Sunday, February 24, 2008

मी विरूद्ध मी...



कधीतरी घ्यावा शोध मी मज स्वत:चा
शोध मज मनातील आसक्त भावनांचा
तिथे नसतात सावल्या नसतो प्रकाश
असतो फक्त मी अन माझे प्रतिबिंब

प्रतिबिंब मज भावनाचे असे तिथे
प्रतिबिंब सुखी व्यक्तिमत्वाचे
आशा-निराशांचे सुख-दु:खांचे
कोणीच नाही तिथे...फक्त मी विरूद्ध मी...

कल्पनारम्य वाटे हे सर्वकाही
पण खरच घ्यावा शोध स्वत:चा
त्या प्रतिबिंबासमोर असतो फक्त मी...
व मजसमोर असते माझे प्रतिबिंब

प्रतिबिंबात दिसे मज प्रकाश
पण मला न दिसे माझी सावली
विरक्त माझे मन कोरडे झाले ह्र्दय
अलग असे सर्व काही जिथे दिसे मी विरूद्ध मी...

कधी असा दिस यावा एकरूप व्हावे
प्रकाशात सावली असावी ह्र्दयात रक्त वहावे
कुठेही दु:ख नसावे असावा फक्त आनंद
पण प्रत्येक वेळी असते हे प्रतिबिंब इथे-तिथे

शोध घ्यावा सर्वांनी स्वत:चा
जिथे आहेत दु:ख-यातना वाद-कलह
डोकाऊन पहावे आपल्या आयुष्यात
आपल्या प्रतिबिंबाला जवळून पहावे

जेव्हा घेतला मी मज स्वत:चा
पाहील मी मज स्वत:ला प्रतिबिंबात
वाटते एकरूप व्हावे त्या रूपाशी
पण उरते फक्त ते प्रतिबिंब.. जेव्हा असतो मी विरूद्ध मी

No comments: