहे
कोणीच विचारत नाही माझी दु:ख
न कोणी विचारत माझ्या मनातील भावना
नसते कोणालाच माझी चिंता
पण त्यांची असण्याची जाणीव...
मजला देऊन जाते एक शक्ति
नसते काहीच असाध्य..
सिद्ध होऊनी जगावे आयुष्य
त्यातच मिळते खरे समाधान
हो,...त्यातच मिळते आहे समाधान
जेव्हा रिक्त असूनी मिळेल सर्वस्व
अव्यक्त असूनी होतील भावना व्यक्त
न उरतील कोणतेही मुखवटे
प्रत्येक व्यंग असेल जिते दृष्य
तेव्हाच मिळेल मला खरे समाधान
त्यातच असेल माझे खरे समाधान

- शशांक नवलकर

Monday, March 16, 2009

"u turn"


आयुष्याच्या वळणावर
नेहमीच येतो u turn
प्रेमात पडता न पडता
तिच्या ह्सण्या रूसण्यावर
घ्यावा लागतो हा u turn

life आपली मस्त असते
पोरीशिवाय स्वस्त असते
प्रेमात पडताच व्यस्त असते
"काय यार life अशीच उध्वस्त असते...."

music आणि dance काय धम्माल असते
पार्ट्या पोरी अशीच आपली कम्माल असते
प्रेमात पडून आयुष्याचं music विस्कटून जाते
अन ती मदारी अन त्याचा माकडागत dance होतो

प्रेमभंग होऊनी टूटतात बंध
फुलेही सोडतात तो प्रेमाचा गंध
का प्रेमानेच नाती बंधतात व टूटतात
अन का पुन्हा ती प्रेमानच जुळतात
आयुष्याच्या वळणावर नेहमीच u turn असतो
म्हणूनच प्रेमातही असाही एक u turn असतो......

- शशांक नवलकर

Wednesday, March 11, 2009

empty



हे जग हसते मला....
वेडं म्हणते मला..
का पडतो मी प्रेमात
का असे कोणाची तमा,चाहूल,चिंता..
जगतो आहे मी माझ्या मनी...
तरीही का लागते हुरहुर मनाला
दिशाभूल होता सावरतो मनाला...
मग क्षणो-क्षणी कोणाची कमी कशाला...
सुखात असतो मी माझ्यापरी
अवलंबून नाही मी कोणापरी
मग दु:ख नसूनी व्यक्त आहे कशाला
जगणे मुठीत घेऊनी फिरतो आहे
का कोणास ठाऊक हे प्रश्न कशाला
शोधितो आहे अजुनी यांचे उत्तर
जर उत्तरच नाही मग प्रश्न कशाला...
जगणे जर असेल असेच रिक्त
तर मग ह्या प्रश्न-उत्तराचा खेळ कशाला..
असे प्रत्येक प्रश्नाचे एक उत्तर
मिळे ज्याला कळले असावे जगणे त्याला
असावं त्याचेही आयुष्य एकदा असेच रिक्त................

- शशांक नवलकर