एकांती तारकांत शोधते तुला
हरवून जाते मी तुझ्या आठवणीत
आसुसलेल्या नजरांनी आज सांगते तुला
येशील का रे तू.. माझ्या जीवनात..........
शब्द होऊनी बेफाम पाऊस धारा
तुझ्या आठवणींत बेधुंद कोसळतात
कसा आवरू हा पसारा आठवणींचा
आठवणींच्याच गारा काळजावर बरसतात
नकोत मजला हे अश्रूही आता
अश्रूंच्या पावसात मी कण कण ओघळले
प्रत्येक वेळी त्या पावसात तूच होतास
हे वेडया तुला कधी का ना कळले?
तूच म्हणतोस..घेईन मी मिठीत तुला
मी म्हणते...माझे आयुष्य दिधले मी तुला
येऊनी मिठीत तुझ्या गुरफटलेल्या कवेत
सुखाच मरण जगायचय मला एकदा.....
रूसला आज पाऊसही माझ्यावरती
म्हणूनी...एकदा मजसारखी तू ही बरस
इतकी बरस
इतकी बरस
इतकी बरस
की कर त्याला ही चिंब तुझ्या तुषारांनी
मग तो ही म्हणेल
हे पावसा तू माझ्यासाठी असाच बरस.......
बरसशील का रे अश्याच पावसारखा..
तू माझ्यासाठी............
होशील का रे तो पाऊस..
तू माझ्यासाठी.........
होशील का रे तो पाऊस तू माझ्यासाठी
- शशांक नवलकर १४-०८-२००९
No comments:
Post a Comment