Wednesday, November 28, 2007

शोधू कूठे तुला मी



नेहमीसारखेच काही हे दिवस जातात जणू
तेच ते नेहमीचे जगणे तेच ते एकटे श्वास
कधी-कधी मला वाटते जर हे जगणे नेहमीसारखे नसते तर..
तिथे जर तुझी साथ असती तर... कधी मी एकटा नसतो तर...

तुझ्या विचारात हरवलेलो असतो मी
भर गर्दित सुद्धा एकलकोंडा झालेला असतो मी
ह्या हरवलेल्या वाटेत सावल्यांच्या खेळात फसलो मी
बोल ना ग सखे शोधू कुठे तूला मी

बागेपाशी उभा असतो फुलपाखरांना पाहत असतो
ती फुलपाखरे एकटी नसतात त्यांच्या बरोबर निसर्ग असतो
माझ्या नशीबात तू असतीस तर.....
बागेमध्ये तू असतीस मी असतो अन निसर्गाच्या छायेखाली आपण असतो

हळूच हसतेस काळजात ठसतेस
तुझ्या आठवणीत विस्कळून गेलो मी
तुझ्या आठवणींतच का जणू जगून मेलो मी
वेडे आता ह्या जीवाला लागली तुझीच तमा.... सांग मला शोधू कुठे तूला मी

माझे तुझ्यावर प्रेम आहे हे बोलायचे होते
अन प्रेमाचे ते बोल बोलायचे राहूनच गेले
काळ वेळ अन तिला मी आज हरलो
एकटेपणाच्या भोवय्रात मीच कसा आज फसलो

सावल्यांमध्ये का शोधत असतो तूला मी
जरा मागे वळून पाहा माझ्याकडे
बघ कसा मिठीत घेतो तुला मी
मनच काय ह्र्दय सुद्धा आज बोलत आहे शोधू कुठे तूला मी ....

No comments: