
खूप शब्द आले-गेले माझ्या मनातून
विरह दु:ख यातना अंधार यांनी विरक्त केले
त्या कोरड्या शब्दांनी मन व्याकूळ अन पोकळ केले
पण आज मला लिहायचे आहेत शेवटचे शब्द...
शेवटचे शब्द त्या दु:खांसाठी.. शेवटचे शब्द त्या निर्जीव भावनांसाठी
खूप कागद खरडले त्या शब्दांनी आज
मन माझे खरडले त्या भावनांनी आज
आता करायची आहे त्या शब्दांची खरडपट्टी
नाही गरज आज त्या भावनांची त्या एकट्या शब्दांची
म्हणूनच शेवटचे शब्द त्या एकटेपणासाठी.. शेवटचे शब्द त्या एकट्या शब्दांसाठी
आज कंटाळ आला त्या अंधाराचा जगतो आहे प्रकाशात मी
विसरायचे आहे मला त्या अंधाराला ओढ आहे त्या प्रकाशाची
नको आज मला कोणाकडून कसलीही उत्तरं कशाचीही कारणं
सापडत आहेत आज मला त्या प्रश्नांची उत्तरं अपो-आप
शेवटचे शब्द त्या काळोखात... विझणाय्रा अंधारासाठी...उजळणाय्रा प्रकाशासाठी
खूप वाट पाहत होतो मी तीची.... विचार करता करता मागे पडलो मी
नाही पहायची यापुढे वाट जगावे आयुष्य सुखानी मौज मस्तीनं
नाही करावी कसली खंत नाही हवे आहेत ते अश्रू ती दु:ख
लिहावे आज खूप काही नाविन्यावर उजळत्या प्रकाशावर उल्हासित भावनांवर
लिहितो आहे मी शेवटचे शब्द त्या पोकळ शब्दांसाठी त्या रिकाम्या भावनांसाठी
पुन्हा न व्हावे माझे मन विरक्त त्या शब्दांसाठी विसरतो मी आज हे शेवटचे शब्द
No comments:
Post a Comment