Friday, May 20, 2011

प्रयास

सारा प्रयास पसार झाला..
बघण्यास आता फक्त अंत आहे
उगवलो मी नव्याने आता..
एकटाच का....ही खंत आहे

बघण्यास ओल्या पापण्यांनी
खुला तो आसमंत आहे...
जगतोय आता श्वास जपूनी
दिखावाच हा मी जीवंत आहे

स्वप्नं घेऊनी उराशी
एक नवे स्वप्न बघतो आहे
मिटल्या डोळ्यांनी दिसेनासे
एक असे चित्र शोधतो आहे

स्वत:शीच केला मी एक करार...
जगण्यास एक कारण शोधण्याचा
साथ तिची अनाहूत मिळवण्याचा
अंतास....स्वत:च पुसट होण्याचा

- शशांक नवलकर २०-५-२०११

Sunday, May 15, 2011

शब्द (गझल)

गण : गा ल गा गा गा ल गा गा
वॄत्त : मनोरमा


आठवांचा भार झाला
तोच तो आजार झाला

कंपला किंचाळला तो
बोचला बेकार झाला

भासला आभास सारा
घातकी प्रहार झाला

माग घेणे बास आता
घाव तो संहार झाला

शब्द हा बेभान आता
तोच का? कैवार झाला

- शशांक नवलकर १५.५.२०११