Sunday, January 31, 2010

क्षितिज (भाग १, भाग २, भाग ३)

क्षितिज - भाग १

आगीतून क्षितिजाकडे जाताना...
मी त्या दोघांना पाहिले........
त्यांच्या शवांवरती अश्रू-फुले वाहीली..........
खरच.....कधी वाटले नव्हते...
थरारून जाईन मी ही इतका.........
त्यांच्याबद्दल लिहीताना.........
आयुष्यावर काय सगळेच लिहितात..
मी पण लिहीलय कित्येकदा...
त्यांच आयुष्य........
लिहीताना.....
माझ्या अंगावरही काटा आला होता
काट्यांतून वाटा काढणारे त्यांच लक्ष्य....
त्यानेच माझे लक्ष वेधले.
त्यांचे लक्ष्य काय होते?
माहीत नाही.......!!
त्या प्रत्येक शब्दात.....
मी त्यांचं आयुष्य जगुन पाहिले........
खरच......
तेव्हा कोठे कळले होते
लक्ष्य नक्की काय असते
================================
क्षितिज - भाग २

लोकं म्हणतात......
तुझ्या कविता वाचल्या की...
अंगावर काटा येतो.........
मग मला सांगा......
त्यांच काय होत असेल......
जे असं आयुष्य प्रत्यक्ष जगतात..........
एकाच कवितेत किती प्रश्न....?मलाही पडलेले.......
त्यांच जग...त्यांची स्वप्नं...त्यांची दु:ख
लिहीताना.....अनुभवताना..........
सगळा प्रश्नोत्तराचा खेळ असतो
जो जिंकेल...
तो एक नवीन प्रश्न असतो..........
मग खेळ पुन्हा सुरू.....
लपंडाव....पकडा-पकडी....चोर-पोलीस
अन व्हू...डेअर्स विन्स...
नशीबाचा.....
(नव्यानेच महतीस आलेला एक खेळ "bang bang")
================================
क्षितिज - भाग ३

ह्या सगळ्यात...........
खूप झिजते........
खरच.....असच असतं का जीवन....
जगण्यासाठी...मरण्यासाठी......मारण्यासाठी...;
जिंकण्यासाठी ?!
असच जिंकायच होतं
त्यांना त्यांच क्षितिज........
पण.....
नियतीचा साला खेळच निराळा..
त्यांना त्याच्या क्षितिजापर्यंत
पोचवता...पोचवता...
त्यांनासुद्धा वर पोचवलं........
जाता जाता खूप घेऊन गेले.........
अन एक गोष्ट देऊन गेले......
जगण्याची एक नवी आशा....
पार करण्यासाठी डोळ्यासमोर ठेवले होते.......
एक नवे क्षितिज..........
त्यांच लक्ष्य......त्यांच क्षितिज
काय होतं माहित आहे का?
नाही ना....?
विचार करा........
नक्कीच सापडेल

- शशांक नवलकर २०-१-२०१०

शेकोटी...

एक ठिणगी
आयुष्य बदलू पाहते...
ऐकले होते....
वणवा पेटला की
सर्वत्र आग पसरते
पाहिले होते....
पण एक शेकोटी........
दोन आयुष्यांना भस्म करून जाते
कधी ऐकलय का ?
ती शेकोटी तशीच होती...
जळत होती मंद ज्वालांसकट....
अन राख वाढली होती आता...
कोणास ठाऊक...
त्या दोघांचा अंत...
किती आग लाऊन गेला............
पण ती आग लागली होती
शेकोटीपासून शेकोटीपर्यंत.........
हो.....पण त्या दोघांच्या भस्माने...
भरपूर ठिकाणी वणवा पेटला...
अनेक बदल घडवून गेला
जणू त्यांचे क्षितिज
अनाहूतपणे एक झाले होते....
अन ते दोघेही
आज त्या क्षितिजापार आहेत.....................
पुन्हा असे कोणी होईल का ?
एक नवे क्षितिज गाठण्यासाठी...........
असेल का तीच शेकोटी.....!!
तो पर्यंत जळत........................?

