Friday, November 16, 2007

आशेचे नवे रोप ...


झाडे मोठी होतात
फुला फळांनी बहरून जातात

कालची कुठली रोपं
आज जणू कल्पतरूच बनून जातात

आपले आयुष्यसुद्धा असेच एखादे रोप असते
जे वाढत वाढत एक कल्पतरूच बनते

ते झाड कल्पतरू बनते तेव्हा.....
ते नकोसे होते कधी कधी ते हवे हवेसे सुद्धा असते

पण ते तोडले जाते... खुंटले जाते...
आपल्या आयुष्यात सुद्ध कधी कधी असेच काहीसे घडते

पण जेव्हा ते झाड तुटते तेव्हा
अनेक ॠतू ते असेच उभे असते

अन नकळतच तिथे एक लाहनगे रोप उभे असते
पुन्हा नवे जिवन जगण्याची उत्सुकता घेऊन उभे असते

माणूस जेव्हा हरतो तेव्हा तो असाच ढासळतो
पण तो सुद्धा एक लाहनगे रोपच असतो

हरलेला असतो जीत जिवनातून निघून गेलेली असते
पण पुन्हा ती जीत मिळवण्यासाठी तो पुन्हा उभा राहतो

झाड आणि माणूस सजीवच आहेत
एकरूप नाहीत पण एकनिष्ठ आहेत .....

- शशांक

No comments: