Sunday, December 5, 2010

too bad dream....


कसातरी वेळातनं वेळ काढत आलो..
तिला खास भेटण्यासाठी...
हातात नेहमीप्रमाणे गुलाबाचं फूल ...
फक्त तिलाच देण्यासाठी
तिला माझं भेटणं काही विषेष नव्हतं
पण मलाच ते खूप खास होतं
आज दिवस होता आमच्या मिलनाचा...
अहो जास्त विचार करू नका....
म्हणजे....आमच्या पहिल्या भेटीचा...
ती आली..
मी मात्र तिला पाहूनच हरवलो होतो..
तिच्या त्या लावण्याकडे बघता बघता..
स्व:ताच स्वत:ला शोधता-शोधता सापडलो होतो
क्षणातचं जवळं येऊनी थोबाडीत मारली...
का कशासाठी कळे ना..
पण त्या बेधुंद अवस्थेत..चांगलीच धुंद उडाली...
तीही मला एकटक बघत होती..
ओठांना काही तरी सांगायचे होते
पण शब्द ओठी येत नव्हते...
मला ही तिला काहीतरी सांगयचे होते..
पण काय करू यार...खरच मला धाडस होत नव्हते......
क्षण..क्षण..क्षणभंगूर झालो दोघे असे....
कोणालाच कळे ना ते आता बोलू तरी कसे
अखेर तिनंच पुढाकार घेऊनी..
म्ह्णाली...
प्रेम करतोस ना माझ्यावर...
मग वेळ का लावलास इतका...
बोल ना "आय लव्ह यू"
ओठी शब्द ते गुणगुणत होतो...
पण पुन्हा धुंद-बेधुंद क्रिया रिपीट झाली...
फक्त फरक एकच होता..
की ते एक भीषण स्वप्न होते...
आणि तुम्ही वाचताय काय...
चला निघा...आता माझी झोप उडाली...

- शशांक नवलकर ०५-१२-२०१०

No comments: