गिरवता गिरवता हात खरडले
कधी कधी रक्तानी हातही बरबटले
हस्तरेशा ही गिरवल्या
नशीबाच्या रेशाही गिरवल्या..
रंग बदलत होत्या त्या रेघोट्या..
नाती बांधली..तोडली पुन्हा जोडली
काही हरवली काही सापडली काही..कालावश
अश्याच नात्यांच्या शोधात...
नकळतच मला त्या शोधत होत्या
रेघोटया.....
असं खूप सारं मनात घेऊन फिरत होतो
अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं शोधत होतो
निराश हताश सावकाश बसलो होतो...
तितक्यात एक मुलगा जवळ आला...
म्हणाला......
दादा दादा.... माझ्या हातावर ह्या रेषा...
काय सांगतात...
- शशांक नवलकर १४/१२/२०१०
No comments:
Post a Comment