Tuesday, December 18, 2007
पंख नसलेली परी
सावल्यांमधून दिसते हळूच हसते
गोंडस दिसते सुंदर दिसते
तिची ती ओळख असते निराळी
दु:खात सुद्धा हसते ती एक पंख नसलेली परी
सगळ्यांपेक्षा असते ती अलग
तिच्या भावना ना कोणी समजून घेत ना तिला समजून घेत
पण ती असते वेडी त्याच भावनांची
कोणासाठी पण आपले सर्वस्व देईल अशी असते ती पंख नसलेली परी
दु:ख तीची तीच गिळते
सौंदर्यात विलिन होऊन सर्व काही विसरते
प्रत्येकाच्या जखमांवर आपल्या भावनांचे मलम लावते
त्यांच्याच विचारात जणू हरवून जाते ती पंख नसलेली परी
कधी तिच्यासाठी पण येईल एक राजकुमार
बाहूंमध्ये त्याच्या धरून तो तिला घेऊन जाईल
त्याच्या राजमहालात असतील ते फक्त दोघे
पण पिंजय्रातच का पुन्हा जाई जणू ती पंख नसलेली परी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment