Wednesday, December 22, 2010

अनुभव

वाट बघत राहीलो
वाट बघत राहीलो
कधीच परत आली नाहीस
तुझ्याच आठवणींत गुंतत राहीलो...

प्रवास आयुष्याचा
तुझ्यासवे योजिला होता
का कोण जाणे तुझा दुरावा...
त्याने मोजला होता...

किनाराही साक्ष देत होता
माझा हा भीषण एकांत
तुझ्याविना जगण्याच्या सवयीस
शांतपणे दाद देत होता

हरलो खरच मी हरलो
आयुष्याच्या स्पर्धेत मी पडलो
आता कशासाठीच शर्यत नाही
कासव,ससा होता होता...
वाटेतला दगडच मी ठरलो

खरच देवा शिक्षा दिलीस
एकटं राहण्याची एक वेगळीच..
दुवा दिलीस
आता तिला पुन्हा मिळवणेही...
झाले असंभव
खरडतोय डायरी अन माझा हा भयाण अनुभव

- शशांक नवलकर २०/१२/२०१०

No comments: