Friday, June 15, 2007

प्रतिबिंब


आरश्याकडे पाहत असता
मी पाहतो मज स्वत:ला
निस्तेज शरीराची जणू एक साधी सावलीच असते
असेच असते का हे प्रतिबिंब ...

हे प्रतिबिंब असते सुंदर स्त्रीचे
तर हे प्रतिबिंब असते एका निस्तेज मनाचे
ह्या प्रतिबिंबात काही नसते
पण उजेडात न दिसणारी जणू ती एक सावलीच असते

प्रतिबिंब नसते आरश्यापुरते
पण सावली आणि प्रतिबिंब हे एकमेकांपासून भिन्नच असतात
सावली आपल्याला शांतता देते
अन प्रतिबिंब हे नेहमीच अशांत असते

दूर नदीच्या काठावरती
चांदण्या प्रकाशातून जात असता
त्या निखळ पाण्यावर तेज अवतरते
जणू अवघे आभाळ त्यात समावलेले असते
अन तो चंद्र जणू नदीला तजोमय करीत असतो

असाच मी त्या नदी काठावर
त्या चांदण्याला न्याहाळीत असतो
अन त्याला पाहता पाहता
माझे प्रतिबिंब हरवून जातो

असेच असते का हे प्रतिबिंब . . . .

No comments: