Thursday, July 26, 2007

जन्म झाला तुझा घे भरारी ...



मन माझे स्वप्न माझी सांगत होते मी त्याला

मी फक्त एका बुजगावण्याशीच का बोलत होते

मी त्याला विचारले "मिळतिल का मला माझी स्वप्न"

पण आगळा-वेगळा बाहुलाच का तो .. तो तरी काय बोलणार


मी माझ्या देवाकडे प्रार्थना करते

त्याच्या प्रेमाचा शोध घेत असते मी

माझ्या मनातील स्वप्नांतला राजकुमार मला मिळेल का ?

देवच का माणूस ही तेच सांगी मला

तुझ्याकडे काही नसून फक्त वेळच आहे.


पण मी माझ्या स्वप्ननगरीत कशी जाईन

अन माझ्याकडे इतका वेळ कुठे

तुला तुझ्या अस्तित्वाची जाणीवच का होणार

जेव्हा कळेल की जन्मच झाला आहे तुझा


जन्म झाला तुझा घे भरारी ...

पिता माझे कल्पतरू बनले

माता माझी सूर्यासारखी स्तब्ध झाली

मला सारा परिसर माझा वाटतो पण ...

तिथे जाणारा रस्ता मजसाठी एकटा होता


संधी शोधती मी एक आत्रतेने

संधी शोधते मी उंच भरारी घेण्यासठी

त्या विशाल सागरात घ्यावी उंच भरारी

माझ्या स्वप्नातील बागेत माझ्या ह्रुदयाचे रोप लावीन मी


रोप वाढवीन मी मज ह्रुदयाचे सुंदर असे

मुक्त अन सुंदर राहील जिथे

मी जाईन कशी मज स्वप्ननगरीत

मजकडे वेळच कुठे ...

मग ह्या जगात पाऊल ठेवूच कसे


कळेल जेव्हा तुला जन्म झाला आहे तुझा

वाट पाहतोस कसली ... घे भरारी . . .

No comments: