Sunday, August 30, 2009

तडजोडींचा रंगमंच



पडदा पडण्यापूर्वी नेहमीच
चेह-यावरचा मुखवटा गळून गेला
सु:ख येण्याआधीच ओंजळीत
तडजोडीच रस्ता शोधून गेल्या

घडवीत होतो एक नवा चेहरा
त्या प्रत्येक मुखवट्यावरती
तो प्रत्येक मुखवटा नेहमीच
अनेक व्यंगांतून गळत होता

आयुष्याचा हा रंगमंच
नकळतच खंगत गेला
उरल्या सुरल्या धाग्यांनी
तो कठपुतळीचा खेळ रंगत गेला

ओंजळीत नेहमीच अश्रू आले
सु:खासाठी नेहमीच मन आतुरले
तरीही सारीपाटावरचा खेळ चालतच गेला
तो चालतच गेला ... चालतच गेला

पडदा पडण्य़ापूर्वी नेहमीच
चेह-यावरचा मुखवटा गळून गेला
सुख येण्यापूर्वी ओंजळीत
तडजोडीच रस्ता शोधून गेल्या
तडजोडीछ रस्ता शोधून गेल्या

- शशांक नवलकर २९-०८-२००९

Sunday, August 16, 2009

... ...

एकांती तारकांत शोधते तुला
हरवून जाते मी तुझ्या आठवणीत
आसुसलेल्या नजरांनी आज सांगते तुला
येशील का रे तू.. माझ्या जीवनात..........

शब्द होऊनी बेफाम पाऊस धारा
तुझ्या आठवणींत बेधुंद कोसळतात
कसा आवरू हा पसारा आठवणींचा
आठवणींच्याच गारा काळजावर बरसतात

नकोत मजला हे अश्रूही आता
अश्रूंच्या पावसात मी कण कण ओघळले
प्रत्येक वेळी त्या पावसात तूच होतास
हे वेडया तुला कधी का ना कळले?

तूच म्हणतोस..घेईन मी मिठीत तुला
मी म्हणते...माझे आयुष्य दिधले मी तुला
येऊनी मिठीत तुझ्या गुरफटलेल्या कवेत
सुखाच मरण जगायचय मला एकदा.....

रूसला आज पाऊसही माझ्यावरती
म्हणूनी...एकदा मजसारखी तू ही बरस
इतकी बरस
इतकी बरस
इतकी बरस
की कर त्याला ही चिंब तुझ्या तुषारांनी
मग तो ही म्हणेल
हे पावसा तू माझ्यासाठी असाच बरस.......

बरसशील का रे अश्याच पावसारखा..
तू माझ्यासाठी............
होशील का रे तो पाऊस..
तू माझ्यासाठी.........
होशील का रे तो पाऊस तू माझ्यासाठी

- शशांक नवलकर १४-०८-२००९

तुज एकांती स्मरताना.....

तुज एकांती स्मरताना
मन घायाळ होऊन जाते
लाल गुलाबी पहाट जगताना
दु:खांती रात्र होऊन जाते

रे सख्या....आज तू नाहीस
अंत:करणी अनेक दु:खं वेचते आहे
अंधुक पाणावलेल्या नजरांनी
त्या प्रत्येक आठवणींत तुला शोधते आहे

बर झाले.....आज तू नाहीस
त्या सुंदर आठवणींना जपूनी
घटका घटका आयुष्य जगते आहे
त्या आठवणींही आज नकोश्या होतात
पण तुला आठवूनी श्वास जगते आहे

तुज एकांती स्मरताना
मन कावरं बावरं होते
नाही...आता नको हे आयुष्य
सा-यातुनही अलिप्त राहावेसे होते
नको आहे ते कैवल्य नको आहे ते प्रेम

काही क्षणही पुरेसे होतात
तुज एकांती स्मरताना
तुज एकांती स्मरताना...........

- शशांक नवलकर ५-८-२००९

असे कसे बांधिलेस हे नशीब रे

हल्लीच आलेल्या ’लक’ या चित्रपटातील गाणे "खुदाया वे".........
हे गाणे ऐकून, प्रेरीत होऊन लिहीलेली ही कविता.......

प्रतिक्रिया आणि प्रतिसाद अपेक्षित :

असे कसे बांधिलेस हे नशीब रे

नाती जुळवता जुळवता
दोन ह्र्दयांचे मिलन होऊन गेले
राहून गेलं...ते आयुष्य बदलून गेलं
दोन ह्र्दयांची स्पंदने जोडता जोडता....
असे कसे बांधिलेस हे नशीब रे

स्वप्न पाहतो ज्या नजरांनी
तेच तूटते नात्यांच्या बंधनांनी
चालतो त्या रणरणत्या उन्हातून
चटके कणत आयुष्याची मजा येई
तहानलेल्या मनी....तलाव जवळ वाटे
असे कसे बांधिलेस हे नशीब रे

अश्रू आटूनी मन खारट झाले
नात्यांचे बंधही आज कच्चे झाले
सावल्याही नाहीश्या होऊनी..
शरीर हे रिक्त झाले
का पळावे मी मज स्वत:पासून
असे कसे बांधिलेस हे नशीब रे

कुठ आलो मी आजवर
का? कुणास ठाऊक नाही...
शोधूनी एक नवा मार्ग...
बदलीन मज नशीब सारे..
असे कसे बांधिलेस हे नशीब रे

- शशांक नवलकर ४-८-२००९.

मी पण स्वार्थीच का ?

एक स्त्री कुमारी माता बनून आयुष्य जगते
तिचे डोळे तिच्या तिला होणाय्रा बाळाकडे लागून असतात
अनेक स्वप्न पाहिलेली असतात पण नियतीला ते मंजूर नसते आपल्या स्वार्थासाठी तिने त्या अर्भकाला मुकले
आपला स्वार्थ ?
सर्वच माता स्वार्थी असतात का ?
मी म्हणेन "नाही".


नाही दिले कधी वात्सल्याचे देणे
ना कधी मिळाले तुला वात्सल्याचे देणे
अभागी माय मी
वाटत होते मजला
का? मीच अशी चुकले
पोटतिडकीने जपून होती
तू येण्याची स्वप्न....पाहत होती
नाही उमगला मज निसर्गाचा खेळ
होऊनी बसला माझ्याच आयुष्याचा खेळ
आज क्षण क्षण जगतेय
तुझे हरलेले आयुष्य
एकदा मलाही जगायचय
माता बनूनी आयुष्य...
जर हेच असेल माझे स्वार्थ
तर खरच माझे काही चुकले का ?
देईन मी माझी ममता...
माझे वात्सल्य....
त्या तान्हुल्यासाठी...
असेल तेच माझे नवे आयुष्य
आहे हेच आता माझे एक स्वप्न
खरच सर्व माता स्वार्थी असतात का?
मग.....
मी पण स्वार्थीच का ?

- शशांक नवलकर ०२-०७-२००९

मी जाताना....

आजवर मी स्त्रीच्या भावनेतून अनेकदा लिहीले.....
ती स्त्री एक मुलगी...एक प्रेयसी....एक वैश्या.....कुमारी माता झाली आता मी अजुन एक प्रयत्न करीत आहे नववधू होणाय्रा स्त्रीच्या भावना व्यक्त करून...

प्रतिसाद...प्रतिक्रिया अपेक्षित

मी जाताना....

उद्या जाईन सासरी मी
नव्या नात्यांना कवटाळून
जुन्या नात्यांचा ओलावा
बंद मनाच्या कोपय्रात जपून

आई आजची जाते
घे कुशीत निजताना
न जाणे पुन्हा केव्हा
हे क्षण मिळतील जगताना

हातात बोट धरून चालवले
मी लहान असताना.......
तेच हात सोडून जातेय
नवी वाट चालताना......

ताई-ताई म्हणत....
आठवतोस तू रडताना...
राजा....आज मी तूला हाक मारेन....
तुला सोडून जाताना...........

उद्या जाईन मी सासरी
आठवणींना मागे ठेवून
नव्या आयुष्याची सुरूवात करेन
नव्या जगात पाऊल ठेवून.......

- शशांक नवलकर ३०-०७-२००९.

एक धागा सुखाचा...

लवकरच रक्षा बंधन येईल....."रक्षा बंधन"........ एक असा दिवस बहीण आपल्या भावाला राखी बांधते, ते त्यांच्यातील नात्याचे प्रतिक असते. त्यांच्या बंधनाची पडलेली एक गाठ असते. पण मी आज लिहेन ते त्या प्रत्येक भाऊ-बहीणीसाठी नाही...तर त्या भाऊ-बहीणींसाठी जी एकमेकांच्या खूप जवळ असून एकमेकांपासून अलिप्त असतात...... त्यांच्यातले प्रेम हे व्यक्त होऊन सुद्धा नेहमीच अव्यक्त असते. ते नाते.......मी ही जगतोय

त्या खास नात्यासाठी माझी ही कविता............


एक धागा सुखाचा...

गाठी पडल्या प्रेमाच्या
बनवूनी त्या रेशीम गाठी...
बांधूनी गाठ तुला प्रेमाची, गुंफते
नाते अनमोल हे फक्त तुझ्यासाठी
शोधीतो त्या रेशीमगाठी....
त्या गाठींत मिळतो एक धागा..
एक धागा सुखाचा...........

राहूनी अलिप्त सर्व-सर्वांपासून...
आहे मी तुझ्याजवळ..
सोन्या....शोधतोस एक धागा सुखाचा
तूच आहेस तो धागा.....
आपल्या नात्याच्या गाठीतला....
असतोस जवळ माझ्या जेव्हा.....
सापडतो मजला एक धागा सुखाचा.............

प्रीतीच्या प्रत्येक नात्यात तू असावीस...
आयुष्यात नेहमी तू हसत रहावीस
बनवूनी आपले नाते एक गाठ....
मिळविला तो एक अनमोल धागा.....
अतूट बंधनांनी बंधलेली गाठ....
त्यातच सापडतो मजला............एक धागा सुखाचा.............

जगतो आहे आज एक नाते ......
असेच अनेक रेशीमगाठींचे
पण एक गाठ उरते तुझ्यासाठी....
जिथे सर्व गाठी तुटूनी
उरते एकच नाते.........एकच धागा........
धागा......तुझ्या आपुलकीचा....तुझ्या मायेचा.....
एक धागा सुखाचा..................


- शशांक नवलकर १-०८-२००९.

एक प्रयत्न....

एक स्त्री आपले सर्वस्व हरवून बसते......"सर्वस्व", कारण....तिचा प्रियकर. ती त्याला खूप विसरण्याचा प्रयत्न करते पण तिला ते शक्य नाही.....तिच्या ह्या अव्यक्त भावना माझ्या कवितेतून मी व्यक्त करीत आहे

मनाच्या कोपय्रात आठवणींना जपून
तूला विसरण्याचा प्रयत्न करतेय
डोळ्यातील ओघळणारे अश्रू जमवून
तुला विसरण्याचा प्रयत्न करतेय

तुझ्या प्रत्येक स्पर्शाच्या मोबदल्यात...
आयुष्य उणे ठेवून जगण्याचा प्रयत्न करतेय
त्या स्पर्शातून अलिप्त राहूनी
तुला विसरण्याचा प्रयत्न करतेय

तू दिलेल्या प्रत्येक दु:खातून
हसून जगण्याचा प्रयत्न करतेय
प्रत्येक क्षण सुखाचा समजून
तुला विसरण्याचा प्रयत्न करतेय

शब्द सुचत नाहीत तुझ्यासाठी
तरीही कविता लिहीण्याचा प्रयत्न करतेय
आजही तुला विसरू शकले नाही
तरीही तुला विसरण्याचा प्रयत्न करतेय

- शशांक नवलकर २७-०७-२००९.

रिक्त स्वप्न.....

रीती स्पंदने काळजात ठेवूनी
स्वप्न पडते मनास ह्या
स्वप्न रीक्त काळजात
प्रेम रंग बहरण्याचे
स्वप्न तीचे
माझ्यात एक होण्याचे

आठवतात जेव्हा गाण्यातील ते बोल
"है तुझे भी इजाजत...
कर ले तू भी मोहोब्बत......."
पाहतो मी तिला माझ्यासवे
वाटते आता तूच होशील एक
................माझ्यासवे

दूधावरची साय लागे गोड
येई जेव्हा तिची आठवण
ओठावरील स्पर्श ही तितकाच गोड
जेव्हा आठवतो तो क्षण
आहे तिच्या प्रेमाची ही एक ओली आठवण.....

काळजाची स्पंदने वाढत जातात
प्रेमात मी तिच्या वीलीन होता होता
मुसळधार पाऊस सोसाट वारा
अलगदच तिचं मिठीत येणं
श्वास एक होत असतात
नकळतच......

ह्र्दयाची स्पंदने आणिक वाढत जातात
आणि...

आणी....काय!!!
डोक्याजवळ अलार्म वाजत असतो
सकाळचे आठ वाजलेले असतात

अन.......काळीज!!!
ते तर रिक्तच..............

- शशांक नवलकर २६.०७.२००९

ctrl +alt + delete 2

आयुष्य नेहमीच Shift करत राहिलो
ते क्षण delete करत राहीलो
कधी वाटते असावे आयुष्य error फ़्री
होईन असाच मी कायमचा free
पण माझा माझ्यावरच ctrl नाही!!

हे विधात्या हे जग जरा pause कर
मला इथून एकदा release कर
जर असेलच हे जग एक बंदिशाळा
तर मला इथेच freeze कर
कारण... इथे कोणाचाच आपल्यावर ctrl नाही

मग पाहिले मी करून
"ctrl + alt + delete"
आयुष्य मनासारखे alt होत गेले
जे नको होते ते सारे del होत गेले
मग...
माझ आयुष्य मीच ctrl केले..

पण........
"ctrl+alt+delete"
झाली पुन्हा तीच सुरूवात
तीच तीच process
आता वाटते आयुष्याची "process" kill करावी
कोणी नाहीच तर मग कशाला कोणती will असावी

होऊन जाऊ दे!!!......
म्हणतो.. होऊन जाऊ दे
हे आयुष्य "ctrl+alt+delete"
नको त्या process......
नको त्यांना सारखे kill करत बसणे.....
जगू दे कोणाला तरी हे error free जगणे...........

हे देवा मला करशील ना एकदा "delete"
मग सगळेच करतील....
"ctrl + alt + delete"

- शशांक नवलकर २४-०६-०९.

"blood stains"


when i overlooked that place
'thought it was no looking back
still kept on looking
took me to the flashback..
i was stud still and looking..

those were the days of life.....
to begin a new life...........
new friends new relations.......
that was a different life..
but i still remember that end of life
with that moment......

she loved me madly.....
i loved her deeply.....
time passed took us closer....
never ever thought it will be over....
time has passed and took her away.......
i was not there..........now far far away...

when she ended her life...
which destroyed my life...........
her love was flowing thru my vains...
why did she cut her vains........
left me standing with....."blood stains"
sometimes destiny never let us love...
not even live......

she was blushing.....
cute charming
fallen in her love...
till i bled in her love........

i still remember those "blood stains..."

- shasha 10/06/2009

आज ती येणार होती...

गोष्ट एका युवकाची...
college मध्यल्या युवकाची..
नवे आयुष्य नवे स्वप्न
होती ती त्यास जगायची.....
नव्या मैत्रीचा अनुभव.......
नव्या मित्रांची साथ
त्यासाठी सारा नवा अनुभव
झाली entry जेव्हा तिची
झाले सारे तिला पाहून लट्ट
ति त्याच्याकडे पाहून हसली...........
होता हा त्यासाठी एक नवा अनुभव
नजरा-नजरांचा खेळ सारा
तो तिच्या प्रेमात पसार झाला
सारे काही छान होते.......
सुरळीत सारे घडत होते
पण त्या दोघांचा मेळ...
नव्हता त्या विधात्याचा खेळ......
valentines चा दिवस......होत्या त्याचा वाढदिवस...
साजरा करता वाढदिवस
करणार होता प्रेमदिवस......... तिच्यासवे
येणार होती ती..... म्हणाली होती.......
पण घेऊन आली ती फक्त....... आसवे....
होता तो प्रेमदिवस......
त्याचा होता वाढदिवस....
पण तिच्यासवे त्याने जगला तिचा मरण-दिवस
डोळ्यात पाणी थांबले नाही...
रक्त त्याचे आटून गेले....
सारे काही शांत झाले........
शेवटी तो बोलून ऊठला........
"आज ती येणार होती"
"आज ती येणार होती"

- शशांक नवलकर ०७/०६/२००९

पण... ते जगणे राहून गेले

ठरवले..... नाही पहायच तिथे ........
नाही राहीले पहायचे तिथे
ठरवले सारे विसरूनी जगायचे...
काहीच विसरलो नाही पण जगायचे राहून गेले.........
आठवतात त्या आठवणी...
आठवते ती जागा...
आठवते ते college
नवी पहाट..
नव आयुष्य ... सारे काही नव्याने..
ठरवले होते सर्व काही नव्याने
आजही वाटे सारे कालच घडलेले..
आजही बिथरतो आठवूनी ते सारे घडलेले....
आठवणींच्या गर्दीत सारे असे का बिघडले...
नाही कधी हे कोडे माझ्या मनी उलगडले............
त्या काही दिवसाच्या प्रेमात.....
विसरून गेलो होतो मी मज स्वत:ला...
हो......होते ते काही दिवसांचे प्रेम...
तिच्यावर केलेल खर-खुर प्रेम...
का? मला ती काही दिवसात सोडून गेली........
पुन्हा उभा राहीलेलो मी......मला मोडून गेली
हे जीवन दिधले त्या विधात्याने......
मग का ती माझा जीव घेऊन निघून गेली
लाल रक्तांनी लिहेलेले प्रेमपत्र....
हाती माझ्या सोडून गेली
लिहीले होते............
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मनी माझ्या स्वप्न तुझे.........
स्वप्नी फक्त तुच असे...........
नाही जगणे आता तुझ्याविना........
काय करू हे आयुष्य आता तुझ्याविना........
रे सख्या पाहीलास का हा नियतीचा खेळ
त्या विधात्यालाही नको आहे आपला मेळ...
म्हणूनच संपवते आहे हा लपंडावाचा खेळ.......
सोडूनी जाता तुला मझसवे देऊन जाते हे पत्र.
लिहूनी माझ्याच रक्तानी.......
अल्विदा................................................
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ठरवले नाही पहायचे पुन्हा तिथे......
तरीही पहातो मी तिथे........
दिसतेस तू........
हसतेस तू........
दिसेनासी होतेस तू..........
आठवणींत तुझ्या आता सरतो दिवस
ठरवले आयुष्य नव्याने जगायचे
पण ते जगणे राहून गेले

शशांक नवलकर १२/०६/२००९ पण... ते जगणे राहून गेले

एक क्षण... काही आठवणी...

आठवते आज ते college
आठवतात ते दिवस
ते दिवस नव्या स्वप्नांचे
नव्या मैत्रीचा नव्या मित्रांचा नवा अनुभव...
सुंदर मुली...dashing दिसणे...
college कट्टा.....गरमागरम चहा पिणे...
ह्याच आठवणी घेऊन जातात मला पुन्हा तिथे.......
त्याच जागेवर.....
..
...
दिवस होते ते पावसाळ्यातले........
भिजत भिजत कोलेज ला जाणे...
कट्ट्यावर बसून चहा पिणे......
अन अकस्मात "तिचे" दिसणे.......
मग.......
रोज तिथे तिची वाट बघणे...
तिचे ते सुंदर दिसणे...
तिचे ते गोड बोलणे....
अश्या तिच्या गोड आठवणी....
..
...
बघता बघता तिच्या प्रेमात पडलो....
"ती" हळूच हसली...
वाटायचे.......
जणू तिला मिठीत घेऊन
ओल्या पावसात चिंब व्हावे....
पावसाच्या त्या ओल्या आठवणी आल्या..
आठवला तो क्षण...
तिच्या ओल्या ओठांना स्पर्शताना...........
अश्या तिच्या ओल्या आठवणी....
..
...
बघता बघता...
असेच दिवस उलटले..
आम्हा दोघांचे नाते बहरत गेले....
एकमेकांची मने जुळली अन अनेक नवी स्वप्ने रंगून गेली....
पण,
ती स्वप्ने रंगीत होता होता कोरीच राहून गेली....
..
...
काही दिवस ती college ला आलीच नाही
तिची पावसात मी रोज वाट पाहीली...
पण ती आलीच नाही..
काही दिवस उलटले...
अजुनही मी तिची पावसात भिजता... वाट पाहत होतो
तेव्हा ती आली होती...
पाऊस तिच्या गालावरील अश्रू बनून ओथंबला..
जणू अलगद काळजाचा ठोका चुकला........
हातात लग्न पत्रिका देऊन.......
निघून गेली....................
ते रंगीत स्वप्न पुर्ण होता होता राहून गेले
..
...
तो क्षण...
आजही आठवतो....
साय्रा आठवणी पुन्हा साठवतो....
अनेक वर्षे उलटून गेली....
मनी तो क्षण सारखा सतावतो....
येतो जेव्हा मी त्या जागेवर .......
त्या आठवणी तो क्षण..
जिवंत होतात त्याच जागेवर
.......

- शशांक नवलकर ७-०६-२००९