Wednesday, December 1, 2010

a one स्टेप मदर...


एकदा मला भेटायचय...
भरभरून तुझ्याशी बोलायचय...
काळजात रूतलेल्या भावनांना
तुझ्यासवे थरथरल्या ओठानी...सजवायचय....
पण तू मला ऐकशील का रे ....
उरात उसळणा-या त्या छोट्या आशेचं एक स्वप्नं....

खूप काही बोलला होतास...
दोघं एक होऊ...
एकत्र आपले नवं विश्व घडवू...
एकटाच निघून गेलास मला एकटं सोडून .
एकच मोठी चुक केली...........
माझ्याच पोटी निघून गेलास..सारे काही कोलमडून

संपवून जावे सर्व काही....संपवूनी स्वत:ला..
ठरवूनी झाले सारे काही...पण काहीच घडले नाही...
सारे काही पुसून टाकावे पण ठळक असे काहीच मिटले नाही...
उद्रेक मनाचा कोणीच थांबवला नाही...
उद्रेक मज उराचाही कोणीच थांबवला नाही...

जगतेय जरी आयुष्य आता...
श्वासही माजे उरलेत फक्त त्या जीवासाठी...
जगायचे आहे आता प्रेम फक्त त्याच्यासाठी
बस झाली आता ही रड-कविता...
आयुष्य आहे आता माझे फक्त त्या तान्हुल्यासाठी...
जगायच आहे आता हसत खेळत फक्त.............

एकच सांगेन...हे जन्मदात्या...हे विधात्या...
जन्म माझा हिरावून घे...पण उमलणा-या कळींना.......
जन्म घेऊ दे.........उमलू दे...... एक नवी किरण बघू दे........

- shashank navalkar 2210hrs 01-12-10

No comments: