Wednesday, November 28, 2007

कुस्करलेली फुले



प्रेम केले त्याने तिच्यावर
तिने प्रेम केले त्याच्यावर

तिने त्याला मिठीत घेतले
त्याने तिला कवेत गोजारले

असे अनेक प्रेमी आपले प्रेम व्यक्त करतात
एकमेकांना जवळ घेऊन आपाआपले ह्र्दय जोडत असतात

पण कधी कधी हे सर्व काही अपूरे पडते
ह्यावेळी भावना फुलल्या तरी त्या फुलासारख्या नष्ट होतात

कधी कधी फुले अशीच कोमेजून जातात
कधी कधी ती कुस्करलीसुद्धा जातात

प्रेमामध्ये पडल्यावर तीला त्याव्याशिवाय राहावत नाही
पण त्याला तिच्या सहवासात राहावत नाही

प्रेमाचा गंध जेव्हा नाहीसा होऊ लागतो
तेव्हा तिच्या भावनांचे ते फूल असेच कुस्करले जाते

प्रेयसीच्या भावना अशाच फुलासारख्या नाजूक असतात
अन कधी कधी तीच्या कळ्या तोडल्या जातात

काटे रुपतात आणि शेवटी तीच एक फूल बनून जाते
अन एका वास नसलेल्या फुलासरखी कुस्करली जाते

अशा कित्येक कळया उमलल्या
अशाच कळीसारख्या उमलल्या
अन फुल बनून नष्ट झाल्या

नाजूक भावनांचा खेळ झाला... कोमल फुलांचा नाश झाला
काटॆ रुपले होते रक्त वाहात होते

उरली होती ती फक्त कुस्करलेली फुले.

- शशांक.

No comments: