Wednesday, November 28, 2007
शोधू कूठे तुला मी
नेहमीसारखेच काही हे दिवस जातात जणू
तेच ते नेहमीचे जगणे तेच ते एकटे श्वास
कधी-कधी मला वाटते जर हे जगणे नेहमीसारखे नसते तर..
तिथे जर तुझी साथ असती तर... कधी मी एकटा नसतो तर...
तुझ्या विचारात हरवलेलो असतो मी
भर गर्दित सुद्धा एकलकोंडा झालेला असतो मी
ह्या हरवलेल्या वाटेत सावल्यांच्या खेळात फसलो मी
बोल ना ग सखे शोधू कुठे तूला मी
बागेपाशी उभा असतो फुलपाखरांना पाहत असतो
ती फुलपाखरे एकटी नसतात त्यांच्या बरोबर निसर्ग असतो
माझ्या नशीबात तू असतीस तर.....
बागेमध्ये तू असतीस मी असतो अन निसर्गाच्या छायेखाली आपण असतो
हळूच हसतेस काळजात ठसतेस
तुझ्या आठवणीत विस्कळून गेलो मी
तुझ्या आठवणींतच का जणू जगून मेलो मी
वेडे आता ह्या जीवाला लागली तुझीच तमा.... सांग मला शोधू कुठे तूला मी
माझे तुझ्यावर प्रेम आहे हे बोलायचे होते
अन प्रेमाचे ते बोल बोलायचे राहूनच गेले
काळ वेळ अन तिला मी आज हरलो
एकटेपणाच्या भोवय्रात मीच कसा आज फसलो
सावल्यांमध्ये का शोधत असतो तूला मी
जरा मागे वळून पाहा माझ्याकडे
बघ कसा मिठीत घेतो तुला मी
मनच काय ह्र्दय सुद्धा आज बोलत आहे शोधू कुठे तूला मी ....
कुस्करलेली फुले
प्रेम केले त्याने तिच्यावर
तिने प्रेम केले त्याच्यावर
तिने त्याला मिठीत घेतले
त्याने तिला कवेत गोजारले
असे अनेक प्रेमी आपले प्रेम व्यक्त करतात
एकमेकांना जवळ घेऊन आपाआपले ह्र्दय जोडत असतात
पण कधी कधी हे सर्व काही अपूरे पडते
ह्यावेळी भावना फुलल्या तरी त्या फुलासारख्या नष्ट होतात
कधी कधी फुले अशीच कोमेजून जातात
कधी कधी ती कुस्करलीसुद्धा जातात
प्रेमामध्ये पडल्यावर तीला त्याव्याशिवाय राहावत नाही
पण त्याला तिच्या सहवासात राहावत नाही
प्रेमाचा गंध जेव्हा नाहीसा होऊ लागतो
तेव्हा तिच्या भावनांचे ते फूल असेच कुस्करले जाते
प्रेयसीच्या भावना अशाच फुलासारख्या नाजूक असतात
अन कधी कधी तीच्या कळ्या तोडल्या जातात
काटे रुपतात आणि शेवटी तीच एक फूल बनून जाते
अन एका वास नसलेल्या फुलासरखी कुस्करली जाते
अशा कित्येक कळया उमलल्या
अशाच कळीसारख्या उमलल्या
अन फुल बनून नष्ट झाल्या
नाजूक भावनांचा खेळ झाला... कोमल फुलांचा नाश झाला
काटॆ रुपले होते रक्त वाहात होते
उरली होती ती फक्त कुस्करलेली फुले.
- शशांक.
Sunday, November 25, 2007
कोमेजलेली फुले
प्रेमात तिचा गंध मिसळला
माझ्या प्रेमात तिच्या प्रेमाचा रंग मिसळला
गुलाबाच्या फुलाला सुद्धा काटे असतात
पारिजातक सुद्धा कधीना कधी धुळीला मिळतेच
तिने माझ्या जीवनाचा गुलदस्ता केला
जिथे होती फक्त फुले कोमेजलेली
खूप शोधून तिच्यासाठी गुलाब आणावा
अन तिच्या सुखासाठी मी गुलाबाचे काटे सहन करावे
मिठीत तिच्या पारिजातकासारखे सुगंधित होऊन जावे
तिच्या आठवणीतच जणू त्या पारिजातकासारखे कोमेजून जावे
प्रेम म्हणजे काट्यांनी भरलेल्य गुलाबाचे फुल
विरह म्हणजे कोमेजून पडलेल्या पारिजातकाचे फुल
माझ्या ह्या पुष्परूपी आयुष्यात तिने अशी अनेक फुले भरली
काही सुंदर होती काही सुगंधित होती काही सुगंधहीन होती
तिच्या सहवासात ही फुले बहरत होती
ती जेव्हा नव्हती तेव्हा तीच फुले कोमेजत होती
अन जेव्हा ती मला सोडून गेली
तेव्हा.... उरली होती ती फक्त कोमेजलेली फुले.
Wednesday, November 21, 2007
तू माझी होशील का ?....
एकांत एकांत आशा निराशा
वाट पाहीली अन नको नको ती कालचक्र पाहीली
आता मला तिला पाहायचे आहे
ती जवळ येताच तिला म्हणायचे आहे
तू माझी होशील का ?......
सतत मी तिचा विचार करत असतो
क्षणाक्षणाला मी तिच्या प्रेमात पडत असतो
तिच्याशी बोलायला जावे तर ती हसत विषय बद्लत असते
माझ्या काळजाचे ठोके वाढतच असतात म्हणूनच मला तिला विचारायचय
तू माझी होशील का ?.....
प्रेम करणे कधी वेडेपण असते
प्रेमात पडणारे सुद्धा वेडेच असतात का ?
मी तिच्या प्रेमात वेडा झालो आहे
ती सुद्धा माझ्या प्रेमात पडेल का ?... म्हणूनच मला तिला विचारायचे आहे ....
तू माझी होशील का ?.....
Friday, November 16, 2007
कालचक्र .....
जन्म म्रुत्यू सुरूवात शेवट
विचार अविचार विजय पराजय
ह्या सर्व घटना नेहमीच घडतात... त्या थांबत नाहीत
कारण ह्या घटनांचे कालचक्र चालूच राहणार
जन्म होतो जेव्हा तेव्हा जीवनाची कळी उमलते
म्रुत्यू होतो तेव्हा जणू आयुष्याचे झाडच गळून पडते
ह्या घटना कोणी थांबवू शकत नाही .. त्या थांबत सुद्धा नाहीत
कारण जन्म-म्रुत्यूचे हे कालचक्र चालूच राहते
लोकांच्या मनात अनेक विचार असतात
काहींच्या मनात अविचार सुद्धा येतात
कधी चांगले घडते कधी वाईट.... सगळेच चांगले घडते असे कधीच होत नाही
कारण घटीत-अघटीत घटनांचे हे कालचक्र असेच चालू राहते
जगात युद्ध भांडणं शर्यती अन खूप काही चालूच असते
कोणाला अपयश येते तर कोणाचा विजयात जयजयकार सुद्धा होतो
पण ह्या जगात कोणीच कायम विजयी अथवा पराभवी राहीला नाही ना कधी राहणार
कारण हार-जीत नावाचे कालचक्र चालतच राहणार
अशीच अनेक चक्रव्यूह आपल्याला कुठून कुठे घेऊन जातात
कधी आपल्याला नव्या जगाचा नव्या जमिनीचा अनुभव येतो
कधी आपले जग उध्वस्त होते व पायाखालची जमिनसुद्धा सरकते
पण हे कालचक्र आपल्याला खूप काही दाखवते खूप काही शिकवते
कालचक्र जात्यासारखे फिरत असते
ते चालवणारे अनेक असतात
ते कधीच थांबणारे नसते कोणीच नाही थांबवू शकत
फक्त ते चालवणारे हात बदलत असतात
आयुष्यात कधीच थांबू नका.. मी सुद्धा नाही थांबणार
कारण आपल्या जीवनातील अशी अनेक कालचक्र चालतच राहणार
-शशांक
आशेचे नवे रोप ...
झाडे मोठी होतात
फुला फळांनी बहरून जातात
कालची कुठली रोपं
आज जणू कल्पतरूच बनून जातात
आपले आयुष्यसुद्धा असेच एखादे रोप असते
जे वाढत वाढत एक कल्पतरूच बनते
ते झाड कल्पतरू बनते तेव्हा.....
ते नकोसे होते कधी कधी ते हवे हवेसे सुद्धा असते
पण ते तोडले जाते... खुंटले जाते...
आपल्या आयुष्यात सुद्ध कधी कधी असेच काहीसे घडते
पण जेव्हा ते झाड तुटते तेव्हा
अनेक ॠतू ते असेच उभे असते
अन नकळतच तिथे एक लाहनगे रोप उभे असते
पुन्हा नवे जिवन जगण्याची उत्सुकता घेऊन उभे असते
माणूस जेव्हा हरतो तेव्हा तो असाच ढासळतो
पण तो सुद्धा एक लाहनगे रोपच असतो
हरलेला असतो जीत जिवनातून निघून गेलेली असते
पण पुन्हा ती जीत मिळवण्यासाठी तो पुन्हा उभा राहतो
झाड आणि माणूस सजीवच आहेत
एकरूप नाहीत पण एकनिष्ठ आहेत .....
- शशांक
Saturday, November 3, 2007
पुन्हा मागे वळून पहावेसे वाटते
आयुष्य असेच चालत असते
दिवसा मागून दिवस उलटत असतात
पण ही पावले थांबतात जेव्हा त्या आठवणी आठवतात
अन तेव्हाच मला पुन्हा मागे वळून पहावेसे वाटते...
कोणाची तरी साथ असेल ही आशा बाळगत होतो
पण ती आशा निराशाच बनून राहीली
पण त्या सुखद आठवणींमध्ये मला पुन्हा हरवून जावेसे वाटते
जेव्हा मला पुन्हा मागे वळून पहावेसे वाटते
त्या चित्रांकडे पाहताच जुन्या आठवणी ताज्या होतात
जणू त्या चित्रांमध्येच हरवून जावेसे वाटते
पण ती चित्रच का जणू मला हवी हवीशी वाटतात
म्हणूनच मला पुन्हा मागे वळून पहावेसे वाटते.....
त्या आठवणी अश्रुंनी वाहून जातात
अन अश्रुच माझे गारठून जातात
पण जेव्हा मला त्या सगळ्या दिवसांची आठवण येते
तेव्हा मला सारखे पुन्हा मागे वळून पहावेसे वाटते
जेव्हा मला कोणाची तरी साथ हवी असते
तेव्हा माझ्या जवळ कोणीच नसते
पण जेव्हा मी तिच्या त्या सुखद आठवणींकडे पाहतो
म्हणूनच का जणू मला सारखे पुन्हा मागे वळून पहावेसे वाटते.....
बोलायचे होते मला आज खूप ....
बोलायचे होते मला आज खूप
पण तिला पाहताच ते शब्द नाहीसे झाले
माझ्या ओठावर जणू ते शब्द तरंगत होते
पण तिच्या ओठांवरील हास्य पाहताच श्वासातून ते नाहीसे झाले
मनात माझ्या तीच असते
स्वप्नात माझ्या तीच असते
प्रत्यक्षात जेव्हा ती असते
तेव्हा ह्रदय माझे बोलत असते
प्रेम प्रिती सर्व काही हवे असते
ती आली की सर्व काही हातात असते
पण न जाणे का ....
माझे ओठ खिळून जातात
जेव्हा तिचे ओठ काही बोलत असतात
मनाशी मी निश्चय करतो रोज
माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सांगिन तिला
पण मन माझे घाबरत असते
श्वास माझे वाढत असतात
पण शब्द माझे ओठावरच थांबतात
जेव्हा मी तिच्या ओठांकडॆ पाहत असतो
जेव्हा ती बोलत असते अन मी .....
काही न बोलता तिच्या ओठांकडे पाहत असतो
अन मला जे बोलायचे होते ते शेवटी राहूनच गेले.......
Subscribe to:
Posts (Atom)