Sunday, June 3, 2007

पहीला पाऊस


रोज सकाळी उन्हातून जाताना
निरभ्र आकाशाकडे मी पाहत असतो
उन्हाळा असो की थंडी असो
तो सूर्य एक न विझणाय्रा ज्योतीचे काम करीत असतो

थंडीचे दिवस जातात
उन्हाळा येतो
तन मन सर्व काही तापवून सोडतो
एखाद्या भट्टीमध्ये शिजत पडल्यासारखे वाटू लागते

ही स्रुष्टीच आहे अशी की , , ,
सर्व काही सोसण्याचा आनंद देते
अन सर्व काही सोसण्याचे दु:ख सुद्धा देते
तसेच काहीसे होते अन ह्या उन्हाची आपल्याला सवय होते
अन आपण त्या पहिल्या पावसाची चाहूल शोधत राहतो

शेवटी आपली वाट पाहायची वेळ संपते
तेच तेच निरभ्र आकाश अन तो तळपता सूर्य
ह्यामधून आपल्याला थंड वाय्राची झूळूक लागते
ते आकश काळ्या ढगांनी अभ्र होऊन जाते
त्या काळ्या ढगांच्या गडगडाटामध्ये मन गुंग होऊन जाते

थेंब थेंब पडता पडता नजर आकाशाकडे जाते
विजा जणू नर्तकी बनून आकाशात नाच करीत असतात
अन ती वर्षा आपल्या धारांचा वर्षाव करू लागते
ती कोरडी जमिन ते कोरडे रान
मातीच्या सुगंधाने मुग्ध होऊन जाते

मन माझे सुखावते
ओले चिंब होते
हा अनुभव दर वर्षी येतो
पण प्रत्येक क्षण हा त्या पावसासारखा नसतो

असाच असतो का पहिला पाऊस ?

No comments: