Monday, March 31, 2008

जगले आयुष्य आज मी तुझ्यासाठीच....



स्वत:हून जास्त प्रेम तुझ्यावर
केले होते मी...माझे सर्वस्व अर्पण
तुझा भास..तुझा सहवास....
तुझ्याच प्रेमात पडले होते मी...

नाही कधी मिळाले मज काही
ना मिळाले काही मज आज..
स्वप्न रंगवत होते आपली...
पण स्वप्नांतील रंगच आज झाले नाहीसे...

खूप ठरवले होते मी स्वत:शीच
नाही पाहणार तुझ्याकडे कधीच
पण प्रेम होते तुझ्यावर आधीच
संपणार नव्हते ते आज व कधीच..

तू मला सोडून निघून गेलास
अश्रूंच्या ओंझळीत मला सोडून गेलास
मला विसरून जा म्हणतोस
मग का माझ्यासाठीच रडतोस ....

आज तो मला सोडून गेला होता
काळीज मज काढून निघून गेला होता
रंगहीन झाले मज आयुष्याचे चित्र आज
मरण सुद्धा मज नशीबात का नव्हते....

कारण जगले होते आयुष्य मी फक्त तुझ्यासाठीच...

Sunday, March 30, 2008

तू तुझ्यासाठीच....मी ही तुझ्यासाठीच...


अश्रुंच्या धारा पाझरतात
मज डोळ्यातूनी फक्त तुझ्यासाठी
उमलते हास्य मज चेहय्रावर
मलाच ह्या अवस्थेत बघताना...

जवळ घेतलेस मला
परका होतो मी.. आपलसं केलस
जर आपले बनवून परके करायचे होते
तर का आपले म्हणून प्रेम केलस

क्षण क्षण जगलो फक्त तुझ्यासाठीच
कित्येक त्यागही केले फक्त तुझ्यासाठीच
एकच इच्छा होती...असावीस फक्त माझ्यासाठीच
पण...जगलीस तू आयुष्य फक्त स्वत:साठीच

तुझ्या भावनांसाठी आयुष्य जगलो अमर्याद...
आज वाटते मला जगावे फक्त स्वत:साठीच....
अंधार करून निघून गेलीस मज आयुष्यात
आहे आता फक्त त्या काजव्यांची साथ...

चालतो आहे एकटी ही वाट काजव्यांच्या प्रकाशात .....

Thursday, March 27, 2008

काजव्यांच्या प्रकाशात


अंधारातील फुले वेचता
पडावं चांदण अंधारातच
निस्तेज अव्यक्त मन
व्हावे तेजपूर्ण चंद्र्प्रकाशाने

आयुष्यातील अंधार दूर करावा
अंत:करणातील प्रकाशानेच
मना-मनातील अंधार संपेल
मनातील प्रकाशानेच..

प्रेमामधला अंधार,अविश्वास
नाहीसा करावा प्रेमाच्याच प्रकाशाने
अंधारातून मार्ग काढतो….माझ्याच प्रकाशाने

अशाच काळोखी वाटेत
असावी त्या काजव्यांची साथ
दाखवावा त्यांनी प्रकाश

त्या प्रकाशवाटेत चालत जावे…चालत जावे

Saturday, March 22, 2008

जगावे फक्त स्वत:साठीच...


आज आठवले ते क्षण...
सु:खाचे दु:खाचे संकटातले आनंदातले
सर्व काही एकसारखे होते...पण क्षणात विस्कटणारे
आज संपले ते सर्व कारण सर्वच होते विस्कटलेले

जीव लावला जिथे जिथे
काहीच मिळाले नाही मज तिथे तिथे
जर हे सर्वच नव्हते मजसाठी
मग का मज जळवले इथे

जळून गेले ते चित्र आयुष्याचे
पण आज रंग बदलले आहेत
नवीन रंगातच रंगून जावे
आयुष्याच्या नव्या चित्रात हरवून जावे

ना कोणाची तमा...ना कोणाची आस
सर्व असावे फक्त स्वत:साठीच
जगावे आयुष्य स्वत:च व संपववावेही स्वत:च
शेवटी जगावे आयुष्य स्वत:साठीच

पण आयुष्य हे संपत नाही...कारण कोणीतरी आहे...
कोणीतरी आहे जे जगते आहे मजसाठी...शोधु कुठे

Friday, March 21, 2008

भावना...आठवणी....होळी



आयुष्यात न मिळे जे काही
विझून जावे ते सर्व काही
न मिटत असावे जे काही
जळवून टाकावे ते सर्व काही....

विसरून सर्व काही साजरी व्हावी होळी

परका करून गेले आपलेच आज
मुक्त झालो का मी त्या नात्यांतून आज
ज्यांच्यासाठी जपल्या भावना....जीव-जिव्हाळा
त्यांनीच भस्म केल्या माझ्याच भावना

भस्मसात व्हावी ती दु:ख करावी साजरी होळी

आयुष्य जिच्यासाठी रंगवेले तिनेच हरले ते रंग
जपला मज प्रेमाचा रंग व तिनेच उडविला तो रंग
उडवावा फक्त गुलाल दोन हातांनी सजवावी ती होळी
रंगावे त्याच रंगात जे निघून जातील फक्त पाण्यानेच

रंगात रंगून जावे व सर्व काही विसरून जावे ....
विसरून जाव्यात त्या आठवणी...साजरी करावी होळी

अमर्याद.....


तुझ्या आठवणी तुझ्या यातना
वाहती रक्त बनून माझ्या नसांतून
तुझे बोल तुझे हसणे का थांबवतात माझे श्वास?
तुझा स्पर्श...तो भास....का जळवतात मला?

जीवन का जगावे मी फक्त तुझ्यासाठी
का तू नाही जगत माझ्यासाठी
दूर असतेस तू मजपासून आज
पण का तुला माझाच हवा सहवास...?

तुजसाठी थिजलो उजेडात..रणरणत्या उन्हात
न मिळे सावली न मिळे सय मिळे तो फक्त अंधार
फक्त तेव्हा फक्त त्या क्षणी.......
मी आहे म्रुत्यु व तू आहेस अमर्त्य...

जिथे तू अंत करी मी तिथे सुरुवात
तू पाही स्वप्न मी करी ती पूर्ण
त्या क्षणी फक्त तू...फक्त तूच...
असे जळणारी आग व होइ माझीच राख..

आता उरली नाही मर्यादा भावनांची
ना उरले ते शब्द कोणासही मर्यादित
राहीला नाही तो स्पर्श धीर देणारा..प्रेम देणारा
कारण....तू फक्त तू आहेस अमर्याद.....

Sunday, March 16, 2008

सुंदर मी होणार



आज त्याचे लक्ष नाही मजकडे
त्याच पोरींची किलबील त्याकडे
कधीतरी असेल त्याचे लक्ष मजकडे
तेव्हा असेल तो फक्त माझ्याकडे…..

आज टाकले सर्वांनी मज
सोडून गेले मज सर्व एकटे ….
वेधीन मी त्यांचे लक्ष मजकडे
तेव्हा असेल पाहत तो माझ्याकडे

घ्यावे त्याने मला त्याच्या मिठीत
त्याच्या स्पर्शाने लालबुंद व्हावे मी
माझ्या स्वप्नाच्या राजकुमारासाठी....
फक्त त्याच्यासाठीच.... सुंदर मी होणार

आज आला आहे तो दिवस
दिवस जेव्हा मी त्याच्या मिठीत…
असेल ते माझे सुंदर स्वप्न …..
आज ते स्वप्न साकार होणार

फक्त तुझ्यासाठीच आज सुंदर मी होणार..

- शशांक

Tuesday, March 11, 2008

स्वप्नात माझ्या....



थांबवावे बघणे ते द्रुश्य
थकले माझे डोळे बघून
कंटाळलो मी त्या भयानक चित्राला
मिटावे डोळे निद्रेत...जावे स्वप्नात माझ्या

स्वप्नात माझ्या...नसेल सांडत रक्त
नसाव्यात कोणाच्या यातना...अश्रू
जळू नयेत कोणाची स्वप्न....आकांक्षा
असावा तिथे फक्त आनंद...अस्वाद...स्पर्श

स्वप्नात माझ्या...न मिळावा आईचा ओरडा
नसावा माझ्या प्रेमाचा रंग असा कोरडा
स्वप्नात माझ्या...तिने यावे मिठीत घ्यावे
कोणी नसावे तिथे...फक्त ति असे व मी

जग हे आज गजबजलेले...गडबडलेले
उभे ताठ कमानीवर...पायथ्याशी बिथरलीले
उध्वस्त होते जग हे...आज मिटावेत डोळे इथे
जर पहावा स्वर्ग जगताना...जावे मग स्वप्नात माझ्या

नसेल तिथे दु:ख-यातना...नसतील काळ्या सावल्या
कोणीच न खेळावा आयुष्याचा लपंडाव तिथे
लाभावी तिची साथ जो पर्यंत हातात तिचा हात
अंधार असावा पण चांदण्या प्रकाशात...स्वप्नात माझ्या

Wednesday, March 5, 2008

खेळ मुखवट्याचा



खेळ लहान मुलांचा
खेळ भातुकलीचा
खेळ लपंडावाचा
पण खेळ मुखवट्यांचा....?

कधी फुलवती हास्य
कधी पाझरती अश्रू
चेहय्राचे व्यंग बदलती
असा कसा हा खेळ

जगावे जीवन सु:ख-दु:खात
त्यात बदलती अनेक चेहरे
चेहरे हात देऊन साथ देणारे
चेहरे अंधारात ढकलून देणारे

कधी संपतच नाही का हा खेळ
जेथे असे एक मुखवटा....
त्याच्याच मागे असे अनेक
कधीच संपणार नाही हा खेळ

जिथे असतील प्रेमळ भावना
जिथे असतील दु-ख् अश्रू
बदलत राहतील व्यंग त्याचे
अन चालूच राहील तो खेळ

खेळ त्या मुखवट्यांचा

Monday, March 3, 2008

मनाच्या कोपय्रातून....


उभी मी खिडकीत त्या
चिंतेत होती मी तुझ्या
पण अजून मी तिथेच होती
प्रतिमा जी चिंतेत होती

त्या खिडकीतून पाहते मी..
धावते चालते ते जग नथांबणारे जग
त्या खिडकीतून पाहते मी..
अनेकांचे स्वप्न साकारलेले...विस्कटलेले

पाहते मी आज स्वत:ला तिथून
लहानपणी बागडताना...खेळताना
पाहते मी स्वत:ला तिथूनच...
सगळ्यांना सोडून जाताना त्याच्यासोबत

थकले होते ते डोळे ति चित्र पाहून
थिजले होते शरीर तिथेच उभं राहून
निघून जावे तिथून एकदाचे पण...
मनाच्या कोपय्रातून मी डोकावून पाहीले...आज

वाट पाहत होते सर्व माझी तिथे
माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा पाझरल्या
मनातील अंधाराला भेदत धावत होती प्रकाशाकडे
थांबली तिथे...थांबले माझे श्वास...पुन्हा ति खिडकी आली....पण

जेव्हा त्या खिडकीतून डोकावले....तिथे...
मजसाठी कोणीतरी वाट पहात होते...

Sunday, March 2, 2008

खेळ



पाहत होतो मी तो खेळ
खेळ मज आयुष्याचा
खेळ तिच्या सावल्यांचा
कोणीच थांबवणार नव्हते तिथे

प्रेमात तिच्या पडलो मी
नात्यात कसा गुरफटलो मी
पण तिच्यासाठी कसा फरफटलो मी
बघत होते सर्व पण कोणीच धावले नाही मजसाठी

खूप त्रास सहन केला
दु:ख यातनांमध्ये जीव निघुन गेला
ती पाहत होती मला उभी राहून
देव सुद्धा पाहत होता माझ्या आयुष्याचा खेळ

शेवटी वाटले संपवावा हा खेळ
मुक्त व्हावे त्या भावनांतून-यातनांतून
तिला विसरणे सोपे नाही..पण आठवणेही कठीण
काट्यांच्या हे खेळामध्ये रक्तबंबाळ झालो मी...

कोणी न आले मज अश्रू पुसणारे
एकटाच का मी होतो तिथे
जगीन मी एकटाच तिथवर
पण आज हवे आहे कोणीतरी मज हे सांगणारे...

थांबव हा खेळ नको खेळू तो एकटाच