- शशांक नवलकर १९-१-१०

कारण..............

"तो माझा बाबा होता"
तडफडत होता
पोरासाठी.........
जीव होता ह्या लेकरासाठी...
पोरका झालो ...........
काय चुक होती त्याची???????
काय चुक होती माझी...........
सर्व संपले होते
उरला होतो फक्त मी.............
जागते रहो...... हेच लिहायचे होते ना ?
मग बघा..............
उद्रेक होतो मनाचा तेव्हा कस वाटते
.
.
.
तो मुलगा कोण होता ?
त्याचे नाव काय होते.........
कधी कळलेच नाही...........
for a change म्हणून मी तेथे गेलो...........
.
.
.
त्या भिंतीवर लिहीलेले .........
("जागते रहो" खोडलेले)
.
.
"वापस मत आना"
मी तिथे पाहिले तेव्हा कोणी नव्हते.........
मी तिथून निघून गेलो..........
सकाळी news मध्ये
तेच ठिकाण....
तोच मुलगा....
साखळीने बांधलेला....
किंचाळत होता................
"तो माझा बा होता"
"तो माझा बा होता".......................
.
.
.
कारण..............
त्याने ३० जणांना दगडाने ठेचून मारले होते
त्या ठिकाणी प्रत्येक भिंतीवर
"वापस मत आना" लिहीले होते
चुक कोणाची ?
त्याची.........?
त्याच्या बापाची ?

- शशांक नवलकर १५-१-२०१०

अखेर....

अखेर....
तिने ते बंड जिंकले....
त्या भिंती...अन त्यावरील गिधाडं
सा-यांना मात देऊन
ती निघाली....
धावत होती...पळत होती...
जग धावत होते..थांबले होते..
ती सुद्धा...
तिचे तिलाच कळत नव्हते..
नकळतच कुणा परगावी...
माणूस माणसास अजाण जेथे
असे एक नगर..विस्कटलेले...
प्रहर रात्रीचा..
दॄष्य तेच शेकोटीचे..
अन विस्मरलेल्या आठवणी...
पेटून उठल्या....
अग्नीच्या मंद प्रकाशात...
अजाणतेपणी कोणीतरी स्पर्शले...
निर्विकारपणे...निर्लज्ज....
मागणी.....
शरीराची..व्याभिचाराची....
अनावरला क्रोध तिचा...
जणू क्रोधधारी चंडिका...
शिर छेदिले करवतीने.....
पुन्हा एकदा लाल रंगाच्या गुलालाने...
तन तिचे बरबटले...
मन तिचेही तेव्हा निर्विकार झाले..
आजवर कोणत्याही स्त्रीला तेथे...
कोणी छेडले...नाही
ना कधी कोणीच पुरूष तेथे आढळले...
मी एक दिवस news मध्ये पाहिले....
पोलिसांनी तिला कैदेस नेले..
स्त्रीशोषणास लढा देण्याची
हि शिक्षा..?
असेच असते का न्यायाचे तंत्र....
कधी कोणीच जगू शकत नाही का ?
स्वतंत्र......

- शशांक नवलकर १७-१-२०१०

chemical romance (भाग १,भाग २,भाग ३)

chemical romance भाग १

त्याने दगडाने ठेचले होते...
काय कारण होते.?
तिने गर्दना छाटल्या होत्या
कशासाठी??
त्यांचे नाव गाव काय होते??
ते कोण होते
काय माहित ???
बापाच्या सुडासाठी...
ठेचले ज्याने
तंत्रद्न्य म्हणून गुणगान त्याचे...
विदेशी तरसूनी आला
परतूनी बापासाठी....
त्याणे वाहिला देह बापा वैंकुंठा....असा....
तो महेश.............
पिता-प्रेमासाठी आयुष्य सोडले...
सा-या जगाशी वैर जोडले....
दैवानेही पाठ दाखविली...
तरीही....
त्याचं नशीब काही और होते..
दुष्कॄत्यासाठी कैदेस नेले...
पण तो कधी तेथे गेलाच नाही ????!!!!.......
============================================================
chemical romance भाग २

आयुष्य जगण्या
सुंदर स्वप्ने रंगविली...
आकाशी उंच उडण्यास...
भरारी घेतली....
ती....कोण होती.....
मदनिका..भवानी...सटवी....गावभवानी.....
नाही..यापैकी कोणीच नाही !!
लावण्यवती बुद्धिमान....अशी..
प्रामाणिक विद्यार्थिनी...अन शिक्षिका....
वैशाली..........ती...
इभ्रतीसाठी....झटली...
इवल्या पोरीचा जीव वाचवण्या
स्वत:च हलाल झाली........
पण जीव गेला तो गेलाच........
त्या इवल्या पोरीचा अन त्या अनेक पोरांचा
सुद्न्य असूनही...वेडास शरण जाऊनी.....
जगास वेड लावले....
अन पुन्हा एकदा त्यांचेच लक्ष वेधले.......
ती कैदेस कधी गेलीच नाही !!???

============================================================

chemical romance भाग ३

"प्लीज मला इथून सोडवा.....
मी वेडी नाहिए.........."
"तो माझा बा होता.....
त्याने कोणाचे काय बी केले न्हाय"
ते किंचाळत नव्हते....
एक मेकांस सांगत होते...............
अचानक...
त्यांच्या van जवळ स्फोट झाला....
सारे काही सुन्न्न झाले....
कोणास काहीच ऐकू येत नव्हते......
ते दोघे ही हातात हात धरून पळाले ??!!
का ??
पोलीस त्यांच्या मागावर होते.....
पण ते पळत होते..........पळत होते..................
एका रसायन कारखान्यात गेले...
थंड वारा...चांदणे.....एकमेकांकडे बघताना...........
असे काही नव्हते.....
शीत वातावरणात
दुर्गंध अन कोंडणारे श्वास....
अपर्यायाने त्यांना बाहेर येणे उणे
वाटेत शेकोटी..दिसली...
.
.
.
.
.
दोघांनी एक-मेकांस मिठी मारली....
पोलीसांनी दोघांस एकत्र पाहता गोळी मारली...
अन.................

- शशांक नवलकर १८-१-२०१०

बंड....

थरथरते अंग..
भिजलेले ओले चिंब..
सगळे भुकेल्या नजरेने बघत होते....
हात पाय बांधलेले...
अशी मी एक वेडी...
कोण मी?
मी वेडी नाही.......
तुम्हाला मी भीत नाही.
मागणे आहे मला...
त्या ईश्वराशी..
ज्याने मला बनविले..अन मला...
का ? ह्या नर्कात घालविले........
हटणार नाही मागे मी आता
कोणात असेल दम...
या रोखून दाखवा...
पुकारले आहे मी आता बंड....
.
.
येथे छळणा-याही स्त्रीया..पिळणा-याही
"लेज" म्हणून मिरवणा-या डिवट्या
मला इथून निघायचय..
कोणी माझे ऐकतय का ?
प्लीज मला इथून बाहेर काढा...
कोणी ऐकतय का............?
पुन्हा तेच ऐकू येई
"चुप बैठ ___ साली...."
मी म्हंटले...
"तु कौनसे घी से बनी है"
पुन्हा माझ्यावर हात उगारला गेला...
तोल तेव्हा माझाही सरकला
काय होत होते कळत नव्हते
जणू ह्यालाच कोणीतरी "असायलम" नाव दिलं होते
मीही आघात केला...
त्या सटवीचा खून केला...
बस्स्स्स झाली ती पिळवणूक....
अखेर मी मुक्त झाले...
आयुष्य जगण्यासाठी..
मोकळे श्वास घेण्यासाठी...
पाखरासारखे बागडण्यासाठी.....
मग मागून एकाने विचारले..
"क्या आयटम रेट क्या है तेरा ?"
.
.
ते असायलम होते की कारखाना ??
"बार"कोड असेलल्या बाहुल्यांचे दुकान...
का एक चक्र..
नर्कातून नर्कात अन नर्कातूनच नर्कात ...
कोणी सांगेल का ?

- शशांक नवलकर १४-१-२०१०

"त्यो माझा बा व्हता"

त्या रूमवरची पोर
म्हणे आजकाल उघडी नागडी फिरते
कुठं गेली ती...
कोणी सांगेल का ?
कोणाकडे गेली ती
सांगेल का ?
लोकं म्हणतात
आजकाल ह्या ठिकाणी कोणी फिरकत नाही...
त्या भिंतीवर काय लिव्हलय...
म्हाईत हाय न पोरा...
कोणी ह्या शिवाय काहीच का बोलत नाही???
जेव्हा पाहिले मी तिथे...
पडले होते कुजलेले शव तेथे....
अन भिंतीवर लिहीले होते
"जागते रहो"
का कोणी ह्या शवास उचलले नाही..
का त्याचे कोणी पोस्ट मोर्टम केले नाही...
का ते असेच सडत राहीले...............????
.
.
.
.
"थांबाआआआआआआआआआआआआआअ"
ते प्रेत काहीसे ओळखीचे भासे...
कधीतरी पाहिले काही सापडले असे...
माझा फोटो या प्रेताकडे कसा...
माखल्या रक्तबंबाळ हातांनी
प्रेतास त्या उचलले.....
दूर ठिकाणी त्यांचे
मी अंत्यसंस्कार केले............
काय गरज होती...मला
ते सर्व तरीही केले
कारण...................
.
.
.
.
.
.
.
.
.
"तो माझा बा होता"

- शशांक नवलकर १४-१-२१

अनामिका..

मनी अनेक स्वप्ने असे
ती पूर्ण करण्या सामर्थ्य तसे
सुंदर कूरूप यात मतभेद नसे
अश्या सोज्वळ स्वभावाची....
अनामिका...असे
आयुष्य तिच्यासाठी रंगमंच असे
माणसं सगळी कठपुतळी अन
त्यांचा सूत्रधार तो वरचा असे..
अन ती तिच्या जगाची राणी...
असच काहीतरी boaring
मी लिहीत असे
पण एकदा....
एक प्रसंग तिच्या आयुष्यात आला
जणू तिला पूर्णत: बदलून गेला...
दुपारची वेळ
ती आपल्यातच गुंग...
दोन स्त्रीयांनी ओरबारडले....
तिच्या अंगावरून रक्त वाहू लागले...
तिला केसांनी फरफटत..
एका अद्न्यात ठिकाणी नेल
म्हणे त्याला "असायलम" म्हणतात .
अश्या ठिकाणी वेड्या लोकांना ठेवतात ...
अनामिका वेडी ??? का ?
स्वप्न बघणारी माणसे वेडी का ?
आयुष्य - कटपुतलीचा खेळ समजणारी वेडी का ?
देवाला त्याचा सुत्रधार मानणारी वेडी का?
काय करणार
आजकाल सगळीकडेच वेड्यांचा कारभार...........

- शशांक नवलकर १२-१-२००९

"असायलम"

दूर कोणत्या ठिकाणी
अंधार्या खोलीत मला ढकलून दिले
बोटांची नख विखुरलेली
केस विस्कटलेले
अंग घामाने बरबटलेले.........
अन माझ्या नावापुढे शिक्का..............
वेडी !!!
का?
मी वेडी नाहीये ............
मला वेड लागलेले नाहीये...
रक्ताबद्दल रक्त
आणि हिसाब बराबर
हाच हिशोब आहे ना ह्या जगाचा
मग मी हि तोच मांडला होता ना
सर्व म्हणाले तोंड काळे करून आली भवानी
मग मी हि त्यांना म्हंटले
आज मी तोंड काळे नाही........
........लाल करून आलेय
म्हणून मला इकडे फेकले......
त्या मुडद्यांनी
अंधार्या खोलीत मला खुप भीती वाटते
काका मला प्लीज इथून बाहेर काढा
प्लीज इथून बाहेर काढा ...........
.
.
.
.

मागून एक सावली आली..........
सावलीतून एक हात माझ्या खांद्यावर पडला .............
अन माझ्या तोंडावर जोरात आघात झाला .........
कोणीतरी माझ्य्हा कानाखाली ठेवून दिले
अन कानात फक्त घुमत होते.........
चूप बैठ "....." साली
पागल कही की.........................

- शशांक नवलकर १२-१-२०१०

"WRONG TURN"

माणूस चुकतो
सुधारतो..
चुकत राहतो
सुधारत राहतो..
पण कधी कधी एकदा चुकतो..
तो शेवटचाच...
चूक-अचूकाचा तो खेळ
अन एक wrong turn..

प्रेमात पडतात
हरवून जातात...त्या प्रेयसीत
आयुष्य हरते...सारे काही हिरावते
कोणी सांगितले?
प्रेमात पडायला...
प्रेमात पडणे-तुटणे फुटणे....
breakoff करणे...
रडत बसणे
आणि बरेच काही..
मग एक wrong turn...

अपयश येते
नैराश्य येते........
खूप दु:ख होते
दारूत तुंडूब बुडावेसे वाटते....
नशा करावसे वाटते...
मग एक वेगळा नशा...
"बाई"...
एवढ्या उचापती कशसाठी?
यशासाठी की अपयशासाठी...
खरच या सगळ्याची गरज असते का ?
असाच...
यश अपयशाचा हिशोब...
अन एक wrong turn....

चूक - बरोबर
प्रेम - ब्रेकोफ - विरह
यश - अपयश - नशा - मॄत्यू
या सगळ्याची साखळी
अश्या अनेक साखळ्यांची माळ
कशासाठी? ...???
प्रत्येक वेळी
wrong turn असायलाच हवा का ?

- शशांक नवलकर १०-१-२०१०

जागते रहो!!!

रोज रात्री
एक आवाज ऐकू येई........
"जागते रहो"..
वाटे कोण म्हातारा कान खातोय
रोज रात्री रूम वर जाताना...
शेकोटी पेटलेली पहायचो...
काही माणसे पाहायचो...
बाराच्या सुमाराला
नेहमी आवाज ऐकू यायचा...
"जागते रहो"....
एक थंड रात्र....
लवकर घरी परतताना..
सर्वत्र अंधार होता..
शेकोटी दिसत होती...
माणसे हसत होती..........
आज तो आवाज आला नाही...
माझा डोळा काही लागला नाही...
काही चुकल्यासारखे वाटले...
खिडकीबाहेर डोकावले.........
पुन्हा कधीच झोपलो नाही....
त्या म्हाता-या बाबाचे
शव उलटे टांगलेले....
रक्त शिरातून गळलेले.......
अन लिहीले होते.........
"जागते रहो"

- शशांक नवलकर ९-१-२०१०

"BANG BANG "

रात्रीचे दॄष्य आजही आठवते
टांगलेल्या बाबाचे...
.
.
तीच रात्र...
तीच रूम
पण माणसं नवी...
त्या दोघीजणी
एकमेकींस अनोळखी..
त्या मुलीला शेकोटी बघायला आवडते
शेक घेण्या ती तेथे गेली...
अंधार..
थरथराट..
कर्कश्श आवाज..किंकाळी
अन सर्व बांध फुटले.....
अश्रू वाहू लागले..
रक्त सुद्धा........
बस्स...
पुन्हा ती कधीच
उभी राहू शकली नाही....
शेवट नेहमी सुरूवातीलाच होतो...
सुरूवात शेवटापासून करावी
उरली होती ती एकली
थरार अजुन वाढत होता...
त्यांना कोणी थांबवणारे नव्हते...
ती स्त्री...धाडसी
न कोणास बिलगणारी...
पण धरणीकंप होता सारे काही कोसळतेच
घेराव घातला...
मिळून करू बलात्कार....
त्यांनी ठराव मांडला....
तेव्हा रात्र निजत होती..
न कोणी ऐकणारे न कोणी बघणारे
होत होता "GANG BANG"
बांध फुटत होते बंधही तुटत होते
रक्त वाहीले सर्वत्र......
झाले सारे काही शांत
ऐकू येत होते तेव्हा फक्त
"BANG BANG"

पण ते रक्त तिचे नव्हते.......

- शशांक नवलकर १०-०१-१०

उत्तर आहे का ?

हम्म...
दर वर्षीप्रमाणे आजही तेच झाले
जे व्हायचे तेच झाले
जगण्यासाठी..
कोणाला तरी मारावेच का?
आजही कोणीतरी जीव देतय
तितकाच जीव घेतय.......
कोणासाठी...कशासाठी...कशामुळे..
उत्तर आहे का ?
स्वप्न होतं त्याच्या बाबांचे आईचे
रोज त्यांच्या स्वप्नांची राख होते...
सिगरेटच्या ashट्रे मध्ये
त्यांच्या कष्टाचे चीज.....
चाखनाच्या प्लेट मध्ये संपते
हे असले चिल्लर जगणे कशासाठी..
स्वार्थासाठी...पोटासाठी....प्रेमासाठी!
उत्तर आहे का ?
मोठ्या आशा-आकांक्षांचे आयुष्य
अपयशासाठी संपवले जाते
असे !
त्या आई-वडिलांचा काय दोष
मित्र-आप्तेष्टांचा काय दोष...
उत्तर आहे का ?
हे असच चालू राहील का ?
की सारे तसेच चालत राहील.......

- शशांक नवलकर ९-१-२०१०.

Saturday, January 30, 2010

हे शब्दच असे.........

हे शब्द असे
लिहीत जातो तुझ्यासाठी......
ओवी अशा गुंफत जातो
अनाहुतपणे...
श्वासही बनू लागतात शब्द तुझे.........
त्या श्वासांतून जन्मते कविता.......
तुझ्यासाठी.......
हे शब्दची आयुष्य....
आयुष्य ते जगणे .......
शब्दासाठी.....त्या कवितेसाठी...
अन त्या कवितेतली.......
तू.................
ओळखले तुला आज..
शोधत होतो खूप काळ......
अन इथेच होते मी म्हणतेस...
भेटलोच आपण काल........
बघ कसे नाते निर्मिले......
बोलावसं वाटतय....खूप बोलावसं वाटतय
indeed...... i miss you....
.............
.........
......
...
.
आता तू जगायचस....
मस्त जगायचस..........
हसायचस.........
थोडसं दुखतय ना......
मी असेन आता........
तुझ्यासाठी..... तुझ्यासोबत...........कायम........
एकच करायचस.........
फक्त हसत राहायचस........
मनमोकळं जगायचस.......
बस्स........एवढच मागतोय.........
देशील ना................

- शशांक नवलकर २७-१-२०१०

Tuesday, January 26, 2010

का असा....खेळ मांडला.....?

स्वप्न रंगवता रंगवता..
तोडून गेलीस........
आयुष्य बनवू जग दोघांचे...
उध्वस्त करून गेलीस....
ह~ बनवलेस न मला...
तुझ्या हातातले खेळणॆ...

तुझ्याशिवाय जगू शकत नाही...
म्हणायचीस अन काय काय सांगायचीस
काहीच खर नाही..
सगळेच खोटे होते ना ते.........
मग हसणे काय रडणे काय......
भीषण सत्य होते "ते"...
माझ्याच आयुष्याचे.....फक्त माझ्या.........
.
.
बनवलेस न मला....
तुझ्या आवडीचा जोकर........
.
.
त्या जोकरला ही कंटाळा येइल...
हसण्याचा...रडण्याचा...
परत हसण्याचा.....परत रडण्याचा
तो ही शिव्या देईल तुला..
हसवण्यासाठी...रडवण्यासाठी अन.......
फसवण्यासाठी...........
फसवलेस न मला.......
तुला एकटीलाच हसण्यासाठी.......
.
.
तुझ आयुष्य एक कोडं...
जळमट्यांनी भरलेलं एक कोपर
गुंता....तुझ्याच उलट०सुलट विचारांच......
रहा तिकडेच पडून
तेच तुझ विश्व...तेच तुझ आयुष्य....
जा रहा तू एकटीच...
.
.
माझ्या जगात खूप काही आहे..
जगण्यासाठी...आनंदी राहण्यासाठी...
माझी माणसं....माझे मित्र......माझ्या मैत्रीणी...
अन "ती"...माझ्यासाठी वाट पाहतेय.......
.
.
.
पुरे झाला हा खेळ........
मी जातो......
may god bless you.....
or else.........
just go to hell.................................................

- शशांक नवलकर २५-१-२०१०

Tuesday, January 19, 2010

"escorted"


पाठविली मला त्या देवानं
जगण्यास सुंदर रूपानं
पण लावली मला ह्या लोकांनी लेबलं
रांड, वैश्या, call गर्ल, लेज अशी......
काय दोष होता माझा...........
जी लोकं माझ्याच अंगाशी खेळतात
तेच माला ही असली नावं देतात
माझ्या आयुष्याचे वाट्टोळे.......
........ करणारे हे कोण???
"*****" साले.............
.
.
.
प्रत्येक जण माझ्यावर काय ना काय लिहीतो.......
कोणी मदनिका...कोणी भिंगरी.....
कोण सांगे माझे विझलेले अस्तित्व........
कोणी दाखवे माझ्या चिंध्या.........
त्या पुरूषांच्या चड्ड्यांवर कोणी केली का कविता ??
त्या नाच्यांवर केली का कोणी कविता.....
इथे सा-या पोरींनाच झेलावा लागतो.......
"अत्याचार"
आणि साले बोंबलत फिरतात
"aankho ka hai dhokha aisa tera pyaar.........
........tera emotional attyachaar"
काय करणार सगळेच असतात लाचार........
म्हणूनच हे श्रीमंत सिस्टीम आहे.....
नियतीनं बेकार............
म्हणून स्त्रिया असतात बाहुल्या इम्पोर्टेड........
पुरूष असतात....ए़क्स्पोर्टर्स
अन..........
सगळ्यांच आयुष्य दोन्हीकडून असतं
"escorted"



- शशांक नवलकर १९-१-२०१०

Tuesday, January 5, 2010

thank you ....


ह्या वर्षाची माझी पहिली कविता देवा तुला अर्पण करतो आहे .

thank you ....

its you .......
i am standing ............
living life..........like it should be
its you.........
i am taking breath..........
and they will be forever for you....................
i have no words left to confess........
how much i love you.............
all i can say is........
thank you...........

thank you
for giving me second life
for giving me hope.....
to live a brand new life.......
to start with
a brand new day
now i cant live without you
all i can say ....
for everything
"thank you"

some say thanksgiving is........
for reasons......for excuses.......
for me...
you are the reason
you are the strength....
to keep my will.......
strong and alive.........
so there cant be an excuse
to stay alive......
you hold the power ......
devine and pure....
for this purity and serenity
thank you

- shashank navalkar 04-01-2009.