Sunday, November 25, 2007

कोमेजलेली फुले



प्रेमात तिचा गंध मिसळला
माझ्या प्रेमात तिच्या प्रेमाचा रंग मिसळला

गुलाबाच्या फुलाला सुद्धा काटे असतात
पारिजातक सुद्धा कधीना कधी धुळीला मिळतेच

तिने माझ्या जीवनाचा गुलदस्ता केला
जिथे होती फक्त फुले कोमेजलेली

खूप शोधून तिच्यासाठी गुलाब आणावा
अन तिच्या सुखासाठी मी गुलाबाचे काटे सहन करावे

मिठीत तिच्या पारिजातकासारखे सुगंधित होऊन जावे
तिच्या आठवणीतच जणू त्या पारिजातकासारखे कोमेजून जावे

प्रेम म्हणजे काट्यांनी भरलेल्य गुलाबाचे फुल
विरह म्हणजे कोमेजून पडलेल्या पारिजातकाचे फुल

माझ्या ह्या पुष्परूपी आयुष्यात तिने अशी अनेक फुले भरली
काही सुंदर होती काही सुगंधित होती काही सुगंधहीन होती

तिच्या सहवासात ही फुले बहरत होती
ती जेव्हा नव्हती तेव्हा तीच फुले कोमेजत होती

अन जेव्हा ती मला सोडून गेली
तेव्हा.... उरली होती ती फक्त कोमेजलेली फुले.

No comments: