Monday, December 31, 2007

ब्रँड न्यू दिवस


एक दिवस फक्त 24 तास
एक दिवस अनेक श्वास
एका दिवसात किती किती विचार
त्याच दिवसात असे किती क्षण आणि तो दिवस...... संपला.....

प्रत्येक दिवस संपतो आणि नवा दिवस उगवतो
गेलेला दिवस कधी परत आला नाही ना कधी तो येणार
ते क्षण तिथेच संपतात जेव्हा तो दिवस संपतो
पण आपण मागे न पाहता नवीन दिवसाची सुरूवात करावी मागे वळून पाहू नये

तर असाच असतो हा ब्रँड न्यू दिवस
ब्रँड न्यू स्वप्न ब्रँड न्यू क्षण ब्रँड न्यू श्वास
सगळेच कसे ब्रँड न्यू पण ह्या सगळया नाविन्या मध्ये कोणाला विसरू नका
प्रीत आशा स्वप्न आणि नवीन संकल्प हेच आपल्याला ह्या ब्रँड न्यू दिवसाकडे घेऊन जातात ना.....

जेव्हा असाच हा काळ आपल्या पुढे निघून जातो तेव्हा एक क्षण असा येतो
जेव्हा आठवतात ते क्षण त्या आठवणी ते प्रसंग आणि सर्व काही घडलेले
आठवण येते त्या क्षणाची घडलेल्या घटनांची पण आपल्या आयुष्यात कधीच पूरीविराम नाही
एक नवीन दिवस एक नवीन ध्यास आणि सगळेच काही नवीन असेच आपण आयुष्य जगुया.. एक ब्रँड न्यू दिवस जगूया

आता हे वर्ष संपले गेले ते दिवस गेले ते क्षण राहील्या त्या फक्त आठवणी
पण आला आहे हा ब्रँड न्यू दिवस आपल्या प्रत्येकासाठी
2007 गेले आणि आले हे नवीन वर्ष आणि आले 2008
आला हा ब्रँड न्यू दिवस आपल्या सर्वासाठी

so every body तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा

Saturday, December 29, 2007

परी च्या मागे पळू नका ....


शोधत असता तिला सगळीकडे
ती तुम्हाला काही सापडत नाही कुणीकडेच
हसत फसवत बागडत असते इकडे तिकडे
फसता तुम्हीच तिच्या ह्या जिवघेण्या खेळामध्ये

बर मी काही ह्याला अपवाद नाही
मी ही पडलेलो प्रेमात पण फसलो होतो मीच त्या जाळ्यात
म्हणत होतो पाडीन मी तिला माझ्या प्रेमात होईन मस्त सिरीयस
पण साला नशीबच माझे फुटलेले ती कधी आलीच नाही मी तिची वाट पाहत बसलो

शेवटी मी सोडला माझा धीर आणि निघालो मी मज वाटेकडे
तेव्हा मला असे वाटत होते जणू खाल्ले होते शेण नकोतिकडे
तेव्हाच मला माझ्या चूकांची जाणीव झाली
पण कसे समाजावू मी मज स्वत:ला पडलो होतो मी तिच्या प्रेमात

आग प्रिये मी तुझी वाट पाहतो आहे
तुझ्या प्रेमाची तलब लागली मला
अस तू वेड लावलस मला
बॉल ना ग प्रिये तू माझी होशील का ?...

असेच माझे हाल झाले तूझ्या प्रेमात
ए सखे येशील का तू मज जवळ आणि माझी होशील का ?

म्हणून मी म्हणतो मित्रांनो
एकवेळ पोरीच्या मागे पळा पण पारीच्या मागे कधीच पळू नका ...

Tuesday, December 18, 2007

सखी


शोधून कुठे सापडणार नाहीस
काळजात ठसलीस आता जाणार नाहीस
प्रेमात पडलो मी तुझ्या कायमचा
प्रेयसी नाहीस पण आहेस तू माझी सखी

शैली तुझी सुंदर अन स्वरूप
वेडा झालो पाहून तुझा हुरुप
विचार तुझे शांत नि कोमल
आहेत तितकेच अचूक आणि प्रबल

कोण आहेस तू जरा सांगशील का ...
कोणी ही असलीस तरी आहेस माझी सखी

जग धावते मी धावतो सगळेच धावतात
पण प्रत्येक वेळी थांबवून पुन्हा धावावयास मार्ग दाखवते
कधीच चुकणार नाही माझे जरा ऐकून पहा अस सांगते
ती दुसरी कोणीच नाही आहे माझी सखी

तू माझी नाही होऊ शकत
पण आहेस माझी सखी
प्रेम माझे तुझ्यावर आहे प्रेम आहे तुझ्यामध्ये
प्रेम आहे सगळीकडे कारण तू आहेस माझी सखी

सर्व काही विसरून आपले सर्व देणारी तू
प्रत्येकासाठी स्वत:ला विसरून समजून घेणारी तू
तुला कोणी समजले नाही पण मी तुला समजलो
जगात तुझ्यासारखी कोणीच नाही कारण तू आहेस माझी सखी

- शशांक

पंख नसलेली परी



सावल्यांमधून दिसते हळूच हसते
गोंडस दिसते सुंदर दिसते
तिची ती ओळख असते निराळी
दु:खात सुद्धा हसते ती एक पंख नसलेली परी

सगळ्यांपेक्षा असते ती अलग
तिच्या भावना ना कोणी समजून घेत ना तिला समजून घेत
पण ती असते वेडी त्याच भावनांची
कोणासाठी पण आपले सर्वस्व देईल अशी असते ती पंख नसलेली परी

दु:ख तीची तीच गिळते
सौंदर्यात विलिन होऊन सर्व काही विसरते
प्रत्येकाच्या जखमांवर आपल्या भावनांचे मलम लावते
त्यांच्याच विचारात जणू हरवून जाते ती पंख नसलेली परी

कधी तिच्यासाठी पण येईल एक राजकुमार
बाहूंमध्ये त्याच्या धरून तो तिला घेऊन जाईल
त्याच्या राजमहालात असतील ते फक्त दोघे
पण पिंजय्रातच का पुन्हा जाई जणू ती पंख नसलेली परी

Sunday, December 16, 2007

कोण आहेस तू



प्रत्येक वेळी आठवण येते
अशी आहेस तू

विसरून नाही जाऊ शकत
सुंदर अशी तू

कोणीही तुझ्या प्रेमात पडेल
गोड अशी तू

सुंदर आहेस समजदार आहेस
कोण आहेस तू

कधी तू माझी होशील का
माझी आहेस तू

तुझ्याविना काहीच नाही
एक परीच आहेस तू

ओळखच तुझी आहे निराळी
कोण आहेस तू

-शशांक.

Wednesday, December 12, 2007

त्याच वळणावर आज माझी पावले थांबली


अनेक वाटा पाहील्या धरल्या अन सोडल्या
कुठलीच वाट सरल नाही सापडली होत्याच साय्रा वळणाय्रा

प्रत्येक वाट मार्गावर पोचवतेच असे नाही
काही नेतात एका नवीन वळणावर तर काहे नेतात शेवटाच्या वळणावर

आयुष्याच्या ह्या वाटा आजवर कोणीच चुकले नाही
कोणी सरळ मार्गी चालत गेले तर कोणी घेतले चुकीचे वळण

ते चुकीचे वळण कधीच सरळ मार्गी गेले नाही ना कधी जाणार
त्याच वळणावर जाऊन आज माझी पावले थांबली

एकटाच होतो मी तेव्हा ती वाट चालत होतो
अनेक वळणे आली त्या वाटेत पार भरकटून गेलो

वाट पहावीशी वाटली पण वाट पाहणे आता सोडून दिले
तसाच उठलो पुन्हा चालू लागलो एका नव्या दिशेने

प्रेम नशा पैसा हाव हवस अशीच काही ती वळ्णे होती
अश्याच नागमोडी वाटेत मी माझी वाट चुकलो

सर्वत्र पसरले धुके अविश्वासाचे अंधुक झाले सारे
काहीच नाही दिसले तेव्हा मला दिसली पुन्हा तीच वाट

सर्व वाटा संपल्या होत्या उरली होती फक्त तीच वाट
प्रत्येकानेच होता सोडला माझा हात... तेव्हा सुद्धा होतो मी एकटाच

का जणू आज ती मी वाट पुन्हा चालू लागलो
कळत नव्हते मला आज काही पण मागून कोणाची तरी हाक ऐकली

अन जणू आज माझी पावले त्याच वळणावर येऊन थांबली

Sunday, December 9, 2007

ते थंडीचे दिवस



बालकनीत मी आज उभा होतो
थंड हवा पसरलेली होती
सर्वत्र कसे प्रसन्न वाटत होते
तेव्हाच का मला आठवले ते थंडीचे दिवस .....

ते थंडीचे दिवस गुलाबी दिवस धुकेरी दिवस
जणू पहाटे दवबिंदूच्या थेंबात डोळे टिपून जाई
ते थंडीचे दिवस थंड गारांनी झाकून जायचे
रात्री थंड गारव्यात शेकोटीपाशी विझून जायचे

थंडीचे दिवस तिचे नी माझे असायचे
मी तिच्या मिठीत ती माझ्या मिठीत
तिच्या मलमली मिठीत थंडी निघून जायची
पण आता ह्या थंडीत तिच्या आठवणींत अश्रू गारठून जातात

का ती अशीच एका थंड दिवशी निघून गेली
त्या सुसाट वाय्रात मला अशी एकटी सोडून गेली
आजूबाजूचे सर्व काही त्या गारांनी थंड पडलेले होते
त्या थंडीच्या दिवसात माझे ह्रदय सुद्धा असेच गोठून गेले होते

आज मला थंडी वाजते तेव्हा मला काहीच वाटत नाही
फक्त मला सारखी आठवण करून देतात तिची ते दिवस
जणू एखाद्या ice tray मध्ये ह्र्दयाचे तुकडे ठेवावेसे वाटतात
जेव्हा मला आठवतात ते थंडीचे दिवस.

- शशांक

Tuesday, December 4, 2007

एक भेट



ही भेट ती भेट
हीची भेट त्याची भेट
सगळीकडे एकच शब्द असतो
तो असतो एक भेट

भेट कधी कोणाची होते तर कोणाची नाही
कोणाला भेट मिळते तर कोणाला नाही
जरा मला सांगा असते काय ह्या भेटीत
स्वत:च जणू एक वैशिष्ठ्य असते अशी एक भेट

कधी कोणाच्या प्रेमाची भेट
कधी कोणाला शुभेच्छा म्हणून भेट
कधी तिरस्कार म्हणून एक भेट
तर कधी रिकामेपण सुद्धा देतात काही लोक भेट

माझ्यासाठी तर एक भेट म्हणजे
प्रेमाने बांधलेली भावनांची पुडी
प्रेम प्रेयसीच्या प्रेमाने बांधलेली जुडी
अन दोन प्रेमींच्या नात्याने बांधलेली आयुष्याची घडी

मला सारखे वाटते कोणी मला सुद्धा द्यावी अशी गोड गोड भेट
कधी मी सुद्धा द्यावी तिला अशीच गोड गोड भेट
पण काय करणार भेट देणारे कोणी नाही आणि भेट द्यायला सुद्धा कोणीच नाही
पण मी थोडीच एकटा आहे असा... प्रत्येक जण प्रत्येकाला किवा प्रत्येकीला भेट देतोच ना काहीतरी

मग ही कविताच समजा ना माझी एक भेट....

- शशांक

Saturday, December 1, 2007

एक क्षण



एकटेपणा दु:ख विरह प्रेमभंग
इथे सर्वत्र ती असते समावलेली
कधी हसते अन ह्र्दयात बसते
कधी रडवते अन त्याच ह्र्दयाचे तुकडे करून जाते

एकच क्षण हवा असतो तीला जेव्हा हे सगळे काही घडून जाते....

वाट पाहून कंटाळा येतो मला
पण ती वाट सोडून जाणे होत नाही
तिच्या आठवणींचासुद्धा कंटाळा येतो
पण त्या आठवणी सहज विसरून जाणे होत नाही

एकच क्षण असतो तो ज्यात आयुष्याची सर्वात मोठी आठवण रुतलेली असते...

असे अनेक क्षण सरता सरत नाहीत
त्या आठवणी विझता विझत नाहीत
एकच क्षण तो असतो जेव्हा तिची गाठ पडते
आणि एकच क्षण तो असतो जेव्हा तिची नि माझी गाठ तुटते

प्रेमात पडण्याचा तो क्षणच निराळा, हा एकच क्षण जणू हवा असतो प्रत्येकाला....

हा क्षण ना असतो माझा
हा क्षण ना असतो तिचा
प्रत्येकाच्या आयुष्यातसुद्धा कदाचित असेच घडत असावे
कधी त्यांच्या आयुष्यातसुद्धा असाच येत असेल एखादा क्षण

तो क्षण मजसाठी असतो अमूल्य... तोच क्षण आहे का तुम्हासाठी असाच अमूल्य