सावरलेस बरे तू स्वत:ला
सोडून मला असा बिथरलेला...
हरकत नाही...आजकाल चालायचच
म्हणूनच समजावतोय स्वत:ला..........
तू गेलीस अन खूणा तुझ्या उरलेल्या
काही अलगदपणे सामवलेल्या....
आठवणींच्या सोबत अमर राहतील अश्या...
तर काही अचानक ओरबाडलेल्या
खूप काही बोलायचे राहून गेले...
तुझ्याजवळ व्यक्त करायचे राहून गेले
खेळ मांडला होता सर्व प्रश्नोत्तरांचा..
उरल्या होत्या फक्त ओळी...
काय करू आता ह्या सर्व पत्रांचं
एक एक शब्द वाचताना अश्रू ढासळले
जणू तो विधाताही मला सोबत देत होता
म्हणूनच माझ्यासकट उभे आभाळही भरून आले
कदाचित तोही एक वेगळीच पाऊसकविता लिहीत होता
अबोल्या आठवणीही मला सतावतात
तरीही त्या माझ्याशीच बोलायला येतात
वाटते पुसून टाकावं सारे काही...
पण पुन्हा नवी चित्र...नव्याने निर्माण होतात
पावलं माझी सुद्धा आता निराश झाली..
तुझ्या शोधात तीही आता हताश झाली
शर्यंत लागलीहोती जणू पाऊलखूणांची
काय करू ओढ लागली होती अजुनही तुझ्या सहवासाची
- शशांक नवलकर १६-१२-२०१०
No comments:
Post a Comment