Friday, November 16, 2007

कालचक्र .....


जन्म म्रुत्यू सुरूवात शेवट
विचार अविचार विजय पराजय
ह्या सर्व घटना नेहमीच घडतात... त्या थांबत नाहीत
कारण ह्या घटनांचे कालचक्र चालूच राहणार

जन्म होतो जेव्हा तेव्हा जीवनाची कळी उमलते
म्रुत्यू होतो तेव्हा जणू आयुष्याचे झाडच गळून पडते
ह्या घटना कोणी थांबवू शकत नाही .. त्या थांबत सुद्धा नाहीत
कारण जन्म-म्रुत्यूचे हे कालचक्र चालूच राहते

लोकांच्या मनात अनेक विचार असतात
काहींच्या मनात अविचार सुद्धा येतात
कधी चांगले घडते कधी वाईट.... सगळेच चांगले घडते असे कधीच होत नाही
कारण घटीत-अघटीत घटनांचे हे कालचक्र असेच चालू राहते

जगात युद्ध भांडणं शर्यती अन खूप काही चालूच असते
कोणाला अपयश येते तर कोणाचा विजयात जयजयकार सुद्धा होतो
पण ह्या जगात कोणीच कायम विजयी अथवा पराभवी राहीला नाही ना कधी राहणार
कारण हार-जीत नावाचे कालचक्र चालतच राहणार

अशीच अनेक चक्रव्यूह आपल्याला कुठून कुठे घेऊन जातात
कधी आपल्याला नव्या जगाचा नव्या जमिनीचा अनुभव येतो
कधी आपले जग उध्वस्त होते व पायाखालची जमिनसुद्धा सरकते
पण हे कालचक्र आपल्याला खूप काही दाखवते खूप काही शिकवते

कालचक्र जात्यासारखे फिरत असते
ते चालवणारे अनेक असतात
ते कधीच थांबणारे नसते कोणीच नाही थांबवू शकत
फक्त ते चालवणारे हात बदलत असतात

आयुष्यात कधीच थांबू नका.. मी सुद्धा नाही थांबणार
कारण आपल्या जीवनातील अशी अनेक कालचक्र चालतच राहणार

-शशांक

No comments: