Saturday, June 30, 2007

lost in translation : प्रेम म्हणजे जादू !!!


प्रेम म्हणजे जादूच असते

अन त्याला आपण काहीच करू शकत नाही


जिथे प्रेम सदैव असते

तिथे प्रेमाची जादू कायम असते

तेच का आपल्या आतुष्यातील गोड रहस्य असते


प्रेमाची मजा न्यारीच असते

जी खूप वेगळी असते


आपल्या आयुष्यात असे काहीच नसते

जे प्रेम बदलू शकत नाही


प्रेम बदल घडवते

खरच आहे ते


एखादी सामान्य जागासुद्धा आपल्याला .

निसर्गरम्य अन फुलोरा फुलल्यासारखी वाटू लागते


प्रेम हे प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर असते

प्रेम ही प्रत्येक प्रेमीची भाषा असते

अन प्रत्येक प्रेयसीच्या ह्रुदयाची भाषा असते


प्रेम हे खूप अनमोल असते

प्रत्येकाला हवे हवे से वाटत असते


खरच प्रेम ही जादू असते

प्रत्येकाच्या आयुष्याचे गोड रहस्य असते

Sunday, June 24, 2007

एकांत आशेचा . . . .




पुसटशी ओखळ आता हक्काचे घर होतेय

हक्क हा नक्की कोणाचा तुझा की माझा
ज्याला दिला हक्क तोच तूला विसरला
वाट पाहतेस तू त्याची आत्रतेने
का व्हावे मन सारखे एकटे

हक्क हा ना तुझा ना माझा
वेड्या मनाची वेडी ही कथा
वेदनेच्या उन्मळी मारवा जसा
असेच नदीतीरी होते दुख़ः एकटे

दु:ख हे असते नेहमी़च छोटेसे
काटे समजून त्याला दूर करत असतो
पण जेव्हा ते आपण गिळतो
तेव्हा त्या नंतरचा गोडवा न्याराच असतो

आशेवरच का जगावे
श्वास असतात माझ्या आयुष्याचे
जगत असते मी त्याच्यासाठी
त्या श्वासांमुळेच

श्वासात हुन्कार माझ्या स्वप्नाचे
सावलीच्या मागे प्रेमाची मैना
मैनेच्या स्वरांचा नाद शोधताना
प्रत्यक्षात मी एकटाच असतो अन ती सुद्धा

तिला ना मला कोणी व्यक्त व्हायला
हे जग नेहमीच अपुरे असते
अपुर्‍या जगात आसवाची माळ गुंफ़लेली
एकटेपणाचे अविरत सत्य फ़क्त मनास उमगलेले...
तुझ्या अन तिच्या!

स्वप्न श्वास अन प्रेम
हे सर्व एक धागा बनून जातात
उरतो तो फक्त एकांत . . .

@भक्ती / शशांक

Saturday, June 23, 2007

त्या रात्रीचा पाऊस . . .


रात्रीच्या पावसात भिजताना

असे वाटते की त्या किर्र काळोखात न्हाऊन जावे


विजांची चकमक झाली तर

ढगांच्या गडगडाटात धुंद होऊन जावे


असा पाऊस जर सोबत असला तर

असे वाटते की ह्या काळोखात फक्त मी अन ती असावी


त्या पावसाचा मी आनंद घेत बसावा

अन तिने चिंब होऊन माझ्या मिठीत यावे


हळूच तिच्या त्या गालांवरून अश्रु पडावेत

अन मी त्या धारेत ते विसरून जावेत


रात्रीच्या पावसात भिजण्याची मजा न्यारीच

सोबत तिची जर असली तर पहीला पाऊस पण त्या रात्रीला थोडा वाटतो


त्या रात्रीचा पाऊस पण मला असाच आठवतो

विजा नर्तकी बनल्या होत्या , ढगांचा नाद होत होता


मी तिची वाट पाहत होतो

ती जेव्हा आली एक वीज खाली पडली


अन हळूच ति माझ्या मिठीत आली

अन त्या पावसाची मजा वसूल झाली


असावा असा रात्रीचा पाऊस

भिजण्याचा आनंद देणारा

दु:ख वाहून नेणारा

तिला जवळ आणणारा

Friday, June 15, 2007

प्रतिबिंब


आरश्याकडे पाहत असता
मी पाहतो मज स्वत:ला
निस्तेज शरीराची जणू एक साधी सावलीच असते
असेच असते का हे प्रतिबिंब ...

हे प्रतिबिंब असते सुंदर स्त्रीचे
तर हे प्रतिबिंब असते एका निस्तेज मनाचे
ह्या प्रतिबिंबात काही नसते
पण उजेडात न दिसणारी जणू ती एक सावलीच असते

प्रतिबिंब नसते आरश्यापुरते
पण सावली आणि प्रतिबिंब हे एकमेकांपासून भिन्नच असतात
सावली आपल्याला शांतता देते
अन प्रतिबिंब हे नेहमीच अशांत असते

दूर नदीच्या काठावरती
चांदण्या प्रकाशातून जात असता
त्या निखळ पाण्यावर तेज अवतरते
जणू अवघे आभाळ त्यात समावलेले असते
अन तो चंद्र जणू नदीला तजोमय करीत असतो

असाच मी त्या नदी काठावर
त्या चांदण्याला न्याहाळीत असतो
अन त्याला पाहता पाहता
माझे प्रतिबिंब हरवून जातो

असेच असते का हे प्रतिबिंब . . . .

Sunday, June 3, 2007

पहीला पाऊस


रोज सकाळी उन्हातून जाताना
निरभ्र आकाशाकडे मी पाहत असतो
उन्हाळा असो की थंडी असो
तो सूर्य एक न विझणाय्रा ज्योतीचे काम करीत असतो

थंडीचे दिवस जातात
उन्हाळा येतो
तन मन सर्व काही तापवून सोडतो
एखाद्या भट्टीमध्ये शिजत पडल्यासारखे वाटू लागते

ही स्रुष्टीच आहे अशी की , , ,
सर्व काही सोसण्याचा आनंद देते
अन सर्व काही सोसण्याचे दु:ख सुद्धा देते
तसेच काहीसे होते अन ह्या उन्हाची आपल्याला सवय होते
अन आपण त्या पहिल्या पावसाची चाहूल शोधत राहतो

शेवटी आपली वाट पाहायची वेळ संपते
तेच तेच निरभ्र आकाश अन तो तळपता सूर्य
ह्यामधून आपल्याला थंड वाय्राची झूळूक लागते
ते आकश काळ्या ढगांनी अभ्र होऊन जाते
त्या काळ्या ढगांच्या गडगडाटामध्ये मन गुंग होऊन जाते

थेंब थेंब पडता पडता नजर आकाशाकडे जाते
विजा जणू नर्तकी बनून आकाशात नाच करीत असतात
अन ती वर्षा आपल्या धारांचा वर्षाव करू लागते
ती कोरडी जमिन ते कोरडे रान
मातीच्या सुगंधाने मुग्ध होऊन जाते

मन माझे सुखावते
ओले चिंब होते
हा अनुभव दर वर्षी येतो
पण प्रत्येक क्षण हा त्या पावसासारखा नसतो

असाच असतो का पहिला पाऊस ?

तिची कविता २


फुलणाय्रा कळीत पाहून एकदा
मला गोड गोड हसायचय
अगदी त्या फुलपाखरासारखे
पानांनाही कधीतरी अस खुशाल पुसावं

दुरागावच्या त्या पक्ष्यासोबत आपलही काहीतरी नातं असाव
पण का म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाची सोबत लाभावी
ह्या देवानेच जणू ही अशी नाती बनवली
अगदी एका पातळ धाग्यासारखी . . . .

नाती जुळतात अनेक
जणू धागे गुंततात अनेक
त्याच धाग्यांना पडतात अनेक गाठी
त्या गाठी सोडवता सोडवता
अनेक अश्या गाठी सुटतात
अगदी एखाद्या नात्यासारखी

मला कधी कधी वाटतं
झय्राजवळ जाऊन क्षण्भर बसावं
मिटलेल्या दिवसाच दु:ख मनात असाव
मुठभर चांदण्यासाठी त्या आभाळावर रुसाव
अश्रूनी माझ्या डोळ्यांवर पाझर घालावी
अन तुझ्या स्पर्शाने ती धारच जणू गारठून जावी

तुला आयुष्यात जे काही हव
ते सर्व काही तुला सदैव मिळाव हीच माझी ईच्छा
भाग्यवान हा शब्द तुलाच फळो
ह्याचा अर्थ साय्रा जगाला तुझ्याचकडून कळो

काही न मागताच सर्व काही दिलस मला
आता अजून काय मागू मी तुझ्याकडे
मी सारखी हीच प्रार्थना करीन
माझे आयुष्यच मिळो तुला

आता ह्याशिवाय मजकडे काहीच उरले नाही . . . .

वादळ २


निरभ्र निळे आकाश असते
सर्वत्र हिरवळ पसरलेली असते
निसर्ग राजा खुष असतो
आपल्या स्रुष्टीवर विराजमान झालेला असतो

पण ह्या जगात सु:खी जीवन हे सदा अमान्य असते
हळूच सुसाट वाय्राची चाहूल लागते
काळे ढग भरून येतात
वावटळच जणू चालत येते

अश्याच अनेक वावटळी चालून आल्या
त्या वावटळींचे एक वादळ उसळले
सर्वत्र अंधार पसरला
सारे काही उध्वस्त झाले

ह्या स्रुष्टीत अशी अनेक वादळे येत असतात
सर्व काही उध्वस्त करून जातात
अनेक आयुष्य अशीच रक्तबंबाळ होतात
धरतीवर जणू अंधकार पसरतो पण . . .

पहील्या वादळासारखेच हे वादळ असते
तात्पुरते उध्वस्त करून गेले असले
तरी आशेचे किरण सोडून जाणारे
नवी आयुष्य निर्माण करून जाणारे

हे वादळ जणू सर्व काही संपण्यासाठीच निर्माण होते
सर्व काही उध्वस्त करून जाते पण काहीतरी नवं निर्माण करून जाते
अनेक आयुष्य नष्ट करते
पण नवीन आयुष्य देऊन जाते
पावसाच्या मोहक धारांचा आनंद देऊन जाते
ईंद्रधनुष्याचा आनंद देऊन जाते

वादळ चांगले म्हणावे का वाईट
चांगले पण घडते वाईट सुद्धा घडते
पण एक मात्र नक्कीच ही वादळं . . . . . .
बदल करण्यासाठीच निर्माण होतात
अन बदल करूनच नष्ट होतात