Sunday, August 16, 2009

एक धागा सुखाचा...

लवकरच रक्षा बंधन येईल....."रक्षा बंधन"........ एक असा दिवस बहीण आपल्या भावाला राखी बांधते, ते त्यांच्यातील नात्याचे प्रतिक असते. त्यांच्या बंधनाची पडलेली एक गाठ असते. पण मी आज लिहेन ते त्या प्रत्येक भाऊ-बहीणीसाठी नाही...तर त्या भाऊ-बहीणींसाठी जी एकमेकांच्या खूप जवळ असून एकमेकांपासून अलिप्त असतात...... त्यांच्यातले प्रेम हे व्यक्त होऊन सुद्धा नेहमीच अव्यक्त असते. ते नाते.......मी ही जगतोय

त्या खास नात्यासाठी माझी ही कविता............


एक धागा सुखाचा...

गाठी पडल्या प्रेमाच्या
बनवूनी त्या रेशीम गाठी...
बांधूनी गाठ तुला प्रेमाची, गुंफते
नाते अनमोल हे फक्त तुझ्यासाठी
शोधीतो त्या रेशीमगाठी....
त्या गाठींत मिळतो एक धागा..
एक धागा सुखाचा...........

राहूनी अलिप्त सर्व-सर्वांपासून...
आहे मी तुझ्याजवळ..
सोन्या....शोधतोस एक धागा सुखाचा
तूच आहेस तो धागा.....
आपल्या नात्याच्या गाठीतला....
असतोस जवळ माझ्या जेव्हा.....
सापडतो मजला एक धागा सुखाचा.............

प्रीतीच्या प्रत्येक नात्यात तू असावीस...
आयुष्यात नेहमी तू हसत रहावीस
बनवूनी आपले नाते एक गाठ....
मिळविला तो एक अनमोल धागा.....
अतूट बंधनांनी बंधलेली गाठ....
त्यातच सापडतो मजला............एक धागा सुखाचा.............

जगतो आहे आज एक नाते ......
असेच अनेक रेशीमगाठींचे
पण एक गाठ उरते तुझ्यासाठी....
जिथे सर्व गाठी तुटूनी
उरते एकच नाते.........एकच धागा........
धागा......तुझ्या आपुलकीचा....तुझ्या मायेचा.....
एक धागा सुखाचा..................


- शशांक नवलकर १-०८-२००९.

No comments: