Tuesday, August 30, 2011

बस एक पल ...



कभी आखे नमसी हो जाती है
कही मोड ऐसेभी आते है
न जाने क्यो
दिल भी मुस्कुरा लेता है
शायद यही वो चाहता है
हर पल मै ऐसे ही जीता रहू
दुवा करता हू
मेरी हर ख़ुशी उसे मिले
लेकीन क्या करू
दिल कि ख्वाहिश कुछ और है
वो धडकता है मेरे लिये
लेकीन जीना ....

- शशांक नवलकर

Sunday, August 28, 2011

शब्दांचा बंगला ....

शब्दांचा बंगला ....

कधी कधी विचार करायचे राहून जातात
आयुष्याच्या डावात
काही हुकुमाचे इक्के ...
उघडायचे राहून जातात....
मग वाटतो बनवावा त्या पत्त्यांचा बंगला
पण हरण्याची सवय इतकी ....
मग तो बांधायचाच राहून जातो...
मग लिहिले जातात तेच विचार
शब्द बनुनी जातात तो आधार
मग लागतो मनी एक विकार
.
.
खरच life हे आहेच एकदम बेकार
जितके शब्द घ्यावे उधार
तितकी घ्यावी लागते मलाच माघार
शब्दांची सवय इतकी लागते
कि मग लेख , डायरी , पानं
काय लिहू आणि काय नाही
मग बस शब्दच आणि शब्द
.
.
कधी म्हणतो शब्दांचा डोंगर....
कितीही चढला तरी अंतर तितकंच
कधी म्हणतो शब्दांची नशा
कितीही चढली तरी साली चढतच नाही
मग कोणी म्हणतो शब्द बनलेत तुझे श्वास
काय यार ते हि तिला बघवत नाही...
.
.
म्हणून मी बांधतो शब्दांचा बंगला....
मी त्यात राहत नाही...........
आणि तो पडला तरी ....
.....अरे यार शब्द ते शब्दच ना......

- शशांक नवलकर २८-८-२०११

Friday, August 19, 2011

rewind.....



शब्दही होतात गढूळ...
जेव्हा आत्मा धूसर होत जातो..
मग मनातही विचारांची वर्दळ....
का हा देह नेहमी चुकत जातो...

पर्व बदलत गेले...
त्या प्रत्येक आठवणींचे
असे अनेक क्षण आले...
निसटणा-या आयुष्याचे

अनेक वेदनांचे चक्र..
मोजलेल्या जखमांचा परिघ...
अन सोसलेल्या त्या कालावधींचे
एक विशाल घन...वर्तुळ...

एक नितांत संदर्भ...
सर्व स्पष्टीकरणांचा...
एक अभ्यास.....
माझ्याच प्रतिमेचा....

- शशांक

Saturday, August 13, 2011

चुरगळलेला कागद....





अनेक अनुभवांतून गेलेला...
भावनांनी होरपळलेला
अनेक मनांशी जुडलेला
काही ह्र्दयांतही जडलेला....
अन....
मनातून भिरकावलेला...

खुप काही लपलेलं
अंतर्मनात दडलेलं
एखादं गुपित
काहीसं अर्पित
काहीसं शापित
गाळलेले...वगळलेले...
पण...
माझं आयुष्य तितकंच

रंगरंगांतूनी रंगलेला
अनेकांत मिसळलेला...
अनेकांसाठी जपलेला...
खूप काही सांगणारा...
मनातलं बोलणारा....
नि:शब्द मी.....

कल्पनांनी रंगवलेला
नकळतच कितीदा भिजलेला...
त्याच्यासाठी...तिच्यासाठी....
जपलेला...वाया घालवलेला...
जाळलेला...विझवलेला...

.....

एक चुरगळलेला...कागद.

- शशांक नवलकर १३.०८.२०११

Sunday, August 7, 2011

खास तुमच्यासाठी.....

घुसमटतो मी...
फरफटतो मी....
खूप रक्त आटवतो मी..
खूप हताश होतो मी...
अन खूप थकतो मी...
अन शेवटी....
.................
माझ्यातला मी हिरावतो.......
माझ्यातला मी हरवतो.....
माझ्यातला मी काळं फासून घेतो....
माझ्यातला मी गळा फासून घेतो.....
माझ्यातला मी..जाता जाता हसतो....
अन शेवटी....
..................
तो मीच जो दु:खी होतो....
तो मीच जो पुन्हा सु:खी होतो...
तो मीच जो रडतो...खचतो..
तो मीच जो पुन्हा उभा राहतो...
अन शेवटी....
...................
लिहीण्यासारखं बरच काही..
लिहीण्यासारखं काहीच नाही....
लिहीण्यासारखं सुचतं ही मला..
लिहीण्यासारखं मी लिहीतो ही....
लिहीण्यासारखं तुम्ही वाचता....
अन शेवटी....
...................
माझ्या कवितेतलं पूर्णत्व सफल होतं
कारण त्यात असता तुम्ही.....

.....
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

० शशांक

Friday, August 5, 2011

सेलिब्रेशन....

लोकं प्रेमावर कविता कविता करतात..
विरहावर कविता करतात..
"ती" सोडून गेल्यावर कविता करतात....
"तो" सोडून गेल्यावर!!!
अर्र्र्र मी नोरमल आहे ...
लोकं मैत्रीवर कविता करतात...
"मैत्रीदिन साजरा करण्यापुरतंच"
खरच मैत्रीला इतकीच किम्मत !!
कधी कधी प्रवचन टाईप लिहीतो मी...
पण मला ही कविता वाटते..
कारण माझे शब्द आहेत , त्या मैत्रीखातर...
जी मी गेली २२ वर्ष जपतोय....
त्या मैत्रीखातर.....जी मी गमावली..
त्या मैत्री खातर....
ज्यांनी मला जगायला शिकवले......
खरच मला मैत्री साजरी करावी वाटते...
त्या हर एक क्षणास...
जेव्हा मला आठवतात ते दिवस..
पहिल्यांदाच भेटलेले...
साजरा करावा तो प्रत्येक क्षण
मित्रासोबत घालवलेला...
साजरे करावेत ते शब्द ..
मित्र वा मैत्रीणीसाठी बोललेले..
साज-या कराव्या त्या ओळी....
मैत्रीसाठी लिहीलेल्या...
अन साजरी करावी ही कविता....
मी तुम्हा सर्वांसाठी लिहीली...


० शशांक

कविता...गंजत गेली....

अनेक ओवी
तुला लिहीलेल्या..
अनेक चारोळ्या..
मी गाळलेल्या
स्पंदनेही खरडली...
स्वप्नेही बघता बघता रेखाटली...
शब्दांचीही फुले झाली...
अन पारिजातकासम..
चिरडली गेली...
तमा कोणासही नव्हती..
आजही नाही..
पण माला आहे......
ते शब्द माझे होते........
आहेत अन कायम असतील...
पण ही कविता नवी नाही......
अन ह्यात जुनं तसं काहीच नाही.....
तरी ही पुन्हा पुन्हा लिहावीशी वाटते...
बंद पेटीला गंज लागला
तरीही ती उघडावीशी वाटते...
वाचावीशी वाटते...
खंत फक्त नव्याने कित्येकदा झाली....
कारण....ती कविता.......
गंजत गेली...

० शशांक

Thursday, August 4, 2011

वाटले होते..जणू....

स्वप्न पाहीले होते ...
नव्या उमेदीने जगण्याचे..
बेत रचले होते....
नवी दिशा गाठण्याचे..
होती एक योजना....
आयुष्य बदलून टाकण्याची...
पण होती एक भावना...
शिल्लक....विसरून जाण्याची...
कितीही पुढे चालत गेलो...
तरी पावलं मागे फिरतातच....
पुन्हा त्या दिशेने जाण्यासाठी...
नव्हे.....
सोबत उमटलेल्या....अनामिक....
पावलांना पुसण्यासाठी....
सुरूवात करायची होती.....
एकट्यानेच...
पण....
त्या वळणापासून.....
सोबत होतीच.....

० शशांक नवलकर ३१-७-२०११